एकूण 1377 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 10, 2019
राजकीय पक्ष हातात ‘राइसप्लेट’च्या थाळ्या घेऊन उभे असले, तरी त्या काही ‘द्रौपदीच्या थाळ्या’ नव्हेत. त्यामुळे या वेळी खरी परीक्षा आहे, ती मतदारांचीच. दसऱ्याचे श्रीखंड-पुरीचे भरपेट जेवण झाल्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अवघ्या १०...
ऑक्टोबर 07, 2019
शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे, हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात. नेमका तसाच प्रयत्न ‘आरे’तील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर चालू असल्याचे दिसते. हातात तलवार घेऊन युद्ध करणारे योद्धे आपणांस माहीत आहेत. परंतु काही नेते केवळ तलवारीच्या म्यानाने युद्ध करतात. त्याचे...
ऑक्टोबर 07, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात करून अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ हा उपाय पुरेसा नसल्याने सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत; परंतु त्यांच्यामुळे विकासाला चालना मिळाल्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसत नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरामध्ये आणखी पाव टक्‍क्‍याने...
ऑक्टोबर 03, 2019
संधी मिळेल तिथे भारताच्या पायात खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी एक चपराक मिळाली आहे. तब्बल सव्वादोनशे वर्षे हैदराबाद संस्थानावर राज्य केलेल्या निजामाच्या कुटुंबातील संस्थानिकांच्या अनेक पिढ्यांनी जमा केलेली मालमत्ता हा केवळ भारताच्या नव्हे, तर जगाच्या...
ऑक्टोबर 02, 2019
मानवी हाव किंवा लालसा नियंत्रणासाठी शासनसंस्था हे माध्यम असू शकेल, असे कार्ल मार्क्‍स यांना वाटत होते, तर गांधींजींच्या मते माणसाची सद्‌सद्‌विवेक किंवा अंतरात्म्याची प्रेरणा त्याकामी उपयोगी पडेल. तशी साद घालण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्माजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण...
ऑक्टोबर 01, 2019
ग्राहकांचा रोष ओढवू नये म्हणून सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र, निर्यातबंदी जितकी हास्यास्पद, त्याहून अधिक हास्यास्पद साठ्यावरील मर्यादा आहे. सरकारने कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात वाढणारे कांद्याचे भाव आटोक्‍यात...
सप्टेंबर 29, 2019
केरळमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी वाहत असलेले वारे आता उलट्या दिशेने वाहू लागले आहे. डाव्यांना लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यात सत्ताधारी असूनही मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. आता जनमत पुन्हा डाव्यांकडे वळू लागल्याची चिन्हे आहेत. बदलाचे निदर्शक असणारे हे वारे पाला या मतदारसंघातून सुरू झाले आहे....
सप्टेंबर 27, 2019
या वर्षीच्या पावसाने जाता जाता स्पष्ट सांगावा दिला. वातावरणातील बदलावर आणि पर्यावरण व्यवस्थेच्या अपरिमित हानीवर निसर्गाने जणू भाष्य केले. प्रश्‍न आहे तो त्यापासून आपण धडा घेणार का, हाच. अनिर्बंध नागरीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या शहरांना भोगाव्या लागणाऱ्या  यातनांची झलक बुधवारी रात्री पुण्याला...
सप्टेंबर 26, 2019
आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी; मात्र राज्य बॅंकेतील प्रकरणात ईडी सक्रिय झाल्याचे टायमिंग संशय निर्माण करणारे आहे. गैरव्यवहार खणताना आरोपांचा वापर विरोधकांना चेपण्यासाठी केला जाता कामा नये. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी...
सप्टेंबर 26, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेत अरिष्ट असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील घटलेली मागणी व उत्पादन, रिअल इस्टेटमधील खरेदीचे घटलेले प्रमाण यांचे दाखले देत मंदी असल्याचा आभास निर्माण करण्याची स्पर्धा सुरू आहे. वास्तविक, तेजी व मंदी हे अर्थव्यवस्थेचे अपरिहार्य घटक आहेत. तेजी- अत्युच्च तेजी-...
