एकूण 30 परिणाम
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
मार्च 15, 2019
स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच!  इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती! प्रियांका म्हणजे प्रियांका गांधी. काँग्रेसच्या ‘स्टार’ प्रचारक. काँग्रेस...
मार्च 13, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  एकदा आमच्या "कुकरी शो'मध्ये एक बाई आल्या. त्या एकतर खूप चिंताग्रस्त झाल्या होत्या किंवा त्या मुळातच तशाच होत्या. त्या हसतच नव्हत्या! अत्यंत गंभीर चेहऱ्याने त्या रेसिपी सांगत होत्या. माझा डिरेक्‍टर मला 2-3 वेळा येऊन सांगून गेला "एपिसोड खूप बोअरिंग होतोय. बॅकग्राऊंड म्युझिकनेही...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
फेब्रुवारी 11, 2019
‘द हिंदू’च्या एन. राम यांनी राफेलप्रकरणी नुकतेच प्रकाशात आणलेले मुद्दे आणि त्यानंतर सरकारने स्वत:चा केलेला बचाव यामुळे या मुद्यावरील चर्चा पुढे सुरू ठेवण्यास मदत झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे राफेल प्रकरणाच्या वादाबाबत एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे हा सर्व अहंकारातून सुरू झालेला खेळ होता. या...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 22, 2018
पुणे - महोत्सवात या वर्षी पाच दिवसांमधील २७ प्रस्तुतीमधून ३२ कलावंतांनी आपली कला सादर केली. यांपैकी वीस गायक, दहा वादक व दोघे नर्तक होते. पाच जोड्यांनी सहगायन, सहवादन, नृत्याच्या माध्यमातून परस्परांशी कलात्मक एकरूपतेचा अनुभव दिला.सनई व बासरी ही सुषीर वाद्यं अर्थात हवेची फुंक वापरून वाजणारी वाद्यं...
नोव्हेंबर 09, 2018
एकोणीशे बाहत्तर सालचा जानेवारी महिना, मुंबईच्या तेजपाल सभागृहातून मी, सारंग सत्यदेव दुबेंच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकाचा प्रयोग संपवून गाडीने घरी परतत होतो. सोबत विजय तेंडुलकर, दुसऱ्यांदा त्या नाटकाचा प्रयोग पाहायला आलेले. आमची गाडी ताडदेव मागे टाकून हाजी अलीच्या दिशेने वळली आणि तेंडुलकर...
ऑगस्ट 26, 2018
पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात. "इमली' या शेळ्या चारणाऱ्या...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
जुलै 30, 2018
शत्रूच्या सर्वांत जवळच्या मित्राला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न म्हणजे नवे राजकीय नियम लिहिले जात असल्याचे निदर्शक आहे. याचा उद्देश एकच : मोदींशिवाय कोणीही चालेल... भारतीय राजकारणात सर्वसाधारणपणे कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नाही, फक्त आपल्याला फायदा कोणापासून आहे, तितके पाहायचे. मी ‘सर्वसाधारणपणे’...
जुलै 02, 2018
पंतप्रधान मोदींचा राजनैतिक ‘दिग्विजय’ हा इतिहासजमा झाला असून, परराष्ट्र धोरणाची स्थितीही मोडकळीस आलेल्या रेल्वेगाडीप्रमाणे झाली आहे. सरकारचे स्वत:चेच पाऊल घसरल्याने त्यांच्या वेगाला लगाम बसला आहे.  भारताचे परराष्ट्र आणि धोरणात्मक वातावरण मोडकळीस आलेल्या रेल्वेप्रमाणे झाले आहे. अमेरिकेने...
जून 03, 2018
तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायाची...
मे 31, 2018
सत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल. नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’ नावाचं...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
मे 20, 2018
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...
एप्रिल 15, 2018
मंचावर पूर्ण समर्पित होऊन गावं लागतं. आवाजाची फेक, आवाजातलं मार्दव, सूर-बंदिश-लय-ताल या गोष्टींचा पक्का रियाज झाला तरच अष्टांगप्रधान गायकी आत्मसात होते. यातलं आपल्याला नेमकं किती व काय साध्य होईल, हा भाग वेगळा असतो. मात्र, बाबांनी मला एक सांगितलं होतं ः "" "षड्‌जा'ची साधना करताना धनाची आणि...
मार्च 25, 2018
मी कोणती तरी कला शिकावी, असं माझ्या आईला वाटत असे. मी लहान असताना आईनं मला एक उभी बासरी आणून दिली. ('देवकी कृष्ण' हे आमच्या कुटुंबाचं कुलदैवत आहे). लहानपणी अहेतुकपणे माझ्या हातात आलेली ही बासरीच पुढं जगण्याचा हेतू बनली. कारण, ती माझ्या आयुष्याचं ध्येय, ध्यास आणि स्वप्न बनली. आम्ही मूळचे बेळगावचे....
मार्च 11, 2018
प्रभाताई कायम सांगतात : ''तंत्राचा अभ्यास करा; पण त्यात गुंतून पडू नका. आपलं गाणं, रागविस्तार, आलापी हे सगळं श्रोत्यांच्या मनाला भिडलं पाहिजे. आलापीमधूनच खरं रागदर्शन घडतं, तिचा अभ्यास करा.''  एखादा कलाकार घडत असतो त्यात नियती, परमेश्‍वर, आई-वडील, गुरुजन यांचा फार मोठा वाटा असतो, असं मला वाटतं....