एकूण 39 परिणाम
एप्रिल 08, 2019
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला आता झळाळी मिळणार आहे. जुन्या राजवाड्यातील वसतिगृह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून, त्यासाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा आता दगडी इमारतीत सुरू होणार...
मार्च 18, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षाचा (२०१९-२०) अर्थसंकल्प मंजूर करता येणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला आहे....
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठ्या उद्योगांशी करार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच त्यासाठी अनुदान देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी महिलांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार...
ऑक्टोबर 10, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रथमच शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यासाठी ७१ हजार रुपयांची या वर्षासाठी सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मस्त्य व्यवसाय हा अर्थार्जनासाठी पूरक...
सप्टेंबर 27, 2018
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला लागलेली घरघर थांबविण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. ही शाळा भरत असलेल्या जुन्या राजवाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने आठ कोटी 30 लाखांचा प्रस्ताव बनविला आहे. तो...
ऑगस्ट 10, 2018
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन  २०१६- १७ मध्ये  २६५ गावांमध्ये ४४६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४३७ कामे पूर्ण झाली असून  त्यावर २४ कोटी २५ लाख रुपये खर्च झाला आहे. शिवाय लोकसहभागातून पूर्ण झालेली ३०३ कामे असून त्याचे मूल्य २४ कोटी १५ लाख रुपये इतके आहे. या सर्व...
जुलै 04, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या 340 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे भीषण वास्तव "सकाळ'ने मांडले. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास निधी द्यावा, यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळांच्या इमारत दुरुस्तीसह नव्या खोल्या...
जून 19, 2018
सातारा - कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजुरी, रोगराई, औधषे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक कामे माफक दरात करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सेवा पुरवठादार नेमून त्यांना...
जून 13, 2018
सातारा - उद्याचा भारत घडविण्याचे काम शिक्षण करत असले तरी भावी नागरिकांना याच शिक्षणाच्या धोकादायक मंदिरात शिक्षण घ्यावे लागते. जिल्ह्यातील तब्बल ३४० शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असतानाही त्याला पुरेसा निधी मिळत नसल्याने ही मुले त्याच इमारतीत अथवा खासगी खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. तरीही याकडे...
मे 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे १०० खेड्यापाड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकाची सद्या अतिशय दुर्दशा झाली असून बसस्थानकाचे जुने शेड अक्षरशः पार्किंगचे ठिकाण बनले असून त्याचा उपयोग एखाद्या स्वछतागृहाप्रमाणे होत आहे. निजामपूर...
मे 11, 2018
मोहोळ - मोहोळ तालुका पंचायत समितीचे कक्ष अधिकारी आर. बी. वारगड यांचेवर बैठकीला गैरहजर राहील्याबद्दल केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी सहानुभूती पंचायत समिती सभागृहाच्या मासिक बैठकीत घेतली तर दुसरीकडे सातत्याने गैरहजर राहणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  पाथरुडकर यांचेवर कार्यवाही करण्याचा ठराव पंचायत...
मे 05, 2018
मोहोळ : मोहोळ तालुक्याच्या विकासाची गेल्या अनेक वर्षाची उणीव भरून काढण्यासाठी मतदारांनी पंचायत समितीच्या सभापती समता गावडे यांना संधी दिली आहे. यापुर्वी सर्वसामान्याना न्याय न देता जवळच्या बगलबच्चांना पुन्हा पुन्हा लाभ देण्याची परंपरा मोडीत निघाली असल्याने विरोधक चुकीचा अपप्रचार करीत आहेत. आघाडीचे...
एप्रिल 29, 2018
प्रश्‍नः मराठी माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी हा कधी अडसर वाटला ? स्वागत ः या दोन्हींत जमेचे आणि तोट्याचे काही मुद्दे आहेत. आधी जमेबद्दल. प्राथमिक स्तरावरच कोणत्याही विषयाचा गाभा आकलन झाला पाहिजे. जो मातृभाषेतूनच अधिक स्पष्ट, सहज आणि नैसर्गिकरीत्या होतो. ग्रामीण भागातून येण्यामुळे...
एप्रिल 27, 2018
सोलापूर : भाजप पदाधिकारी व नगरसेवकांना विमानतळाच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या स्वागतासाठी येऊ न दिल्याने भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि पोलीस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. पवार हे तांबडे यांना म्हणाले, ''डबा द्यायचा आहे; पण तुम्ही आत सोडत नसल्याने तो आता तुम्ही...
मार्च 24, 2018
येवला - सगळेचजण आता आरोग्याविषयी सजग झाले आहे. दवाखान्यावर भरखर्च करण्यापेक्षा देशी ए २ दुधाला प्राधान्य दिले जात आहे. ए २ दुधाची प्रमाणीकरण करण्यासाठीची यंत्रणा दुग्ध मंत्रालयाने गावोगावी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले. निमगाव मढ येथे जिल्हा...
मार्च 19, 2018
रसायनी (रायगड) : रसायनीतील चावणे गावा जवळील ओढ्यावरील पुल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. म्हणुन पनवेल एसटी आगाराने चावणे मार्गे सवने एसटी बस बंद केल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर पुलाची डागडुजी करण्यात यावी आशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  पनवेल एसटी आगारातुन चार सवने एसटी बस...
मार्च 15, 2018
दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते...
डिसेंबर 14, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी नव्याने सात महसूल मंडळामध्ये जागा निश्‍चित करण्यात आली आहेत. एकूण ३९ महसूल मंडळापैकी ३३ महसूल मंडळाच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर आता नव्याने सात ठिकाणी स्वयंचलित हवामान यंत्रे बसविण्यात...
नोव्हेंबर 23, 2017
नागपूर - बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान (डीबीटी) विषयावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी चांगलाच गदारोळ घातला. जिल्हा परिषदेच्या सेस फंडासाठी डीबीटीची आवश्‍यक नसल्याचा ठराव करून शासनाकडे पाठविण्याची मागणी विरोधकांची होती....
नोव्हेंबर 08, 2017
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर चलनटंचाईला पर्याय म्हणून शासनाने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८६१ ग्रामपंचायतींपैकी प्रायोगिक तत्त्वावर एका ग्रामपंचायतीला कॅशलेस करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी जडगावची (ता. औरंगाबाद) निवड केली होती; मात्र...