सप्टेंबर 25, 2019
प्रस्तावित मेट्रो-३च्या कारशेडसाठी मुंबईतील आरेच्या जंगलातील २५००पेक्षा जास्त झाडे तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी वारंवार आग्रह धरूनही सरकार असे पर्यावरणाला बाधक निर्णय का घेत आहे? एकीकडे ब्राझीलमधील ॲमेझॉन जंगल आगीमुळे होरपळत आहे, तर दुसरीकडे ‘मुंबईचे फुफ्फुस’...
सप्टेंबर 24, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा टेक्‍सासमधील ह्युस्टन या महानगरात झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात ‘दहशतवादाविरोधात पुकारण्यात आलेल्या एल्गार’मुळे लक्षात राहणारा ठरला असला, तरी या कार्यक्रमास त्यापलीकडली अनेक परिमाणे आहेत. खरे तर परदेशात जाऊन तेथील भारतीय जनसमुदायापुढे जाहीर सभा घेऊन...
सप्टेंबर 24, 2019
शेती क्षेत्रामधील अरिष्टाचा अंत करून शेती उत्पादकतेचा आलेख चढा ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेने अंग झाडून कामाला लागणे गरजेचे आहे. शेतीला प्राधान्याने किमान संरक्षण सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर शेतीतील उत्पादकता दुप्पट होईल. भारतातील शेती क्षेत्राला अरिष्टाने ग्रासले आहे, असे सर्व अर्थतज्ज्ञांचे मत...
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...
सप्टेंबर 23, 2019
विघ्नहर्त्या गणेशाने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. गणेशाला ‘विघ्नहर्ता’  म्हटले जाते. गणपति म्हणजे ‘गणानाम्‌ पति’ ! म्हणूनच त्याच्यावर या गणांच्या म्हणजेच जनसामान्यांच्या दुःख, दैन्य व विघ्न-अडचणींच्या निराकरणाची जबाबदारी असते. सत्ताधाऱ्यांकडून जनसामान्य विघ्नहरणाची अपेक्षा करीत असताना ते ‘...
सप्टेंबर 22, 2019
तेलंगणला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमाभागांतील बांधवांना परराज्यात जावं वाटणं ही भावनाच स्थानिक राजकारणाचं अपयश दाखविणारी आहे. विकासाचा अजेंडा पुढं करत हैदराबादेतील तेलंगण राष्ट्र समितीची ‘ॲम्बेसिडर’ महाराष्ट्रात घुसू पाहत आहे. तसं झालं तर राज्याच्या राजकीय पटावर ‘मेड इन हैदराबाद’चा टॅग...
सप्टेंबर 22, 2019
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून, त्यावर मात करण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान मोदींसमोर आहे. अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करून तिला ऊर्जितावस्था प्रदान करण्याचा चमत्कार मोदींना करून दाखवावा लागणार आहे. लोकशाही नसल्याने सत्ताधिशांच्या विरोधात मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या...
सप्टेंबर 19, 2019
देयके देण्यासंबंधी आपल्या देशात वातावरण खराब आहे. देयके देण्याच्या नियमांचे पालन न करणे आणि देयके बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कमकुवत यंत्रणा यामुळे व्यवसायपूरक वातावरणाच्या मानांकनात जागतिक पातळीवर आपली घसरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. आर्थिक आघाडीवर गेले काही आठवडे...
सप्टेंबर 18, 2019
खनिज तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला आखातातील घटनांचा चटका लगेच बसतो. तेथील घटनांवर भारताचे नियंत्रण नसले, तरी देशांतर्गत पातळीवर शक्‍य असलेल्या उपाययोजना आणि धोरणात्मक बदल तातडीने हाती घ्यायला हवेत. पश्‍चिम आशियात गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या संघर्षात बड्या...