एकूण 32 परिणाम
February 14, 2021
Valentine Week Special : असं म्हणतात, की प्रेमाला वयाचं, जातीचं, धर्माचं, लिंगाचं असं कशाचंही बंधन नसतं. या विचारांप्रमाणेच साधारण 18 वर्षांपूवी मी आणि माझा जोडीदार ऍड. संजय मुंगळे आम्ही आंतरधर्मीय - जातीय विवाह केला. आम्ही दोघेही पेशाने वकील आणि दोघांचीही पहिली भेट अर्थातच कोर्टात झाली. मी '...
February 05, 2021
नांदेड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून विजय सिंघल (भाप्रसे) यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. यापूर्वी विजय सिंघल हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व त्याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.  भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ बॅचचे...
January 28, 2021
नांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचारी राम गंगाराम आलुरे यांना त्रास होत असल्याने ते होम आयसोलेशन झाले होते.त्यांना...
January 23, 2021
नांदेड : शासनाच्या निर्णयानुसार येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 1 ते 15 जानेवारी या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावर्षी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने शिकविणे सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विज्ञान विभागाच्या पुढाकाराने...
January 20, 2021
अकोट (जि.अकोला) :  भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी अकोला यांनी शहरासह सर्व सरकारी, धर्मदाय संस्था, खासगी रुग्णालय, व दवाखाने, शाळा, महाविद्यालयाच्या, इमारतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मा....
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
January 12, 2021
जळगाव : भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू विभागात लागलेल्या आगीत दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन संस्थांना...
December 29, 2020
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रस्त्यांची झालेली दुरवस्था, सुरक्षा यासह विविध समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात. मात्र...
December 24, 2020
मुंबई : जसजसं जग बदलतंय तसतशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिची गरज देखील वाढतेय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ येतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक प्रमाणात केला जातोय. भारताला जगभरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिसंबंधित संसाधने पुरवणारा महत्त्वाचा देश म्हणून मान्यता आहे. अशात...
December 15, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संवाद साधला. सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल. दरम्यान, वेळप्रसंगी टोकाचा संघर्ष  करावा लागला तर टोकाचा संघर्ष करू असं फडणवीस...
December 02, 2020
अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३ डिसेंबररोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यामुळे जिल्हा परिषदेची रखडलेली सर्वसाधारण सभा घेण्यात येईल. त्यासाठी सत्ताधारी वंचितचे पदाधिकारी व सदस्यांसह...
November 30, 2020
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत... सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण...
November 29, 2020
पुणे : इयत्ता ११ वी, १२ वीत केलेला अभ्यास आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी केलेले प्रीपरेशनमुळे मला 'एमएचटी-सीईटी'मध्ये हे यश मिळाले. या परीक्षेचा अभ्यास करताना फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ या विषयांच्या पुस्तकांचे बारकाईने वाचन करून त्या समजून घ्यावे, तसेच प्रश्न सोडविण्याच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश...
November 22, 2020
जळगाव ः कोरोना संसर्गाची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रम शाळा, वसतीगृहे ७ डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी काढले आहेत. यामुळे उद्यापासून (ता.२३) शाळा सुरू करण्याचे आदेश रद्द झाले आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही वाढू लागल्याने खबरदारीचा...
November 22, 2020
जळगाव : शासनाने दिलेल्या निर्देशानूसार जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उद्यापासून(ता.२३) जिल्ह्यात ९ ते १२ चे वर्ग भरविण्यात येतील. त्यासाठी आज खासगी शाळा, महाविद्यालयात शाळा खोल्या र्निजंतुकरणाची मोहीम होती घेण्यात आली होती. या शाळांच्या तयारीची पाहणी शिक्षणाधिकारी बी.जे....
November 16, 2020
अकोला  ः अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परिणामी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेतल्यास त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना हिताचे निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा डिसेंबर महिन्याच्या पाच ते दहा...
November 15, 2020
पुणे : 'एम.कॉम.' हा पारंपारिक अभ्यासक्रम असल्याने त्यातून उत्तम प्रकारचा रोजगार निर्माण होत नाही, पण याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. एमबीए केल्यानंतर जसा रोजगार उपलब्ध होतो, तसा एम.कॉम. नंतर ही व्हावा यासाठी स्पेशलायझेशच्या विषयात वाढ केली आहे....
November 11, 2020
ठाणे - गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करीत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबरपासून...
November 10, 2020
मुंबई - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या खास अभिनयाबद्दल रसिकांडून कौतूक केले जात आहे. अभिनयाबरोबर तो त्याच्या वक्तव्यांसाठीही प्रसिध्द आहे. सध्या मिर्जापूर मधील कालीन भैय्याच्या भूमिकेत त्याने छाप पाडली आहे. यामुळे पंकज त्रिपाठी सर्वांच्या पसंतीस...
November 04, 2020
कोल्हापूर : कोरोना माहामारीत सर्व उद्योग,  व्यवसाय ठप्प झाले. परंतू सध्याच्या अनलॉक नंतर जनजीवन पुर्वरत होत आहे. संसर्गाची भीती व्यक्त करत शासनाने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे टाळे अजून कायम ठेवले आहे. यामध्येच खासगी क्लासेस देखील गेल्या सात महिन्यांनपासून बंद असल्याने क्लाससंचालक व त्यावर...