एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
इतिहासाची पुनरावृत्ती होते, ही बाब नवी नाही. पाकिस्तानच्या बाबतीत तर असे नेहमीच घडते. तेथे राजकीय नेते सत्तेवर येतात आणि जातात. पण, पाक लष्कर मात्र आहे तेथेच आहे. इम्रान यांच्या विरोधातील ताज्या आंदोलनाच्या माध्यमातून पाक लष्कराचा नेहमीचा खेळ नव्याने सुरू झाला असण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर २०००...
ऑगस्ट 30, 2019
चाळीस वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्याविषयी अनिश्‍चितताच आहे. तेथील भावी व्यवस्थेबाबत अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकी फौजा माघारी जाण्याआधीच तेथे ‘तालिबान’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना जिब्राल्टरजवळ...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद...
फेब्रुवारी 26, 2019
सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिलाच भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करण्यात यजमान देशाने न ठेवलेली कसर, उंची गाड्या आणि कोट्यवधी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे...
फेब्रुवारी 16, 2019
काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. "किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...