एकूण 446 परिणाम
जून 21, 2019
नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...
जून 19, 2019
मिरज -  आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला आहे. कधीपासून धावणार हे जाहीर केलेले नाही, मात्र प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने मिरजेतून दक्षिण भारतात ...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 07, 2019
कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले.  जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मे 17, 2019
नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मौदाअंतर्गत येणाऱ्या धानला जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेकरिता शुल्काची आकारणी...
मे 10, 2019
औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून नारेगावातील एका ‘बाबा’ने अनेकांना गंडवल्याचा प्रकार तीन-चार वर्षांपूर्वी घडला. अगदी तीच ‘मोडस’ वापरून या ‘बाबा’ने पुन्हा ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या व्यक्तींचे लाखो रुपये हडपले. हा प्रकार चार मे रोजी घडला...
मे 09, 2019
गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले...
मे 08, 2019
पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
एप्रिल 03, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहनांचा ताण कमी करण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना खडकी स्टेशनकडील जोशी गेटनेच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, जोशी गेटने येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य...
एप्रिल 02, 2019
पुण्याच्या बालेकिल्ल्यात गेली पाच वर्षे सपाटून मार खाल्ल्याने "या काँग्रेसला झालंय तरी काय', असा प्रश्‍न सातत्याने कार्यकर्त्याला पडत होता. अंतर्गत बंडाळी, तेच ते नेते, "मासबेस' नसणाऱ्यांना आमदारकी आणि इतर संधी, नव्या कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ, विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस भवन मध्ये निर्माण...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 16, 2019
येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक...
मार्च 12, 2019
खंडपीठ, सर्किट बेंच निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज  (अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ) सर्वसामान्य नागरिकांची हजारो प्रकरणे केवळ न्यायाधीशांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रलंबित आहेत. अपवादात्मक प्रकरणे वगळता अधिकाधिक प्रकरणांचा गतीने निकाल दिल्यास कायद्याचा दरारा निर्माण होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण...
मार्च 12, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असतानाही सोमवारी सकाळी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक घेण्याचा सदस्यांनी प्रयत्न केला. मात्र, सचिव चित्रा बाविस्कर यांनी ही बैठक झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होईल, असे स्पष्ट केल्यानंतर कामकाज रद्द करण्यात आले.  लोकसभा निवडणुकीची आचारसहिता...
मार्च 06, 2019
अमरावती : राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा आजवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहत असल्याने आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर "फोकस' करण्यात येणार आहे. त्यासाठी निवेदने, मोर्चा, आंदोलनाचे...