एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी परवानगी...
सप्टेंबर 30, 2019
आमच्या पुरुषोत्तमच्या 'अवलिया' या नाटकाची 27 तारखेला रंगीत तालीम झाली आणि 29 तारखेचा तो प्रयोगाचा उत्साह वाढवणारा, उत्कंठावर्धक दिवस उजाडला. पहाटेपासूनच गावात जशी लगबग सुरू होते, तशी सकाळपासूनच हॉलवर गडबड आणि धावपळ सुरू होती. प्रत्येक जण कुठल्यातरी वेगळ्याच धुंदीत वावरत होता, पण ही धुंदी फक्त...
सप्टेंबर 08, 2019
आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही... मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जुलै 27, 2019
नाशिक - प्रशासकीय सेवेत जाऊन चांगले करिअर करण्यासह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक होतकरू युवक स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. काही स्वयंअध्यनातून तर काही क्‍लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. युवा वर्गाचा वाढता ओढा लक्षात घेता, शिकवण्यांचे शुल्क अव्वाच्या सव्वा होत...
जुलै 26, 2019
पलूस - लहानपणी पाहिलेली स्वप्नं मोठेपणी अपूर्णच राहतात, असं नाही. ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार न करता जगण्याचा पुरेपूर आनंद घेणारे लोक इतरांचे आयुष्यही सुगंधित करतात. अशाच एक आहेत पलूस तालुक्‍यातील पुणदीच्या व सध्या पुणे पोलिस दलात विशेष शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील....
जुलै 17, 2019
प्रेमा पाटील यांनी जिंकला किताब; बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्‌ कलेचा घडविला संगम पुणे - पोलिस दलातील नोकरी म्हणजे फक्त अन्‌ फक्त ताणतणावच, अशी सर्वांची समजूत असते. पण, प्रेमा पाटील यांनी ती समजूत खोटी ठरविली. पुणे पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करताना स्वतःच्या छंदापोटी त्यांनी बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्...
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
जून 01, 2019
पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’...
फेब्रुवारी 13, 2019
सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने झालेल्या ‘सकाळ एनआयई’ नाट्य स्पर्धेत साताऱ्याच्या गुरुकुल स्कूलने (एकांकिका-क्रांतिज्योत) सांघिक प्रथम क्रमांक मिळविला. येथील न्यू इंग्लिश स्कूलने दुसरा (निबंध), तर एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूलने (हम पंछी एक डाल के)...
जानेवारी 26, 2019
सातारा - दै. ‘सकाळ’च्या वतीने १२ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्ट’मधील बंपर व मेगा बंपर बक्षिसांची सोडत येथील शाहू कलामंदिरात सोमवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सोडती काढण्यात येणार आहेत. याचवेळी मधुरांगण...
जानेवारी 15, 2019
नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
सप्टेंबर 28, 2018
तारळे - स्पर्धा परिक्षा ही काही शहरी मुलांची मक्तेदारी नाही, ग्रामीण भागातील मुलांनी मनापासुन ठरविले तर स्पर्धा परिक्षेत नक्की यश मिळते. अनेक मुलांनी सिध्द करुन दाखविले आहे. त्यामुळे तारळे सारख्या निमशहराकडे वाटचाल करत असलेल्या गावातुनही प्रशासकिय सेवेत निवड झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. असे मत...
जुलै 02, 2018
मॉस्को : चेंडूवरील एकतर्फी वर्चस्व, यशस्वी पासेस, यानंतरही स्पेनला गोलचा दुष्काळ संपवता आला नाही. रशियाच्या चिवट बचावाने त्रासलेल्या स्पेनला लढत पेनल्टी शूटआउटमध्ये नेण्याचा फटका बसला. रशिया गोलरक्षकाने दोन पेनल्टी किक रोखत स्पेनला स्पर्धेतून बाद केले.  पोर्तुगाल, अर्जेंटिना या संभाव्य...
जून 25, 2018
लातूर : साधारणपणे तीस वर्षापूर्वी लातूर पॅटर्न राज्यात गाजू लागला, तेव्हापासून शहरात शिकवण्यांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली. गणेशोत्सवात जालनापूरकर सर मिरवणूक काढत, त्यात विद्यार्थी आणि इतर शिकवणीचालकही सहभागी होत. मात्र शिकवणीचे रुपांतर क्लासेसमध्ये होताना स्पर्धा सुरु झाली ती 2004...
जून 10, 2018
भंडारा : पवनी येथील वैनगंगा विद्यालयची विद्यार्थिनी अफशिया शब्बीर खान या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षित 95.40 टक्के गुण मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यातील मुस्लिम समुदायात अफशिया प्रथम आली. त्याबद्दल अंजुमन अरबी मदरसा व मुस्लिम लायब्रेरी कमिटीच्यावतीने अफशिया व तिच्या परिवारचे घरी जाऊंन अभिनंदन...
जून 03, 2018
स्वीडनचा सुपरसितारा बियॉं बोर्ग आणि अमेरिकन सुपरब्रॅट जॉन मॅकेन्रो यांच्यात सन 1980 मध्ये लढली गेलेली विम्बल्डनची ती अंतिम झुंज कित्येकांच्या स्मरणात अजूनही घोटाळत असेल. या लढतीवर आधारित एक चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी येऊन गेला ः बोर्ग व्हर्सेस मॅकेन्रो. चित्रपट स्वीडिश होता; पण त्याला हॉलिवुडी तडका...