एकूण 23 परिणाम
मे 16, 2019
दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीमार्फत दोडामार्ग बाजारपेठेचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी "सकाळ'ला दिली. दोन महिन्यात आगीच्या दोन घटना घडणे गंभीर बाब आहे. त्यामुळे फायर ऑडिट करणारी यंत्रणा आम्ही शोधत आहोत. अचानक आग लागून वित्त वा प्राणहानी होवू...
मे 10, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली...
एप्रिल 02, 2019
वाळवा - येथील हाळभागात राहणारे अनिल वसंत खवरे यांच्या घरात आज सकाळी सहाच्या सुमारास सिलिंडरमधील गॅसच्या गळतीने आग लागली. या आगीत संपूर्ण घर उध्वस्त झाले आहे. एक लाख 40 हजारांच्या रोकडीसह चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, कपडे धान्य असे सुमारे साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले....
फेब्रुवारी 09, 2019
कळे - येथील यशवंत सहकारी बॅंक लुटून चोरट्यांनी ६५ लाख ७८ हजार ३६५ रुपये किमतीचे सोने व आठ लाख ५६ हजार ५५५ ची रोकड असा एकूण ७४ लाख ३५ हजार ९२० रुपयांचा ऐवज लुटला. कळे-बाजारभोगाव मार्गावरील कळे बाजारपेठेत काल (ता. ७) रात्री बारा ते दीडच्या सुमारास ही लूट केली. तिजोरी फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. त्यानंतर आगीबरोबरच धुराचे लोटच्या लोट उसळले. या परिसरात दाटीवाटीने दोन...
ऑक्टोबर 06, 2018
‘‘लक्ष्मी रस्ता येथे जाण्यासाठी एका प्रवाशाने ताडीवाला रस्ता येथून रिक्षा पकडली. नागपूर चाळ येथील रिक्षाचालक भटू कुंभार हे रिक्षा चालवत होते. प्रवाशाने सोहरब हॉलजवळ गेल्यानंतर वडापाव घेण्यासाठी रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘चला, रिक्षा लवकर घ्या,’ असे चालकास सांगितले. ते शाहीर अमर शेख चौकाजवळ आले....
ऑक्टोबर 03, 2018
पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आज सकाळी सिलिंडरची टाकी बदलल्यानंतर काही मिनिटांतच गॅस गळती झाली आणि घरात आगीचे लोळ पसरले. काही तरुणांनी सिलिंडरची पेटती टाकी लोखंडी गजाने दूर शेतात नेऊन त्यावर वाळू, माती व पाणी टाकून आग विझविल्याने दुर्घटना टळली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तरी...
जून 20, 2018
मंडणगड - तालुक्‍यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.19 जून) रात्री साडेनऊच्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  स्फोटानंतर मन्सूर अहमद हुसैन लांबे यांच्या घरास आग लागली. या आगीत  चारजण गंभीर जखमी झाले. जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे...
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५...
मे 30, 2018
नागाव - पुलाची शिरोली (ता. हातकणंगले ) येथील हौसिंग सोसायटीमध्ये सकाळी सातच्या सुमारास वायू गळतीने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एक लहान मुलगी, दोन महिलांसह नऊ जण जखमी झाले आहेत.  महेंद्र कृष्णात पाटील, मारुती सुतार, निलेश सुखदेव पाटील, निलेश आढाव, सागर पाटील, सुधाराणी काडगोंड, निल्लवा काडगोंड...
मे 24, 2018
गांधीनगर - पहिल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष झालेल्या रिक्षा चालकाने आज चारित्र्याच्या  संशयावरून दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. उचगाव (ता. करवीर) येथे हा प्रकार घडला. या घटनेत सौ. विद्या शिवाजी ठोंबरे (वय २२, रा.  जानकीनगर, उचगाव) यांचा मृत्यू...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार...
एप्रिल 08, 2018
परभणी : स्वयंपाकाच्या सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने आचानक पेट घेतल्याने ट्रकची केबीन जळून खाक झाली. परभणी ते जिंतूर रोडवरील चारठाणा शिवारात रविवारी (ता.८) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद येथून धर्माबादकडे ३५० टाक्या घेवून हा ट्रक जात होता. दरम्यान, केबीनमधून काहीतरी जळत ...
फेब्रुवारी 26, 2018
सरळगाव (ठाणे) : 5 फेब्रुवारीला मुरबाड शहरात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून शासनाच्या वतीने स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते 5 लाख रूपयांचे धनादेशाचे चेक वाटप करण्यात आले. मुरबाड शहरात लाखो रूपये किमतीच्या सागवान लाकडाने बांधलेली 125 वर्ष डौलाने उभी असलेली इमारत...
जानेवारी 29, 2018
मुंबई : एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने रुग्णासोबत आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात घडली. राजेश मारू (32) असे या तरुणाचे नाव आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील...
जानेवारी 25, 2018
बेळगाव - रात्रीच्या वेळी गळती झालेल्या सिलिंडरचा अंदाज न आल्याने पहाटे शेगडी पेटविण्यासाठी गेलेली महिला सिलिंडर स्फोट होऊन जागीच ठार झाली. सुधा दुर्गाप्पा पंगण्णवर ( वय 25, रा गौंडवाड तालुका बेळगाव ) असे मृत महिलेचे नाव आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात ही घटना घडली. गौंडवाड...
जानेवारी 01, 2018
पुणे : मुंबई येथील कमला मिलच्या परिसरातील हॉटेल जळून 14 जण ठार झाल्याची घटना ताजी असताना रविवारी दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर भागातील "हॉटेल मॉर्डन कॅफे'च्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतला. अग्निशामक दलाची सतर्कता आणि ग्राहक, कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने...
ऑक्टोबर 20, 2017
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील उपनगर असलेल्या जुनी सांगवी येथील त्रिमुर्ती अपार्टमेंट जयमालानगर गल्ली क्रं. पाच येथे विलासन हरिश्चंद्र कसोटे यांच्या घराला फटाक्याच्या उंच उडालेल्या ठिणगीमुळे आग लागण्याची घटना घडली. कसोटे कुटुंब यावेळी घरी नव्हते. परिसरात लक्ष्मीपुजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुरू...
ऑक्टोबर 08, 2017
नाशिक - शहरातील जुन्या पोलिस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तिबेटियन मार्केटमध्ये आज (ता. ७) पहाटे कर्कश आवाजाने स्फोट झाला. या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र आठ दुकानांसह वाहनांचे नुकसान झाले. या स्फोटासंदर्भात तर्कवितर्क लावत असताना पाच तासांनंतर हा स्फोट...
सप्टेंबर 01, 2017
शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, सोनसाखळी चोरट्यांनीही पुन्हा तोंड वर काढण्यास सुरवात केली आहे. अवैध धंद्यांवर जरब बसविण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र घरफोड्या आणि सोनसाखळी चोरट्यांना रोखणे शक्‍य झालेले नाही. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण घटले असून, त्याकडे अधिक लक्ष देण्याची...