एकूण 14 परिणाम
October 24, 2020
वॉशिंग्टन- बिहार विधानसभेसोबतच अमेरिकेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. ज्या प्रकारे भाजपने बिहारमध्ये आपल्या वचननाम्यात कोरोना लस सर्व नागरिकांना मोफतमध्ये देणार असल्याचे जाहीर केले आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतही घोषणा करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदावर ज्यो बायडेन यांनी 3...
October 22, 2020
वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यावर चीनधार्जिणेपणाचा आरोप करणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दशकभरात चीनमधील अनेक प्रकल्प मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि चार वर्षांच्या कारकिर्दीत चीनच्या अनेक सरकारी कंपन्यांबरोबर करार केले, अशी माहिती ‘न्यूयॉर्क...
October 15, 2020
मास्को : जगातील सर्वांत पहिली लस बनवल्याचा दावा रशियाने केला होता. आपली स्फुटनिक-व्ही ही लस प्रभावी असून आपण त्याला मंजूरी देत असल्याचे रशियाने जाहिर केले होते. मात्र, या लशीच्या योग्य त्या चाचण्या करायच्या आधीच या लशीला दिलेल्या मंजूरीमुळे संशोधकांनी या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्वचिन्ह उठवले आहे...
October 11, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोना संसर्गाच्या धोक्यातून बाहेर आले आहेत. गेल्या 10 दिवसात ट्रम्प यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 1 ऑक्टोंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना 2 ऑक्टोंबर रोजी लष्करी...
October 08, 2020
वॉशिंगटन - अमेरिकेच्या निवडणूकीची रंगत आता वाढत चालली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, प्रेसिडेन्शियल डिबेटनंतर आता व्हाइस प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडलं. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि उपराष्ट्रपती माइक...
October 05, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 30 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. पहिल्या प्रेसिडेंशियल डिबेटनंतर अमेरिका आणि सर्व जगाला धक्का देणारी बातमी आली. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ट्रम्प यांना लष्करी रुग्णालयात दाखल...
October 02, 2020
बिजिंग- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्वात शक्तीशाली देशाच्या प्रमुखाला कोविड-19 ची लागण झाली असल्याने जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी कामना केली आहे....
September 30, 2020
वॉशिंग्टन- अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात बुधवारी पहिला वादविवाद झाला. दोन्ही उमेदवारांनी आरोग्य, न्याय, वर्णभेद, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्यावर आपली भूमिका मांडली. कोविड-१९ महामारीबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, माझ्या जागी बायडेन असते तर...
September 29, 2020
बिजिंग- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी मैदानात आहेत. ट्रम्प यांचे पुन्हा राष्ट्रपतीपदावर विराजमान होणे अवघड मानलं जातं आहे. अशात चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सच्या संपादकाकडून...
September 28, 2020
नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला आयकर (income tax) भरला नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी 15 वर्षांपैकी 10 वर्ष आपला आयकर भरला नाही. 2016 साली म्हणजे निवडणुकीपूर्वी त्यांनी 750 डॉलरचा आयकर भरला, त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर 2017 साली 750...
September 24, 2020
वॉशिंग्टन : जगभरात कोरोना महामारीमुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या परिस्थितीत अमेरिकेच्या जॉनसन अॅण्ड जॉनसन कंपनीने लोकांना हायसं वाटेल अशी एक बातमी दिली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, त्यांची कोरोनावरील लस आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ज्या व्हॉलेंटीअरवर या लशीची चाचणी घेण्यात येत आहे त्यांच्या तपासणीत...
September 22, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संयुक्त राष्ट्रांनी २०१५ ला काढून घेतलेले शस्त्र निर्बंध एकतर्फी लागू केले आहेत. तसेच, इराण आणि इराणशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. इराणने शांतता कराराचा भंग केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली आहे....
September 21, 2020
वॉशिंग्टन, ता. २१ (पीटीआय) ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने व्हाइट हाउसमध्ये आलेल्या पाकिटात ‘रिसिन’ हा विषारी पदार्थ आढळल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. हे पाकिट पाठविणाऱ्या संशयित महिलेला अमेरिका-कॅनडा सीमेवर अटक केल्याची माहिती विधी व कायदे संचालनालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी रविवारी (...
September 14, 2020
बिजिंग - भारत चीन यांच्यात लडाख सीमेवरून वाद सुरू आहे. दरम्यान, सीमेवर कुरापती सुरु असतानाच चीनने वेगळीच घुसखोरी केली आहे. ज्या पद्धतीने रशियानं क्रीमियावर ताबा मिळवण्यासाठी चाल रचली. तशीच आता चीनकडून हालचाल केली जात आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांच्यासह 10 हजार लोक आणि...