एकूण 1258 परिणाम
जून 24, 2019
एकत्र निवडणुका घेण्यात अनेक घटनात्मक अडचणी असून, त्याचबरोबर राज्यांच्या स्वायत्ततेवरही मर्यादा येतील, असे आक्षेप आहेत. तेव्हा घाईघाईने आणि पुरेसा विचार न करता या संकल्पनेची अंमलबजावणी करणे योग्य नाही. त्यातून पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे.  देशापुढील वास्तव संकटे, समस्या...
जून 23, 2019
दप्तराचे वजन कमी करण्याबाबतची जबाबदारी एकमेकांवर झटकण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. तरीही विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालाय. आशिष शेलार यांच्या रूपाने नवीन शिक्षणमंत्री लाभले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे विषयावर चर्चा होते;...
जून 23, 2019
छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल. दरवर्षी जून महिना आला की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते....
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
जून 23, 2019
दरवर्षी जून महिना आला, की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. दप्तरामध्ये काय असावे...
जून 22, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे. आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।। ............................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 18, 2019
अन्नधान्याबाबत देश स्वयंपूर्ण झाला असला, तरी विपुलतेमुळे काही प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे अपेक्षित राखीव साठ्यापेक्षा कितीतरी जास्त धान्यसाठा सरकारकडे पडून आहे. ‘अ न्नं बहु कुर्वीत, तद्‌ व्रतम्‌’ असे तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे. या सुवचनानुसार भारतात समाधानकारक...
जून 18, 2019
बाळासाहेबांना सकाळी जाग आली. काय करायचे आहे लौकर उठून? असा विचार करून त्यांनी कूस बदलली. तेवढ्यात आठवले, आज अधिवेशनाचा दिवस! मा. बाळासाहेब ताडकन उठून बसले. बाप रे! आज केवढे तरी काम आहे... दुष्काळावरून सरकारला धारेवर धरायचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबद्दल काय केलेत ते सांगा, असा खडसून जाब...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
नोकरशाहीमध्ये पाठीमागील दरवाजाने तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्याचे सत्र सरकारकडून सुरू आहे. या नेमणुका करताना केवळ तज्ञ हा एकच निकष न राहता त्यांची निष्ठाही महत्त्वाची ठरत आहे. याचबरोबर नोकरशाहीतील काही अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढवून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे...
जून 17, 2019
स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत!  काळ : तोदेखील हवेतच!  प्रसंग : उडता!  पात्रे : आपलीच लाडकी!!  (...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 13, 2019
मुख्यमंत्री श्रीमान नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत नमस्कार. मी आपल्या पक्षाचा साधासुधा व निरलस व निरपेक्ष कार्यकर्ता असून अन्य आमदारांप्रमाणेच मलाही लोकांनी मोदीलाटेत निवडून दिले व आमदार केले आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी गेली साडेचार वर्षे लोकांची निरपेक्ष व निरलस सेवा केली. (पदाची...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...