एकूण 19832 परिणाम
जुलै 16, 2019
नागपूर : राज्य सरकार भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (ता. 16) बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण...
जुलै 16, 2019
आदरणीय राजाभाऊ ढाले यांच्या निधनामुळे एका क्रांतदर्शी जाणिवेचा आज खऱ्या अर्थाने अंत झाला. दलित पॅंथरचे संस्थापक, लघुअनियतकालिकाच्या चळवळीतले बिनीचे शिलेदार, कट्टर तत्त्वनिष्ठतेचे पाईक, कवी, अनुवादक, चित्रकार, वैचारिक साहित्यापासून ते लहान मुलांसाठी आवर्जून लिहिणारे लेखक, नामांतर चळवळीचे नेते, बौद्ध...
जुलै 16, 2019
येवला : ''पोस्टात तुम्ही बचत खाते उघडा, तुमच्या बचत खात्यावर मोदी सरकार ५० हजार रुपये जमा करणार आहे,'' असे सांगून एका टोळीने गोरगरीब, आदिवासींचे अर्ज भरुन प्रत्येकी 150 रुपये पैसेही जमा केले. शहरातील नागरिक आणि पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टोळक्याचे भांडे फुटले. ही...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई इमारत दुर्घटनेला म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असून संबंधित सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करावा आणि  मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.  आज...
जुलै 16, 2019
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10 टक्के गळती रोखण्याचे काम पुढील वर्षभरात केले जाणार आहे. त्यामुळे टेमघर धरणाची गळती 100 टक्के रोखण्यासाठी...
जुलै 16, 2019
चिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. उद्‌घाटनापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता भविष्यात किती काळ टिकेल,...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बँकांत प्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षाही आता हिंदी व इंग्रजी प्रमाणेच मराठीसह सर्व म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि...
जुलै 16, 2019
गणूर: मजूर टंचाईवर स्मार्ट पर्याय ठरलेल्या अविष्कार म्हणजे स्मार्ट ओनियन प्लांटर. याच अविष्कारास  एचआरडी मंत्रालय, भारत सरकार,एआयसिटीई, पर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे तामिळनाडू येथे घेण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ या राष्ट्रीय स्पर्धेत हार्डवेअर ऍडिशनमध्ये पहिला क्रमांक व रोख एक...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : ''दहशतवाद्यांच्या मनात भय उत्पन्न करणारा 'पोटा' कायदा गैरवापरामुळे नव्हे; तर 'यूपीए'ने मतपेढीच्या राजकारणामुळे रद्द केला; परंतु 'एनआयए'ला (राष्ट्रीय तपास संस्था) देशाबाहेर तपासाची मोकळीक देणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करण्याची इच्छा नाही आणि होऊही देणार नाही. दशतवाद संपविण्यासाठीच त्याचा...
जुलै 16, 2019
जळगाव : काळ ठरणारा महामार्ग असो, की खड्ड्यांमुळे मृत्यूचे सापळे बनलेले शहरातील अंतर्गत रस्ते.. त्यातून प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय अनास्थेचे बळी सामान्य नागरिक ठरतांय.. वाहन चालविणे तर दूरच रस्त्यांवरून चालणेही कठीण झालेले... अशा स्थितीत वाढीव व पर्यायाने उपेक्षित वस्तीतील लोक एकत्र येतात,...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी स्थगिती देण्याची मुंबई...
जुलै 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या 5 दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंत्रालयात राजपत्रित अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...
जुलै 16, 2019
पुणे - पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवरील टोलच्या वसुलीची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनानुसार या मार्गावर टोल वसुलीचा नवा करारनामा करण्याऐवजी तो टोलमुक्त करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे...
जुलै 16, 2019
कोंडागाव (छत्तीसगड) ः घनदाट जंगलांनी समृद्ध असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर विभागात वनक्षेत्र कमी होत असून, त्यावर मात करण्यासाठी जंगलाच्या अंतर्भागात फळझाडे लावण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. वाढती लोकसंख्या आणि सरकारी अनास्थेमुळे जंगलाचे क्षेत्र घटत चालले असून, दक्षिण विभागातील कोंडागावच्या...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : पाण्याचा थेंब न थेंब वाचवा, जलसंवर्धन ही लोकचळवळ बनावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. मात्र खुद्द दिल्लीत ल्यूटियन्स भागातील सरकारी बंगले व आलिशान सदनिकांत राहणाऱया मंत्री व खासदारांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी बसविलेल्या आरो यंत्रांमुळे दररोज  अक्षरशः हजारो...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. हिमाचलचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरात मध्ये हालवण्यात आले आहे. भाजपने नरेंद्र मोदी काळात मराठी पंच्याहत्तरीच्या वरच्या नेत्यांना तिकिटे न देण्याचे धोरण अवलंबले...
जुलै 15, 2019
पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ साली हाती घेण्यात आले होते. या कामाची अंतिम तारीख जून २०१९ उलटून गेली, तरी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गावर कर्नाळा खिंडीत अनेक नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी गेल्या ७ वर्षांत १ हजार २६६...
जुलै 15, 2019
बेळगाव - कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे हक्क डावलत असून चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. एस व्ही बोमनहळ्ळी यांनी पुन्हा एकदा सीमाभागात कन्नडसक्तीचा राग आवळला आहे. या विरोधात आक्रमक झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व...