एकूण 23 परिणाम
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
एप्रिल 23, 2019
कागल - यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. दिव्यांगांना ब्रेललिपीतील मतपत्रिकादेखील निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शुभम सुभाष चौगुले या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या मतदाराने केला. ...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे.  शहरात गेली...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
ऑगस्ट 11, 2018
पुणे - वेळ शुक्रवारी सकाळी साडे अकराची... पोलिस आयुक्तालयाच्या आवारात अचानक एकच गलका झाला... ‘अरे तो आला’, ‘मला त्याच्याबरोबर सेल्फी काढायचीयं’ असे म्हणत खाकी वर्दीतील चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. होय, ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ अमीर खानबरोबर एक सेल्फी घेण्यासाठी...
जुलै 15, 2018
महाड : माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा परिसरात माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. येत्या 12 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहतील. देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईतील पोतदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच.आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयातील...
जुलै 12, 2018
लातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...
जुलै 08, 2018
वीस वर्षाची संजना (नाव बदललेलं आहे) काँप्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तिचे वडील तिला घेऊन माझ्या क्‍लिनिकला आले होते. तिची समस्या होती तिच्या सततच्या वाढत जाणाऱ्या क्रेडिट कार्डच्या बिलाची. ते तिनं अपराधीपणामुळं आपल्या पालकांपासून लपवून ठेवलं होतं आणि मूळ बिल आणि व्याज लागून ते वाढतच...
एप्रिल 19, 2018
उन्हाळ्याच्या दिवसांत आणि मे महिन्याच्या सुटीत, आवर्जून गुऱ्हाळांत सहकुटुंब जाऊन, उसाच्या रसाचा स्वाद घेण्याची परंपरा, महाराष्ट्रात अनेक कुटुंबांनी, पिढ्यान्‌पिढ्या जपली आहे. गुऱ्हाळांचे बाह्य स्वरूप बदलले, यंत्रसामग्री बदलली, रुचीपालट झाले, तरीही संगणकयुगाच्या जमान्यात, गुऱ्हाळाचा व्यवसाय, आकर्षक...
एप्रिल 16, 2018
उल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी...
फेब्रुवारी 25, 2018
मानवाला आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी, विविध आजारांना पळवून लावण्यासाठी वैद्यकीय आणि औषधशास्त्रात महत्त्वाचं संशोधन सुरू आहे. आगामी काळात वेगवेगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जाऊन उपचारपद्धती विकसित होतील आणि वैद्यकीय क्षेत्राचं परिमाणच बदलून जाईल. कल्पनेच्याही पलीकडच्या, थेट मुळापर्यंत जाऊन आजार बरे करू...
फेब्रुवारी 23, 2018
पलक्कड : एका आदिवासी तरुणाला चोरीच्या संशयावरून येथील स्थानिक रहिवाशांनी गंभीर मारहाण केली. मारहाण करताना जमावाने त्या तरुणासोबत सेल्फीही काढला. मात्र, या गंभीर मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अट्टापडीतील मुक्काली येथे घडली. मधू असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे...
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा - शासनाच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष खदखदत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रसने सरकारविरोधी लाटेची नस पकडत निर्णायक लढ्याचा काल एल्गार केला. भाजपचे अपयश आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका या दोन्हीला लक्ष्य करत सुरू झालेल्या ‘हल्लाबोल’मुळे आगामी...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा...
जुलै 15, 2017
कोल्हापूर - हे कुटुंब तब्बल 19 जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्‍त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे...
मे 12, 2017
मुंबई : कोणत्याही यंत्रणेसाठी काम करणारा कर्मचारी महत्त्वाचा. हेपेटायटीसबाबत जनजागृती करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांच्या कामाचा उत्साह वाढणार असेल तर मी शेकडो सेल्फी काढायला तयार आहे, असे अमिताभ बच्चन यांनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले.  जागतिक आरोग्य संघटनेच्या हेपेटायटीस...
मे 07, 2017
मुंबई - खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट होते. सरकारी रुग्णालयांत रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. यामुळे रुग्णांचे हाल होतात. डॉक्‍टर आणि रुग्णांमध्ये सुसंवाद नसल्याने डॉक्‍टरांवरील हल्ले वाढले आहेत. हे लक्षात घेऊन "आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा' ही मोहीम जनआरोग्य अभियान या संघटनेने सुरू केली आहे....
मे 01, 2017
पुणे - परवा एक जंटलमन एका स्वच्छतागृहासमोर उभे राहून सेल्फी काढताना दिसले. आश्‍चर्याची घटना नव्हे का? सेल्फी काढण्यासाठी लोक सुंदर स्थळे निवडतात किंवा चांगला मूड.... पण हे सद्‌गृहस्थ स्वत:सह स्वच्छतागृहाचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये नीट येते ना? अशी काळजी घेत स्वमुद्रा टिपत...