एकूण 53 परिणाम
एप्रिल 26, 2019
माझे वडील वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले होते. त्या काळी मला टॉन्सिलचा त्रास व्हायचा. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यातील घसातज्ज्ञांशी प्राथमिक चर्चा करून टॉन्सिल काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ही शस्त्रक्रिया विनागुंतागुंतीची नियमितपणे होणारी साधी सोपी आहे. डॉ. एस. व्ही. गोगटे यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
मेलबर्नमधील सीफर्ड परिसरात मस्तपैकी चापूनचोपून नेसलेली पाचवारी साडी, कपाळावर टिकली, मानेवर छानसा अंबाडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी एक भारतींय स्त्री गेली साधारण तीस वर्षे अनेकांचा दृष्टीस कधी ना कधी पडली असेल. शुभदा गोखले इथल्या मराठी माणसांच्या "मावशी'च. अतिशय प्रेमळ, अगत्यशील, आल्या-गेल्या...
जानेवारी 31, 2019
मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ नये. उदा. एक...
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे...
डिसेंबर 21, 2018
सिमेंटच्या जंगलात काऊ-चिऊ कसे दिसणार? सोपे आहे, त्यांच्यासाठी आपल्या गच्चीत दाणा-पाणी ठेवा. ते येतील. नेहमीप्रमाणे पहाटेच फिरून आले. थोडे पाय दुखत असल्यामुळे पुन्हा झोपले. पण झोप येईल तेव्हा खरे; कारण एव्हाना चिमण्यांनी चिवचिवाट करून मला जागे करायचे नक्की केले होते. मी दररोज फिरून आल्यावर त्यांना...
ऑक्टोबर 01, 2018
आमच्या घरी कामाला ती यावयास लागून चार दशके झाली. आम्ही तिचे नामकरण केले "गृहसहायिका'. सौभाग्यवती दीक्षित यांची व्यक्तिगत सहाय्यक (मोलकरीण किंवा कामवाली बाई म्हणत नाही.) सरकारी नोकरीपेक्षा जास्त काळ तिने घरातली एक बाजू सांभाळली आहे. कपडे धुणे, फरशा पुसणे, भांडी घासणे या व्यतिरिक्त मी जादा कामेही...
ऑगस्ट 06, 2018
बाळाचा व आईचाही जीव धोक्‍यात होता. पण तिच्या घरचे नैसर्गिक बाळंतपणासाठीच हटून बसले होते. कळा सुरू झाल्यामुळे ती प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. गेल्या दोन महिन्यांत एकदाही तपासायला आली नव्हती. ही तिची दुसरी प्रसूती होती. पहिली प्रसूती नैसर्गिक होती. तपासताना आढळले की बाळ पायाळू आहे. बाळाचे वजनही...
जुलै 18, 2018
बालपणी विठ्ठल मंदिराशी नाते जुळले. पुढे पंढरीरायासमोर व्हायोलिनवादन करता आले. आम्ही नुकतेच लकडीपूल विठ्ठल मंदिरापाशी राहायला आलो होतो. माझे वडील उस्ताद महंमद हुसैन खॉंसाहेब यांनी जवळच "अरुण म्युझिक क्‍लास' सुरू केला होता. आम्ही भावंडे आणि जवळची काही मुले विठ्ठल मंदिरात खेळायला जात असू. अजूनही...
जून 26, 2018
रखरखीत उन्हाळा संपतो आणि चराचराला पावसाचे वेध लागतात. हवा बदलते. अधुनमधून वळवाच्या पावसाच्या सरी ओघळतात. भल्या पहाटे पासूनच पावशा पक्षी पेरते व्हा अशी शेतकऱ्याला साद घालू लागतो. शेतकरीही घाईगडबडीने पेरणीची तयारी करतो. बघता बघता झाडं, वेली, नव्या लाल पोपटी पर्णसंभाराने नटू लागतात. अवघा निसर्ग...
जून 01, 2018
एखाद्या संस्थेची शताब्दी हा मैलाचा दगड असतो. संस्थेच्या संस्थापकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ती उभी राहत असते. पुण्यातील व्यापारी शिक्षण देणाऱ्या पहिल्या संस्थेचा डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचा 1 जून 2018 हा शताब्दिदिन. या वेळी प्रकर्षाने आठवण येते ती वडील दिवंगत शंकरराव धुपकर (ज्यांना आम्ही भाऊ...
मे 30, 2018
आपण थोडे सजग राहिल्यावर फसवणुकीपासून वाचू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. थोडे चौकस राहणे क्रमप्राप्त आहे. 27 फेब्रुवारी 2018. 11.30 ची वेळ. दूरध्वनी वाजला. "क्‍या आप ज्योत्स्ना महाजन बात कर रही है? केशवजी घरपर है? मै पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड ऑथॉरिटीसे...
एप्रिल 06, 2018
आधार कार्ड म्हणजे आपले अस्तित्व. गॅस सिलेंडर, मोबाईल, बॅंक खाते, पेन्शन खाते कुठे कुठे जोडायचे असते. मोबाईल व आधार कार्ड यांची जोडणी करताना एका निवृत्त कर्नलना आलेला हा अनुभव... माझे वय ऐंशी वर्षे. सध्या आधार कार्ड गॅस सिलेंडर, बॅंक खाते, पेन्शन खाते इत्यादींना जोडलेले असले पाहिजे, असा आग्रह सुरू...
मार्च 22, 2018
समारंभात पाहुण्यांसाठी हार हवेच होते आणि नेहमीचा फुलवाला आला नव्हता. व्यवस्थापकाने एका हरकाम्याला कामाला लावले आणि त्याने आणलेल्या हारांचीच गोष्ट झाली. कलादालनात एका सरकारी समारंभाचे आयोजन केले होते. आयोजक नामवंत "इव्हेंट मॅनेजर' असल्याने त्यांनी सकाळीच येऊन कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती....
मार्च 15, 2018
ड्रिल.. शाळेत असताना कधीतरी केलेले असते. सैनिकी जीवनाचा तो अविभाज्य भाग असतो. पण, खरे तर आपल्या नेहमीच्या आयुष्यातही ड्रिल उपयोगी पडते. पी डबल ओ, पी डबल ओ एन एऽऽ वी आर द गर्ल्स ऑफ एमईएस... बेटर एव्हरी डेऽऽऽ अशी आरोळी ठोकत नेहरू स्टेडियमवरून निघालेला आमचा चमू शाळेच्या आवारात शिरला अन्‌ आम्हा सर्व...
मार्च 07, 2018
ही लढाई आहे एका सामान्य माणसाची. शासकीय यंत्रणांशी भांडणे सामान्य माणसाला अशक्‍य कोटीतील असते, हा समज खोटा पाडणारी ही लढाई आहे. सर्वसामान्य माणसाकडे पैसे थकले, तर कोणतीही बॅंक वसुलीसाठी तगादा लावते. पण मी बॅंकेकडून अठरा वर्षांच्या प्रयत्नांनंतर सव्याज वसुली केली. त्याची ही गोष्ट. मी 1964 मध्ये...
फेब्रुवारी 26, 2018
आयुष्यभर कष्ट करून मुलांना वाढविले. निवृत्तीनंतरचे दिवस कुटुंबासमवेत सुखात जावेत एवढीच तर इच्छा असते; पण सगळ्यांनाच हे सुख लाभते, असे नाही. त्यांचे नेमके काय चुकते? एका राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये मी वरिष्ठ व्यवस्थापक होतो. पुण्यातील शिवाजीनगर शाखेत अधिकारी होतो. त्या वेळी बचत खाते विभाग आणि...
जानेवारी 26, 2018
प्रजासत्ताक दिन साजरा करताना देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असले पाहिजे. जाती-धर्मात विखुरण्याऐवजी भारतीय असल्याचा अभिमान झळकू दे. सुमारे तीस-बत्तीस वर्षे झाली. शेजारच्या दोन कुटुंबांबरोबर आम्ही सिंगापूरला गेलो होतो. श्रद्धा लहान असल्यामुळे मी जाण्यास...
नोव्हेंबर 15, 2017
अमेरिकेत गेल्यावर तेथील महत्त्वाची स्थळे तर पाहिली जातातच, पण एखादा तेथील समाज वाचू लागतो. कुटुंबपद्धती न्याहाळू लागतो. मग मनात तुलना होऊ लागते. अमेरिकेत साधारणपणे वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षी म्हणजेच हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुले आई-वडिलांपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे अन्यत्र...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे ऐकून होतो....
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे ऐकून होतो....