एकूण 786 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : ग्रामीण व शहरी भागात पानसुपारी शिवाय घराबाहेर जाऊ न देण्याचा रिवाजच महाराष्ट्रात आहे. पूर्वी पानाचे विडे बनवून देण्यात येत होते. मात्र, आजच्या आधुनिक युगात बदलत्या परिस्थितीत पानाची जागा आता प्लॅस्टिकच्या पन्नीत बनविलेल्या खर्ऱ्याने घेतली आहे. विश्‍वासाने खरेदी केला जाणारा...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद म्हणाले...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : मेडिकल, मेयो, डागा व सुपर स्पेशालिटीत शासकीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची नॅट (न्युक्‍लिअर ऍसिड टेस्ट) तपासणीची सोय नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दूषित रक्त मिळून संक्रमणाचा आजार होऊ शकतो. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच सरकारने "नॅट' तपासणी युनिट उभारण्याचे संकेत दिले...
ऑक्टोबर 01, 2019
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने लादलेले आर्थिक निर्बंध योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्यापूर्वी तमाम खातेदारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की पीएमसी बॅंकेचा ताळेबंद पाहता, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकांनीही...
सप्टेंबर 30, 2019
कळमेश्‍वर (जि.नागपूर)  : सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यात सतत दोन महिन्यांपासून होत असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये नुकसानाचा आकडा कमी आहे. यासोबतच शेतपिकांच्या नुकसानाचा अंदाज नगण्य असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई...
सप्टेंबर 28, 2019
वेलतूर (जि. नागपूर) :  एकेकाळी उन्हाळ्यातील गरिबांचा थंडपाण्याचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा वेलतुरात तयार होणारा खास सोड्याचा माठ कालौघात हरवत चालला आहे. हजारोंच्या संख्येने येथे तयार होणारा हा माठ आता बोटावर मोजता येईल येवढ्याच संख्येत तयार होत आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूरपर्यंतचे व्यापारी...
सप्टेंबर 25, 2019
मद्यासाठी पैसे न दिल्याने कुऱ्हाडीने केला होता खून  नाशिक : उंबरपाडा (ता. पेठ) येथे मद्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आरोपी पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वर्मी घाव घालत खून केला होता. याप्रकरणी आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 10 ऑक्‍टोबर 2010 रोजी...
सप्टेंबर 24, 2019
तपासादरम्यान उघड ः पोलिस कोठडी वाढविली औरंगाबाद : बॅंकेकडे गहाण ठेवलेला फ्लॅट खरेदी खताआधारे 15 लाखांना विक्री करुन शेतकऱ्याला गंडा घालणाऱ्या आरोपीने आणखी तिघांना 10 लाखांचा गंडा घातल्याचे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. अंकुश बंधू (32, रा. बन्सीलालनगर) असे त्या आरोपी व्यापाऱ्याचे नाव असून त्याला...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 22, 2019
लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ...
सप्टेंबर 21, 2019
नागपूर ः डॉक्‍टरांवर होणारे हल्ले ही राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे. अनेक छोट्या देशांमध्ये हा विषय हाताळण्यात तेथील यंत्रणा सक्षम आहे. मात्र, भारतामध्ये हे हल्ले रोखण्यात सरकारी यंत्रणा सक्षम नसल्याची खंत व्यक्त करीत डॉक्‍टरांनी संघटित व्हावे, असे आवाहन आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
सप्टेंबर 19, 2019
देयके देण्यासंबंधी आपल्या देशात वातावरण खराब आहे. देयके देण्याच्या नियमांचे पालन न करणे आणि देयके बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कमकुवत यंत्रणा यामुळे व्यवसायपूरक वातावरणाच्या मानांकनात जागतिक पातळीवर आपली घसरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. आर्थिक आघाडीवर गेले काही आठवडे...
सप्टेंबर 18, 2019
नगर - मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगरसह राज्याच्या अनेक भागांतील चारा उत्पादन धोक्यात आले आहे. त्याचा गंभीर परिणाम दूध व्यवसायावर होणार असून, चाराटंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे सरकारी पातळीवर कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि विद्यापीठ...
सप्टेंबर 16, 2019
मोलिसे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. इटलीतील मोलिसे या प्रांतात स्थायिक होण्यासाठी तेथील सरकार तुम्हाला तब्बल 19 लाख रुपये देणार आहे. जास्त वस्ती नसलेला हा सुंदर मात्र वन्य भाग मागील बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे....