एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 29, 2018
आरोग्यसेवांची व्याप्ती आणि परिणामकता वाढविण्यासाठी सरकारने आरोग्य विम्याचा मार्ग निवडला आहे. पण नव्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची अंमलबजावणी करताना समोर आलेल्या त्रुटी किती लवकर दूर केल्या जातात आणि रुग्णांचे अधिकार कसे जपले जातात, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल. भा रताने राष्ट्रीय आरोग्य संरक्षण...
ऑगस्ट 27, 2018
भारत आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार करीत 17 वे कर्माप्पा ओजेन त्रिनले दोर्जे यांनी भारतात लवकर परतणार नसल्याचे सूचित केले आहे. तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्यानंतर तेच तिबेटचे सर्वांत प्रभावी नेते आहेत. त्यांच्या या निवेदनाने ते चर्चेत आले आहेत. मात्र, दोर्जे यांनी नाराजी व्यक्त...
जुलै 30, 2018
सरकारी शाळेत, तमीळमधून शिक्षण घेतलेला, कधीही कोचिंग क्‍लासला न गेलेला मुलगा आज अवकाश संशोधनात जगभरात आदर प्राप्त केलेल्या "इस्रो'चा प्रमुख आहे. चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी हे यश प्राप्त केले आहे. राजकीय क्षितिजावर तळपतानाच...
डिसेंबर 23, 2017
कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जातोय. पुराणकाळातही कुस्ती अर्थात मल्लयुद्ध खेळले जात असे. काळ बदलला तसे कुस्तीचे स्वरूपही बदलले. आता तर स्थिती अशी आहे, की जागतिक स्तरावर हा एक मान्यताप्राप्त असा स्पर्धात्मक व लोकप्रिय खेळ आहे. अनेक देश या खेळात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत असतात....
नोव्हेंबर 29, 2017
सांगलीमध्ये कोठडीत मृत्यू होण्याचे प्रकरण गंभीर हे. नुकतेच  हिमाचल प्रदेशातही असेच प्रकरण घडले. आरुषी आणि प्रद्युम्न खून प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा झाला. अलीकडच्या काळातील घटनांची ही यादी खूपच मोठी आहे. गुन्ह्यांची नोंद करून न घेण्यात टाळाटाळ करणे, नागरिकांना ताटकळत ठेवणे, महिलांच्या प्रश्‍नाबाबत...
नोव्हेंबर 18, 2017
ऑस्ट्रियाचे नवे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ हे केवळ 31 वर्षांचे आहेत. न्यूझीलंडच्या नव्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे वयही फक्त 37 वर्षे असून त्या जगातील सर्वांत तरुण राष्ट्रप्रमुख आहेत. टोनी ब्लेअर आणि डेव्हिड कॅमेरॉन हे दोघेही वयाच्या 43 व्या वर्षीच ब्रिटनचे पंतप्रधान बनले होते. इमॅन्युएल...
जुलै 19, 2017
मंजुळा शेट्ये हत्येसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असे वाटत असेल तर तुरुंग प्रशासनाच्या व्यापक सुधारणांचा प्रश्‍न ऐरणीवर यायला हवा. कैद्यांना किमान सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेचा अधिकार हा तुरुंगातील सुधारणांचा गाभा असणे आवश्‍यक आहे.  काही आठवड्यांच्या अंतराने घडलेल्या आणि तुरुंगाशी संबंध...
जून 27, 2017
दार्जिलिंगच्या पर्वतीय भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे गोरखालँडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात बंगाली भाषेची सक्ती करण्याची घोषणा केल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया नेपाळी भाषिक असलेल्या दार्जिलिंगमध्ये उमटली...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
मे 08, 2017
‘निर्भया’ बलात्कार खटल्यातील आरोपींच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केले, त्याच दिवशी त्यांचे निधन झाले, हा खरे तर योगायोग; मात्र त्यामुळे ‘निर्भया’वर झालेल्या अत्याचारानंतर बलात्काराविरोधातील कायदे अधिक कठोर करण्यासाठी नेमलेल्या न्या. जे. एस. वर्मा समितीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे....
एप्रिल 24, 2017
अमेरिकेच्या "सर्जन जनरल' पदावरून हटविले गेल्यामुळे भारतीय वंशाचे डॉक्‍टर विवेक मूर्ती (वय 39) सध्या चर्चेत आहेत. इतक्‍या लहान वयात "सर्जन जनरल'सारख्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे आणि नंतर शस्त्रास्त्र नियंत्रण धोरणाचा जोरदार पुरस्कार करणारे म्हणून ते अमेरिकी जनतेला परिचित आहेत. वास्तविक...
मार्च 24, 2017
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी अलीकडेच पूर्व आशियाच्या दौऱ्यात जपान, दक्षिण कोरिया आणि चीनला भेट दिली. सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेसमोर संरक्षणाच्या दृष्टीने इस्लामी दहशतवादाव्यतिरिक्त असलेला दुसरा मोठा धोका म्हणजे उत्तर कोरियाच्या धोकादायक हालचाली. पूर्व आशियातील दक्षिण कोरिया, जपान...
मार्च 23, 2017
ते अंतर्बाह्य ब्रिटिश होते! ब्रिटिशांचा उदारमतवाद व्हाया पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यापर्यंत येऊन पोचला होता आणि त्या उदारमतवादाबरोबरच ब्रिटिशांची करडी शिस्त, पोशाखी उच्चभ्रूपणा तसेच त्याचबरोबर आपल्या व्यवसायावरची निष्ठा आणि त्यासाठी करावा लागणारा व्यासंग हे गुण त्यांच्या रोमारोमांत भिनलेले होते....
मार्च 17, 2017
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते. जातिपातींचा बुजबुजाट आणि हिंदू-मुस्लिम तेढ याबद्दल प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचे...
मार्च 02, 2017
महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर अखेर पडदा टाकला, तो गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हा परिषदा, तसंच १० महापालिकांच्या निकालांनी! या निकालांत कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षाही महत्त्वाची बाब अर्थातच होती ती मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीची... पण रंगदेवतेनं...
जानेवारी 19, 2017
सारीपाटावरचे फासे उलटे पडले की नेमकं काय होतं, ते आता भारतीय जनता पक्षाच्या ध्यानात आलं असेल! उत्तर प्रदेशात ‘नेताजी’ मुलायमसिंह आणि ‘बेटाजी’ अखिलेश यांच्यात ‘दंगल’ सुरू झाली, तेव्हा समस्त भाजप छावणीत ऐन गणेशोत्सवात दिवाळीचे सुखाचे दिवस आले होते. आता समाजवादी पक्षात फूट पडणार... ‘सायकल’ ही त्या...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा...
डिसेंबर 19, 2016
इंदूर हे देशाच्या नकाशावर विविध कारणांनी गाजणारे मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर! मात्र, १९८१च्या दशकात या शहरात माफिया गुंडांनी थैमान घातले होते आणि सट्टा तसेच जुगार यांना ऊत आला होता. नेमक्‍या त्याच काळात या शहरात एक नवे पोलिस अधीक्षक नियुक्‍त  झाले. ‘एसपी’ म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्‍ती होती....
नोव्हेंबर 28, 2016
भारत-पाकिस्तान सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार, जम्मू-काश्‍मीरमधील अशांतता, आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेले अविश्‍वासाचे वातावरण आणि कट्टर भारतद्वेषी समजले जाणारे लष्कप्रमुख जनरल राहिल शरीफ यांची उद्या (ता. 29) होणारी निवृत्ती, या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट...
नोव्हेंबर 24, 2016
भाजप सध्या शिवसेनेला हवं तसं नाचवत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र "टोकाचा निर्णय घ्यायची वेळ आणू नका!' हेच पालुपद आळवत आहेत. उद्धव हे टोकाचा निर्णय घेण्यास योग्य वेळेची वाट बघत आहेत; पण ही योग्य वेळ नेमकी येणार तरी कधी?  तिकडे महाराष्ट्रदेशापासून दूरवरच्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र...