एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
पाकिस्तानातील काहींना वास्तवाचे भान आल्याचे त्या देशाचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्या कबुलीजबाबावरून दिसते आहे. पण, म्हणून पाकिस्तान आता सरळ मार्गाने वाटचाल करू लागेल, असा समज करून घेणे धोक्‍याचे ठरेल. जम्मू-काश्‍मीरचे विभाजन, तसेच त्या राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या भारताच्या निर्णयामुळे...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 23, 2019
आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे युद्धाचे ढग घोंगावत असून, कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती जागतिक समुदायाला वाटते. अमेरिकेने हे सर्व गृहीत धरून युद्धसामग्रीवाहक विमाने तांबड्या समुद्रात पाठविली आहेत. याखेरीज इराकमधील पाच हजार अमेरिकी सैनिकांना सज्ज...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
जुलै 12, 2018
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे. पा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी...
जुलै 11, 2018
भारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प्रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक धर्मोपदेशक आणि ‘...
एप्रिल 17, 2018
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर आडून, तर सर्वोच्च न्यायालय उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते. पा किस्तानात आजवर लष्कर आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोकप्रतिनिधींची सरकारे घालविली गेली...
फेब्रुवारी 21, 2018
भारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...
फेब्रुवारी 07, 2018
पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष नेहमीच विभाजनवाद्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करीत असतात. शोपियाँमधील घटनेच्या निमित्ताने त्याचाच प्रत्यय आला. प्र जासत्ताक दिन शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शोपियाँमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दोनशे काश्‍मिरी तरुणांच्या जमावाने जोरदार दगडफेक केली. इशाऱ्यांना न...
डिसेंबर 22, 2017
जगाच्या भू-राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार या प्रक्रियेचे पुढारपण करीत आहे. इस्राईलमधील आपला दूतावास तेल अविवऐवजी जेरुसलेमला हलविण्याची ट्रम्प यांची घोषणा, हा त्या प्रक्रियेचाच भाग. पश्‍चिम आशियात त्याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. सर्व मुस्लिम...
सप्टेंबर 13, 2017
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याचा विषय निघाला, की शस्त्रास्त्रे, गुप्तचर यंत्रणा, नेटवर्क, राजकीय मुत्सद्देगिरी या आणि अशा मुद्यांचा प्रामुख्याने ऊहापोह होतो. दहशतवादी संघटनांच्या निधीचे स्रोत बंद करणे, यासारख्या उपायांवरही चर्चा होते. हे सगळे महत्त्वाचे आहेच; परंतु या सगळ्यांइतकाच एक महत्त्वाचा...