एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
खनिज तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला आखातातील घटनांचा चटका लगेच बसतो. तेथील घटनांवर भारताचे नियंत्रण नसले, तरी देशांतर्गत पातळीवर शक्‍य असलेल्या उपाययोजना आणि धोरणात्मक बदल तातडीने हाती घ्यायला हवेत. पश्‍चिम आशियात गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या संघर्षात बड्या...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद...
फेब्रुवारी 21, 2019
इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानच्या कारभाराची सूत्रे आल्यानंतर काही सकारात्मक बदल घडतील, अशी आशा व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली आहे. दहशतवादी हल्ल्याविषयी त्यांच्या निवेदनात ना संवेदनशीलता दिसली, ना सत्यता. पा किस्तानचे पंतप्रधान म्हणून प्रख्यात क्रिकेटपटू इम्रान खान यांची निवड झाली, तेव्हाच्या...
नोव्हेंबर 19, 2018
सौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून सुरू असलेले राजकारण आणि टोलवाटोलवी धक्कादायक नि संतापजनक आहे. ही हत्या नेमकी कुणी केली, तिच्या कटाचे सूत्रधार कोण, याच्या मुळाशी जाण्याची...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
ऑगस्ट 01, 2018
इराणमधून होणारी तेलआयात थांबविण्यासाठी अमेरिकेने भारतासह अन्य देशांवर दबाव आणला आहे. तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर विसंबून असलेल्या भारताची त्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. या संकटातून मार्ग काढताना भारताच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे.  इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लागू करण्याच्या अमेरिकेच्या...
जुलै 12, 2018
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे. पा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी...
जुलै 11, 2018
भारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प्रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक धर्मोपदेशक आणि ‘...
मे 11, 2018
कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या साडेतीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्यातच इराणवर नव्याने निर्बंध घातले गेल्यास त्या देशाकडून भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे आता इतर पर्यायांवर भर द्यावा लागेल. अलीकडच्या काही महिन्यांतील विविध आर्थिक घटकांच्या आकडेवारीवर नजर...
एप्रिल 17, 2018
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर आडून, तर सर्वोच्च न्यायालय उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते. पा किस्तानात आजवर लष्कर आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोकप्रतिनिधींची सरकारे घालविली गेली...
फेब्रुवारी 14, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानचा दौरा केला. भारताचा व्यापार, आर्थिक, इंधन आणि सुरक्षाविषयक बाबींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातील राजकीय गोळाबेरजेचे गणितही लक्षात घेतले पाहिजे. या सर्व देशांसोबत अनेक करार करतानाच, भारताने...
फेब्रुवारी 07, 2018
पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष नेहमीच विभाजनवाद्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करीत असतात. शोपियाँमधील घटनेच्या निमित्ताने त्याचाच प्रत्यय आला. प्र जासत्ताक दिन शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शोपियाँमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दोनशे काश्‍मिरी तरुणांच्या जमावाने जोरदार दगडफेक केली. इशाऱ्यांना न...
ऑक्टोबर 27, 2017
काश्‍मीरचा प्रश्‍न आणखी जटिल बनतो आहे, असे दिसले की सरकार जागे होते आणि ते या प्रश्नावर धडपडायला लागते. काश्‍मिरींना बोला म्हणते. आता त्यांच्यासाठी दिनेश्वर शर्मा यांना संवादक म्हणून नेमण्यात आले आहे. कोणाशी बोलावे, कोणाशी नाही, यासंबंधीचा निर्णय शर्मा यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे...