एकूण 54 परिणाम
January 16, 2021
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर...
January 13, 2021
नाशिक : पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून उत्तर महाराष्ट्रासाठी तब्बल 1 लाख 32 हजार कोविशिल्ड लसीचे डोसेस पाठवण्यात आले असून त्याचे वितरण आरोग्य प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अश्या विविध जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीच्या डोसेसचं वितरण...
January 13, 2021
नाशिक : नाशिककरांचाही आता कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातही सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आज (ता.१३) पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये कोविशिल्ड लस पोहचली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस नाशिक जिल्ह्यासाठी पहिल्या...
January 12, 2021
नागपूर : टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित भाडे आणि भाड्याची नवीन घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. महाविद्यालये आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यात अजून वाढ होतील, असे एजंटचे म्हणणे आहे. दिवाळीनंतर घरांच्या...
January 11, 2021
नाशिक : "वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन...
January 11, 2021
सरकारचे नवे कायदे व कृषी धोरण हे शेतकरी हिताचे आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आंदोलक शेतकरी मात्र अनुभवांच्या आधारे त्यांच्या या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. या कायद्यांबाबत पुढील आक्षेप आहेत.  शोषित व दुर्बल घटकांसाठी कायदे करताना त्यांना न्याय मिळावा यासाठी...
January 10, 2021
नवी दिल्ली- इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) शनिवारी स्पष्ट केलंय की नव्या अपडेटमुळे फेसबुकसोबत (Facebook) डाटा शेअर करण्याच्या नितीमध्ये कोणताही बदल होणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमुळे जगभरातून होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे.  काय आहे WhatsApp ची नवी...
January 08, 2021
मुंबई- साऊथ सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता यश आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ जानेवारी १९८६ ला झाला. खूप कमी जणांना माहितीये की यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड सिनेमामध्ये त्याने कमी वेळात खूप मोठं नाव कमावलं आहे. यश एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडिल बसचालक होते तर आई...
January 05, 2021
शिरपूर जैन (जि.वाशीम) :  कोरोना संसर्गामुळे गत मार्च महिन्यांपासून शाळेची घंटा वाजलीच नाही. काही ठिकाणी नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले. मात्र, इतर वर्गासाठी शाळेची घंटा विसरल्या गत झाली आहे. आता २०२०-२१ शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आले. तरी संसर्गाच्या भीतीमुळे अजूनही शाळेची घंटा वाजणार नाही....
January 04, 2021
औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. शाळेसोबतच ११ वी व १२ वीचेही वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे. तथापि, आगामी १५...
December 29, 2020
मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागताची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी ही केली असेल. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची भीती ही व्यक्त होत आहे. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, दैनंदिन वेळापत्रकानुसार जगण्याची...
December 23, 2020
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जईई मेन्स परीक्षेची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सीईटी सेल कडून 'एमएचटी-सीईटी' परीक्षेच्या तारखांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात 'सीईटी सेल'चे नियोजन सुरू असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. - ...
December 20, 2020
गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी...
December 16, 2020
मुंबई : कोरोनाच्या माहामारीमूळे अद्यापही उपनगरीय मार्गावर लोकल प्रवासाची परवानगी नसून सध्या फक्त नियोजीत वेळेत सरसकट महिला आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यांमध्ये भिकारी आणि विक्रेत्यांचा सुळसुळाट...
December 10, 2020
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीची सुविधा डिसेंबर महिन्यातील शनिवारी आणि सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरू राहणार आहेत.  राज्य सरकारने डिसेंबर 2020 मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त...
December 10, 2020
गडहिंग्लज : गेल्या आठवड्यापासून नववी ते बारावीच्या नियमित वर्गांना सुरवात झाली आहे. कोरोनामुळे शासनाच्या धोरणानुसार गेले चार महिने "शाळा बंद... शिक्षण सुरू' होते. विद्यार्थ्याना यू ट्यूब, व्हिडिओ, व्हॉटस ऍपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला गेला. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर बहुतांश...
December 09, 2020
पुणे : एकाएकी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या 27 वर्षीय विशाल थोरात या युवकाला आपल्या गावी जावावे लागले. त्यात आचानकपणे गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व पुस्तके हॉस्टेलवरच राहिली. - Corona Updates: हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या आत​ तर...
December 08, 2020
नागपूर : उपराजधानीत पेट्रोल आतापर्यंतचे सर्वांत महाग अर्थात तब्बल ९१ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारने वाढविलेल्या करभारामुळे पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिसा रिकामा होत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोलचा दर जवळपास एवढाच झाला होता. मात्र, त्यावेळी कच्च्या तेलाच्या...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
November 10, 2020
कोल्हापूरः एखाद्या वेळी आग लागलीच तर फायर फायटर जाण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील रस्ते मोठे करा. आग प्रतिबंधाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे महापालिकेने नुकत्याच केलेल्या फायर ऑडिटमध्ये निष्कर्ष नोंदविला आहे. सीपीआरचे फायर ऑडिटसह विद्युत ऑडिटही पूर्ण झाले आहे.  कोरोनाच्या काळात ट्रॉमा केअर...