एकूण 116 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 16, 2019
इगतपुरी : पहिली बेटी अन् धनाची पेटी असं फक्त सामाजिक स्तरावर बोललं जातं, मुलगा जन्माला आला तर कुटुंबात पेढा वाटत आनंद व्यक्त केला जातो. परंतु आता विचारांच्या प्रगतीमुळे आणि सामाजिक समरसतेमुळे  मुलांबरोबर मुलीलाही तोच बहुमान देण्याचा प्रयत्न इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील गव्हांडे आदीवासी...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी...
ऑक्टोबर 14, 2019
लातूर : गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या मंदिराची दारे महिलांसाठी खुली झाल्याचे आपण पाहिले अन्‌ ऐकले आहे; पण लातूरात असे एक ज्ञानमंदिर आहे, ज्याची दारे महिलांनी पुरूषांसाठी खुली केली आहेत. बहिणाबाई वाचक मंच, असे या ज्ञानमंदिराचे नाव असून यात महिलांबरोबरच आता पुरूषांनी सहभागी होता येणार आहे....
सप्टेंबर 29, 2019
लोककलावंतांचा सन्मान करणारा, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा पुणे नवरात्र महोत्सव. त्याचे उद्‌घाटन रविवारी (ता. २९) विविध क्षेत्रांतील नवदुर्गांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा...  शास्त्रीय, अभिजात संगीतापासून ते महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे सादरीकरण असलेला हा महोत्सव यंदा...
सप्टेंबर 29, 2019
पिंपरी चिंचवडकरांसाठी सकाळ नवरंग उपक्रम  पिंपरी - गणेशोत्सवानंतर ज्या उत्सवाची प्रतीक्षा असते तो म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिक कला नसली तरी तो सांस्कृतिक उत्सव आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्यामुळे नवरात्र खुलते....
सप्टेंबर 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना शिकतं करणाऱ्या, आनंदी करणाऱ्या रचनावादी शाळा पालकांनी ओळखायला हव्यात. काय नेमके बदल होत असतात, अपेक्षित असतात, या नव्या, शास्त्रीय शिक्षणप्रणालीनं?  शिक्षण हक्क कायद्यांत म्हटलं आहे, ‘विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः मनकरणी नदीच्या तीरावर वसलेले तीन हजार लोकवस्तीचे दावचवाडी. द्राक्ष निर्यातदारांचे गाव म्हणून ओळख निर्माण केलीय इथल्या शेतकऱ्यांनी. थॉमसन सीडलेस वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. खंडेराव महाराजांची वांगेसट पौर्णिमेचा यात्रोत्सव हे गावाचे आणखी एक वैशिष्ट्य. गावातील खराब रस्त्यांनी...
ऑगस्ट 20, 2019
‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ लघुकथेची व्यवच्छेदक लक्षणे ओळखून राम कोलारकरांनी लघुकथा साहित्य परंपरेचा मागोवा घेतला. स्त्री-लेखकांनाही या परंपरेत मानाचे स्थान दिले. नुकतेच निधन झालेल्या कोलारकरांना त्यांच्या कन्येने वाहिलेली श्रद्धांजली. जागतिक लघुकथेचा ६० वर्षे अभ्यास करून मराठी वाचकांसाठी...
ऑगस्ट 17, 2019
भारताविषयी जगभरात कुतूहल, आस्था आहे, हे आपल्या सगळ्यांप्रमाणेच मीही ऐकून होते. पण म्हणजे नेमके काय, असा प्रश्‍न काही वेळा मनात येत असे. एरव्ही परदेशात गेल्यानंतर याविषयी थोडेफार कळते; पण स्पष्ट कल्पना येतेच असे नाही. आनंदाची गोष्ट अशी, की त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याची संधी मला मिळाली. ती संधी...
ऑगस्ट 13, 2019
मिरा रोड : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखोचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभर मदतीचा ओघ सुरू असतानाच मिरा-भाईंदर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे कजरी महोत्सवानिमित्त नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाला. शहरात सध्या अनेक राजकीय; तसेच सामाजिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतकार्यात राबत असतानाच...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई : रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा सण; परंतु भावाइतकीच बहीणदेखील आपल्या भावंडांची काळजी घेते, त्यांचं रक्षण करते. मोठी ताई किंवा फक्त मुली असलेल्या घरांमध्येही बहिणी या एकमेकींच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभ्या असतात आणि अशा बहिणींचा सन्मान करण्यासाठी...
जुलै 29, 2019
गडचिरोली : अवघे आयुष्य आरोग्य आणि समाजसेवेत झोकून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 30) डॉक्‍टर ऑफ लिटरेचर(डी. लिट.) पदवीने गौरविले जाणार आहे. सह्याद्री राज्य अतिथी गृह मुंबई येथे आरोग्य विज्ञान...
जुलै 17, 2019
खडकवासला(पुणे) : इमारतींच्या सीमाभिंती पडून झालेल्या अपघातात भिंतीच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रमाणे नऱ्हे येथे शैक्षणिक संस्थेची सीमाभिंत धोकादायक झाली आहे. याबाबत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने विविध खात्यांना पत्रव्यवहार करून ही बाब...
जुलै 17, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे. यात प्रमुख भर रोजगार क्षमतावृद्धी, उद्योजकता व कौशल्य विकासावर आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात मूलगामी स्वरूपाचे बदल करण्यात आले असून, या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास होऊ शकेल. तसेच, प्रत्येक...
जुलै 16, 2019
आज एकेकटा मनुष्यप्राणी हातात मोबाईल घेऊन गेल्या चाळीस-पन्नास हजार वर्षांच्या छोट्या-मोठ्या कंपूंत गप्पा मारण्याच्या, मिळून मिसळून गाण्याच्या, नाचण्याच्या परंपरांना फाटा देऊन या सगळ्यांची एका सायबरमंचावर प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गावर आहे. वै शाख वणव्यात गडचिरोली जिल्हा होरपळत होता. आम्ही...