एकूण 33 परिणाम
एप्रिल 30, 2019
सलाम, सलाम सबको सलाम, लोकशाहीच्या रक्षणकर्त्यांनो, एक हात जागच्या जागी ठेवून उजव्या हाताने सलाम! मतदान करणाऱ्यांना सलाम मतदान न करणाऱ्यांनाही सलाम एकदाच मतदान करणाऱ्यांना सलाम, दोन-तीनदा मतदान करणाऱ्या लोकशाहीच्या पाईकांना तर आपला कडकडीत सलाम तडाखेबंद व्हिडिओबाजी करणाऱ्यांना सलाम व्हिडिओबाजीची  ...
एप्रिल 13, 2019
मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक वर्षांनी तो...
एप्रिल 11, 2019
सां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला...
एप्रिल 06, 2019
सांप्रतकाळी इये देशी इलेक्‍शनप्रीत्यर्थ मुलाखतीचे पेव फुटले असून, आमच्यासारख्या दाखलेबाज मुलाखतकाराला फुर्सत म्हणून उरलेली नाही. सध्या आम्ही इतक्‍या मुलाखती घेऊन ऱ्हायलो आहोत की आमच्यावर जळ जळ जळून काही (पुण्यातल्या) नामवंत मुलाखतकारांनी (पक्षी : सुधीर्जी गाडगीळ) आमच्याशी सध्या बोलणेच टाकले आहे. पण...
मार्च 16, 2019
या आठवड्यात निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि "अधिकृतरीत्या' प्रचाराचे वारे वाहू लागले. आजवरची प्रत्येकच निवडणूक निरनिराळ्या कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. मात्र, या वर्षीची निवडणूक लक्षणीय ठरण्याचं कारण या वेळीचा "नवमतदार वर्ग' असं म्हणावं लागेल. विविध माध्यमांतून सुरू...
फेब्रुवारी 13, 2019
सर्वप्रथम हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की आम्ही कमळ पक्षाचे शतप्रतिशत मेंबर आहो! अकरा कोटी मेंबरे करणारी ही जगातली सर्वांत मोठी लोकशाही पार्टी असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. पक्षासाठी आम्ही तनमन वेचले आहे... धन वेचण्याची संधी अजूनी मिळालेली नाही, म्हणून तेवढे फक्‍त राहून गेले आहे. पण ते असो....
जानेवारी 19, 2019
नवीन वर्षाची सुरवात कुठल्या तरी संकल्पनेनं करावी, एक ध्येय ठेवून त्याचा पाठपुरावा करावा, असं दरवर्षी वाटतं. माझ्या डायरीत त्या संकल्पाची नोंद करून ठेवते. लिहिल्यावर स्वतःशीच हसते आणि स्वतःलाच सांगते, "हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी.' पण लिहून ठेवलं, मनाशी कितीही घोकलं, तरी तो पूर्ण होईलच...
नोव्हेंबर 19, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1940 कार्तिक शु. दशमी.  आजचा वार : संडेवार.  आजचा सुविचार : दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट... एक लाट तोडी दोघां... पुन्हा नाही गांठ! ...................  नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस भलताच धकाधकीचा गेला. सकाळी प्रथेप्रमाणे उठलो...
ऑक्टोबर 05, 2018
तासन्‌तास वृत्तवाहिन्या बघूनही वास्तव काय आहे, हे समजणार नसेल तर आम्ही कोणत्या पत्रकारितेचा टेंभा मिरवणार आहोत? ‘पेड न्यूज’, ‘फेक न्यूज’ यापेक्षाही ही समस्या अधिक दूरगामी परिणाम करणारी असून, प्रेक्षकांना सत्यापासून वंचित ठेवणारी आहे. यु वाल नोहा हरारी या इस्राईलच्या लेखकाचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘...
सप्टेंबर 20, 2018
सुधीर्जी मुनगंटीवार्जी, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे! ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? कृपया...
सप्टेंबर 12, 2018
एक होता केकु. मोठा लोभस होता. खोडकर असला तरी केकु सगळ्यांना आवडायचा. ‘केकुऽऽ’ अशी हाक मारली की चटकन कान टवकारून बघायचा. नक्‍की कुठे बघायचा हे जाम कळायचे नाही. केकु जसजसा मोठा होत गेला, तसतसा अधिकाधिकच केकु झाला!! परप्रांतीय किंवा उपरा कुणी आला की केकुने त्याचा डासा काढलाच म्हणून समजा. घरी आलेले...
ऑगस्ट 16, 2018
खड्ड्यांचा विषय रस्त्यांइतकाच जुना. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या म्हणजे एसटीची एक लोकप्रिय टॅगलाईन होती, ‘रस्ता तिथे एसटी’ त्यात थोडा बदल करून ‘जिथे रस्ता तिथे खड्डे’ असं म्हटलं तर राज्यांमधल्या रस्त्यांची आजची अवस्था स्पष्ट होईल. यातली पहिली, सरकार आपल्या नाकर्तेपणाने खोटी ठरवू पाहतेय आणि दुसरी...
ऑगस्ट 15, 2018
आदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस लिहीत आहे. नुकतीच गटारी अमावस्या होऊन गेली असल्याने तेथूनच सदर पत्र लिहीत असल्याने पत्राला वेगळाच वास आल्यास राग मानू नये!! आपल्यामुळे माझे नशीबच पालटून...
जुलै 16, 2018
मुंबईलगतच्या कल्याणमध्ये परवा पावसाळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात एक दुचाकी उलटली अन्‌ तिच्यावरील महिला बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडली गेली. सीसीटीव्ही फुटेजमधील ते करुण दृश्‍य देशभर गेले, लोक हळहळले. व्यवस्थेला लाखोली वाहिली गेली. केवळ कल्याणमध्ये असे पाच बळी एवढ्यात गेले आहेत...
फेब्रुवारी 23, 2018
थोरल्या साहेबांच्या पुण्यातील (पक्षी : ऐतिहासिक) मुलाखतीनंतर अवघा महाराष्ट्र मुलाखतमय झाला होता. मुलाखत घेणाराच इतका तालेवार की ती मुलाखत आपापत: ऐतिहासिक झाली. ही मुलाखत आमच्या एकमेव व लाडक्‍या साहेबांनीच घेतली होती. साहजिकच इतिहासपुरुषाची छाती रेल्वेच्या इंजिनासारखी धडधडत होती. कान टवकार्ले होते....
फेब्रुवारी 23, 2018
डाव्या आणि उजव्या मंडळींचा वेगवेगळ्या मुद्द्यांवरचा विचारकलह बऱ्याचदा फणा काढून समोर येत असतो. मुस्लिम धर्मियांची वाढती लोकसंख्या हा हिंदुत्ववाद्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र उजव्या शक्तींकडून पुरोगामी वर्तन का होत नाही? पुरोगामीत्व ही डाव्यांची मक्तेदारी आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहत...
डिसेंबर 25, 2017
वाऱ्याच्या वेगानं व आगीच्या दाहकतेनं पसरणाऱ्या खोटेपणाच्या गतीचं वर्णन करणारी एक म्हण आहे, ''सत्य बाहेर निघण्यासाठी पायात चप्पल घालून तयार होईपर्यंत असत्य गावभर हिंडून आलेलं असतं.'' हे केवळ गल्ली-गावातल्या चहाड्या अन्‌ कागाळ्यांपुरतंच नसतं. सोशल मीडियानं खोटेपणाला नवा अवतार बहाल केलाय. वर्ष सरत आलं...
सप्टेंबर 26, 2017
काशी विश्‍वविद्यालय म्हणून गेली शंभर वर्षे देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींच्या छेडछाडीविरोधातील आक्रोशाला पोलिसांनी लाठीमाराने प्रतिसाद दिला. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ. त्यातही उत्तर...
सप्टेंबर 14, 2017
स्मार्टफोनच्या दुनियेत घडत असलेल्या क्रांतीने आणखी एक टप्पा गाठला आहे. स्पर्धेतून असो वा नावीन्याच्या ध्यासातून; पण आपल्या हातातील फोनचा दिवसेंदिवस वाढत असलेला स्मार्टनेस आपल्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे, हे निश्‍चित. उच्च वर्गातील लोकप्रिय "ऍपल'ने पहिला आयफोन सादर केल्यानंतर...
जुलै 11, 2017
एकविसावे शतक आपल्या हातात नाना प्रकारची डिजिटल 'खेळणी' घेऊन आले आणि जणू सारे विश्‍वच आपल्या साऱ्यांच्या कवेत आल्याचा भास होऊ लागला. त्या खेळण्यांपैकी सर्वांत लोकप्रिय ठरले ते अर्थातच 'स्मार्ट फोन'! या स्मार्ट फोनने दळणवळण तसेच दूरसंदेशाच्या क्षेत्रांत तर क्रांती केलीच; शिवाय कॅमेरा नावाची गोष्टही...