एकूण 19 परिणाम
मे 03, 2019
चिपळूण - सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतील 1 हजार 389 जणांना हज यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील हज कमिटीच्या कार्यालयातून याबाबतची माहिती देण्यात आली.  हज समितीचा कोटा तब्बल 14 हजार 975 जागा वाढविण्यात आला आहे. अतिरिक्त...
मार्च 03, 2019
मुंबई : कोकण किनारपट्टीवर लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला. या संदर्भातील अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षरी...
फेब्रुवारी 22, 2019
सौदीच्या युवराजांनी दहशतवादाचा निषेध करताना पाकिस्तानचा उल्लेख टाळला, हे खटकणारे आहे. भारताला या बाबतीत पाठपुरावा करावा लागेल. मात्र सौदीसह विविध देशांशी स्वतंत्रपणे संबंध स्थापण्याचे धोरण वास्तववादी आणि देशहिताचे आहे. द्विपक्षीय संबंधांचे क्षेत्र अधिक व्यापक-विस्तृत करणे, हा सौदी...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई: राजकारणात अनेकांचे बळी जात असतात त्यामध्येच प्रकल्पाचे बळी जाणे हे काही नवीन नाही. अखेर युतीच्या राजकारणातही कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा बळी जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. नाणार प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत दिले आहे. आजच्या...
ऑक्टोबर 15, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा देश आहे. भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणात तसेच कच्च्या तेलाच्या साठवणूकीच्या क्षेत्रात...
ऑक्टोबर 06, 2018
रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.  जीआय टॅगमुळे कोकणातील हापूस आता आणखी भरारी घेऊ शकेल....
जुलै 01, 2018
बांदा - सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेहमीच आरोग्य सुविधांसाठी गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने राज्याने सिंधुदुर्गात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय २०१९ पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असून तेथे महत्त्वाच्या पाच शस्त्रक्रियाही होतील. त्यासाठी निधी...
जून 27, 2018
मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्प रेटण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये उभी फुट पडली आहे. नाणार प्रकल्पाचे पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत पडले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिव्र नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला असल्याचे समजते. सेनेचे उद्योगमंत्री...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
मे 31, 2018
राजापूर - तालुक्‍यातील सागवे येथील भूमिकन्या एकता मंचच्या नेतृत्वाखाली नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यामध्ये महिलांसह लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चेकऱ्यांनी कोणत्याही स्थितीमध्ये प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. ‘कोण म्हणतो...
मे 24, 2018
प्रश्‍न - कोकणाच्या विकासवाटेकडे तुम्ही कसे पाहता?  उत्तर - कोकणात कशाचीच कमतरता नाही. जगात घडले ते इथे होऊ शकणार नाही, असे काहीच नाही. केरळात बघा. तेथील लोकांना, पर्यटनाचा अभिमान आहे. तसे प्रकल्प हवे, विकास असायला हवा. सरकार येणार आणि करणार यावर अवलंबून न राहता तुम्हालाही हातपाय हलवायला हवे....
एप्रिल 23, 2018
नाणार - नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केली आहे. दरम्यान या घोषणेवर आमदार नितेश राणे आणि धनंजय मुंडे यांनी टिका केली आहे.  शिवसेना...
एप्रिल 23, 2018
नाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही, कोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) जाहिर सभेत सांगितले. उद्धव...
एप्रिल 16, 2018
बने, बने, लोळत काय पडलीयेस अशी? चल, आवर पटकन...सामान बांध! आपल्याला किनई जत्रेला जायचंय! कुठली जत्रा म्हणून काय विचारत्येस? अगं, नाणारच्या जत्रेला जायचंय आपल्याला... ना-णा-र! नानार नाही!! आपल्या फडणवीसनानांमुळे त्या गावाला नानार म्हणतात, असं कोणी सांगितलं तुला?...नाणार कुठेशी आलं म्हणून काय...
एप्रिल 12, 2018
रत्नागिरी - केंद्र व राज्य शासन नाणार येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियाच्या राजाला खूश करण्यासाठी कोकणी जनतेचा बळी घेऊ देणार नाही. काही झाले तरी शिवसेना हा प्रकल्प रद्द करणारच, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. ...
सप्टेंबर 11, 2017
जलसंपदा विभागाच्या सहा अधिकाऱ्यांसर ठेकेदाराविरोधात दोषारोप ठाणे : कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पाच्या कामातील गैरव्यवहाबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये ठेकेदार कंपनीसह जलसंपदा विभागातील सहा तत्कालीन अधिकाऱ्यांचा...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...
मार्च 14, 2017
खेड - दुबई येथील भारतीय उद्योगपती आणि खेडचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांची कन्या अंबरीन हिचा विवाह नुकताच दुबईतील बडे व्यावसायिक रियाज कालसेकर यांचा पुत्र खालिद यांच्याशी मोठ्या थाटात झाला. कालसेकर कुटुंब मूळचे रायगडातील आहे. दुबईतील प्रसिद्ध जुमेरा बीच हॉटेल आणि बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये झालेल्या...