एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
प्रेम लाभे प्रेमळाला, असे म्हटले जाते. तुम्ही प्रेम पेरले तर पशु-पक्ष्यांकडूनही तुम्हाला प्रेम मिळते. ‘जगाला प्रेम अर्पावे’ असे साने गुरुजींनी सांगितले, ते जणू माझ्या पतीने ऐकले आणि आयुष्यभर कृतीतही आणले. ते माणसांवर प्रेम करायचेच, पण वस्तू, प्राणी, पक्षी सर्वांवरच जिवापाड प्रेम करायचे...
जुलै 11, 2019
माझ्या वर्गात येणारी सगळीच मुले माझी असतात, पण या मुलांबद्दलचे माझेपण खास आहे. होय, ती सारी माझी मुले. खरे तर प्रत्येक वर्षी नव्याने वर्गात येणारी मुले ‘माझीच’ असतात. पण तरीही या मुलांविषयी जरा जास्तच माझेपण आहे. आता ती चिमणी पाखरे पंख पसरून आकाशाला गवसणी घालायला उंच झेपावली. हो! मी शिक्षिका म्हणून...
मार्च 30, 2019
पत्राद्वारे परगावची माणसं जोडली जायची. नात्याची ओढ वाटत राहायची. बातमी दुःखाची असो वा आनंदाची, पण पत्राद्वारे माणसं भेटीचा आनंद घेऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सामील व्हायची. माझ्या आईचं पत्र हरवलं; ते मला सापडलं... अशा प्रकारचा खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. बिनखर्ची पण मजेदार. आज हा खेळही हरवलाय अन्‌...
मार्च 13, 2018
माझं मन आनंदाने अगदी भरून गेलं होतं. स्वतःला हवी ती गोष्ट करायला मिळाल्याने होणारा आनंद वेगळा आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणखीनच वेगळा. ते असतं एक आगळं वेगळं समाधान. माझ्या आईची आई गेली बारा-तेरा वर्षं माझ्याजवळ राहते आहे. वय वर्ष 86. मला मुलगा झाला त्या वेळी ती माझ्याबरोबर...
जुलै 07, 2017
कोकणासारख्या मागासलेल्या भागात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक स्कॉटिश तरुण आला. त्याने दापोलीच्या टेकडीवर हायस्कूल उभारले. विस्तारले. कोकणच्या मातीतच चिरशांती घेणाऱ्या गॅडने यांचे थडगे दुर्लक्षित आहे. शे-सव्वाशे वर्षं झाली. अगदी सांगायचे तर 1875-76 चा काळ. एका सायंकाळी एक...
फेब्रुवारी 01, 2017
नाटुकलं लिहिण्याचा आनंद झाला होता. नाटुकलं बसवताना धमाल आली होती. पण हे नाटुकलं करताना मुलांनी मिळवलेला आनंद पाहताना मला अधिक आनंद झाला.  आमच्या शाळेतील नाट्यशिक्षिका भैरवीताई यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि म्हणाल्या, ‘‘लिहा नाटक!’’ लहान मुलांच्या विश्‍वाभोवती फिरणारं एक नाटुकलं अवघ्या तीन-चार...