एकूण 627 परिणाम
जुलै 16, 2019
तुंग - कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने मालकालाच कर्जमुक्त केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची ही कथा. चार राज्यात ख्याती असलेल्या सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना होते. आता त्याच्या या वजनदार कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित रिअलमीचा पॉप-अप कॅमेरा असलेला रिअलमी एक्स आज (सोमवार)नवी दिल्ली येथे लाँच करण्यात आला आहे. पॉप-अप कॅमेरा असलेला रिअलमी एक्स कंपनीचे सीईओ, इंडिया माधव सेठ यांनी फोन सादर केला.  रिअलमी एक्स हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला होता. आता भारतात आगमन झाले असून तो दोन...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-पालक कराराचा एक...
जुलै 13, 2019
बालक-पालक आज जो तो मोबाईल फोनवर असतो आहे; दिवसेंदिवस, तासन्‌तास. सर्वत्र हेच चित्र असताना मुलांनी मात्र मोबाईलपासून दूर राहावं, ही अपेक्षा कशी करता येईल? अगदी जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त मोबाईल फोन. अगदी जळी, स्थळी.. पूर्वी तो फक्त संवादासाठी वापरला जात असे. आता मात्र ‘...
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 10, 2019
मँचेस्टर : लिटील मास्टर म्हणून ज्यांची क्रिकेट जगतात ख्याती आहे, त्या सुनील गावसकरांचा आज 10 जुलैला 70वा वाढदिवस आहे. भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा सचिन तेंडुलकरने कॉमेंटरी बॉक्समधे बोलावले. नेमके त्यावेळी सुनील गावसकरही तिथे आले. मग सरांच्या वाढदिवसाचा विषय निघाला आणि...
जुलै 08, 2019
सरळगाव : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी माळशेज घाटात गर्दी केली होती. जीवित हानी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रतिबंधक आदेश जारी करून पर्यटकांसाठी 31 जुलैपर्यंत पर्यटकांना घाटात जाण्यासाठी बंदी केली आहे. मात्र, काल (रविवार) साप्ताहिक सुटी असल्याने या प्रतिबंधक...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जुलै 07, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात आणि आंबोली परिसरात काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर पडली आहे. परिणामी या नदीवरील ऐनापूर, निलजी, नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे.  आंबोली परिसरातील मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढून नदी...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता...
जुलै 06, 2019
बालक-पालक  आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलतो आहोत. ते अधिक अर्थपूर्ण, दर्जेदार, आनंददायी कसं होईल, याचा विचार करतो आहोत. त्यासाठी शाळेत मुलं काय व कशी शिकतात, घरानंही त्यांना शिकवणारी शाळा कसं व्हावं याचा विचार करीत आहोत. मात्र, पालक-शिक्षक यांच्याखेरीज मुलांना शिकवणारी एक तिसरीच शाळा सुरू आहे. ज्या...
जुलै 06, 2019
पालखीच्या दिशेने तिचे ओढाळ मन धावले. पादुकांचे दर्शन घेतले. पण, त्या काही क्षणांच्या प्रवासात स्वतःचीही नवी ओळख झाली. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घ्यायचेच. दुचाकी थोडी अलीकडे लावून पटकन पालखीच्या दिशेने निघाले. दर्शन घेताना सेल्फी घ्यायचा, व्हिडिओही काढायचा. मनात ठरवतच...
जुलै 05, 2019
फलटण - आषाढी वारीत सोशल मीडियाचे प्रमाण खूपच वाढले आहे. माउलींच्या पादुका पूजन, वारकरी दिंड्या, समाज आरती, रिंगण यांसारखे व्हिडिओ काही सेकंदांत व्हायरल होत आहेत. मोबाईल असलेला प्रत्येकजण वारीचे छायाचित्र किंवा व्हिडिओ व्हायरल करतो आहे, त्यामुळे वारीची वाटचाल मिनिटामिनिटाला जगभर समजत आहे. यंदाच्या...
जुलै 01, 2019
सावंतवाडी - येथील मळगाव घाटीमध्ये धबधब्याच्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू असून धबधब्याचा समोर रेलिंग उभारले आहेत. वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.  पर्यटनाचे आकर्षण बनलेल्या या धबधब्याची व परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशा मागणीचे वृत्त गतवर्षी "सकाळ'ने...
जुलै 01, 2019
जळगावमधील विख्यात मू. जे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी झालेल्या तरुणाच्या हत्येने कायदा-सुव्यवस्थेवर जसे प्रश्‍नचिन्ह उभे केले, तशी ही घटना तरुणाईच्या मानसिकतेवर विचार करायला लावणारीही ठरली आहे. विशीतली तरुणाई हाती शस्त्र घेऊन अशी फिरायला लागली तर महाविद्यालयीन सुरक्षा यंत्रणा काय करतेय? ही...
जून 30, 2019
जळगाव ः चुंबन घेतानाचे सेल्फी काढून ते छायाचित्र पतीला तसेच भावाला दाखविण्याची धमकी देत विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडिताच्या तक्रारीवरून गेल्या गुरुवारी (20 जून) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यातील संशयित राहुल वामन आघाव (रा....
जून 30, 2019
औरंगाबाद  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. २९) दिवसभर कर्मचाऱ्यांनी संप पुकारत राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज दिवसभर ठप्प होते. दरम्यान, ता. १५ जुलैपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाची घोषणा न झाल्यास...
जून 30, 2019
ओसाका : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीची जी-20 परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. मॉरिसन यांनी मोदींबरोबर सेल्फी काढत तो ट्‌विटरवरही प्रसिद्ध केला आणि "कितना अच्छा है मोदी' असे कौतुक हिंदीतून केले.  Mate, I’m stoked about the energy of our...
जून 29, 2019
ओसाका : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जी-20 देशांनी जागतिक पातळीवर एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) जी-20 परिषदेत केले. या परिषदेसाठी मोदी जपानला गेले होते.  या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक आपत्तीबाबत संवेदनक्षम असणाऱ्या आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊ...