एकूण 48 परिणाम
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
मार्च 19, 2019
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्‍यातील शहापूर येथील सुरेश गव्हाणे यांनी गणित विषयातील पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका २००७ मध्ये पूर्ण केली. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. पण ती मिळविणे शक्‍य झाले नाही. नोकरी मिळाली नाही म्हणून हातावर हात धरून न बसता सुरेश यांनी पारंपरिक...
मार्च 14, 2019
भिलार, जि. सातारा - दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून उष्णतेने पाणी समस्या वाढत आहे. रुईघर (ता. जावळी) हे डोंगरकपारीत वसलेले गावही पाणीटंचाईच्या समस्येने तहानलेले आहे. यात्रेच्या निमित्ताने एकवटलेला महिला, पुरुष, युवक अख्खा गाव या पाणीटंचाईच्या विचाराने आणखी घट्ट झाला असून, ऐकीच्या बळातून कुडाळी...
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात,...
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सावखेडा खुर्द हे गाव आहे. तापी नदीकाठी असलेल्या या गावात काळी कसदार जमीन असून गावातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावाची लोकसंख्या १००६ असून, गावात लागवडयोग्य क्षेत्र २५३ हेक्‍टर आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, केळी ही पिके घेतली...
फेब्रुवारी 01, 2019
दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...
जानेवारी 30, 2019
ज्या भागात पाणी जास्त आहे, त्या भागातून टंचाईग्रस्त भागात पाणी आणणे, ही कल्पना लोकांनाही लगेच पटते, परंतु या प्रकल्पाची जेवढी चर्चा झाली, त्याप्रमाणात कामे झालीत का, हेही पाहायला हवे.  पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारे घाटमाथ्यावरील पाणी नदीखोऱ्यात वळविणार असून, मागील शासन काळात समन्यायी पाणीवाटपात...
डिसेंबर 14, 2018
सध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी, लोकप्रिय नसतील, पण संकटात मोठा आधार ठरू शकतील अशा पिकांच्या तो शोधात आहे. अशीच काही पिके शेतकऱ्यांना खुणावत आहेत. शेतकऱ्याच्या उत्पन्नात ती चांगली भरही घालत...
नोव्हेंबर 04, 2018
सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.  दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले   सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही  शेतीतील नवे तंत्रज्ञान...
ऑक्टोबर 08, 2018
संगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे...
सप्टेंबर 06, 2018
नाशिक - भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला भाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविण्यासाठी टोमॅटोसह इतर नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि पिंपळगाव...
ऑगस्ट 20, 2018
जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल?...
जुलै 20, 2018
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव बबनराव होले हा उच्चशिक्षित युवा शेतकरी आहे. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विषयात होले एमफिल करीत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीतही चांगले करिअर करण्याकडे त्यांचा अोढा आहे.  अशी आहे होले यांची शेती  होले यांची...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती...
जून 04, 2018
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट...
मे 27, 2018
सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे ही बी. एस्सी (कृषी) चे शिक्षण घेणारी तरुणी असून, कुटुंबाच्या  दुग्ध व्यवसायात रस घेऊन तो यशस्वी करण्यासाठी धडपडत आहे. अगदी गोठ्यातील शेण काढण्यापासून दूध विक्रीपर्यंतची सर्व कामे करते. उत्पादनाबरोबरच भविष्यात दुग्ध प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची  ...
मे 10, 2018
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि. नगर) गावाने स्वबळावर जलसंधारण केले. बंधारे, विहिरी, ठिबक सिंचनाद्वारे गावात सिंचन बळकटी केली. साऱ्या गावाने गटशेतीचा ध्यास घेतला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला व पिकांचे मळे पिकवले. आज गावातील भाजीपाला मुंबईच्या बाजारात विक्रीस जातो. गावातील शंभराहून अधिक...
एप्रिल 16, 2018
सोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या मंदीचेच वातावरण कायम असून, नजीकच्या भविष्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोयाबीनच्या बाबतीत मोठ्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. तर हरभरा आणि तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, सरकारी खरेदीशिवाय...
एप्रिल 09, 2018
‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते...