एकूण 113 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
इगतपुरी : पहिली बेटी अन् धनाची पेटी असं फक्त सामाजिक स्तरावर बोललं जातं, मुलगा जन्माला आला तर कुटुंबात पेढा वाटत आनंद व्यक्त केला जातो. परंतु आता विचारांच्या प्रगतीमुळे आणि सामाजिक समरसतेमुळे  मुलांबरोबर मुलीलाही तोच बहुमान देण्याचा प्रयत्न इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील गव्हांडे आदीवासी...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य...
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : मुलांचे बालपण फार साधे असते. त्यांनी मोठ्यांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे, त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणे असते. दुर्दैवाने पालक आपल्या पाल्यांकडून अपेक्षाच करीत असतात. त्यामुळे मुलांमधला निरागसपणा कमी होतो आहे. कमीत-कमी मुलांसाठी...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : मातृशक्ती ही भारत देशाची परंपरा आहे. देशातील मातृशक्ती संतुष्ट असली तरी तिचा हवा तसा विकास झालेला नाही. मातृशक्तीचा सर्वांगीण विकास झाल्यावरच देशाला सुवर्णकाळ येईल, असे प्रतिपादन राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि दृष्टी ...
ऑक्टोबर 07, 2019
"ये रुखसार पिले से लगते हैं ना उदासी की हल्दी हैं हट जायेगी... तमन्ना की लाली को पकने तो दो, ये पतझड की छॉंव छट जायेगी...' गुलजारच्या या गाण्यातली उदासी की हल्दी. गुलाम अलीच्या गझलेतली "तेरी गली में सारा दिन दुख के कंकड चूनता हुं.' दुख के कंकड, अशी हलकी उदासी बरेचदा जीवनाला घेरून टाकते. ती जेव्हा...
ऑक्टोबर 06, 2019
अन्विता घरी आली, तेव्हा केळकरांनी तिला समजावलं : ‘‘आता तरी कार्तिकला पूर्ण विसर. आशयला जप. त्याच्याशी उत्तम संसार कर. यातच तुमच्या दोघांचंही आता हित आहे.’’ यावर अन्विता उद्वेगानं म्हणाली : ‘‘नाही मी कार्तिकला विसरू शकणार.’’ यावर केळकरांनी पेशन्स ठेवून तिला थोडं मायेनं समजवायचा प्रयत्न केला. मात्र,...
ऑक्टोबर 05, 2019
सावनेर (जि. नागपूर) : स्त्रीला वेदना म्हणजे काय ठाऊक असते. ती जीवनात कितीही खडतर प्रसंग आले तरी हार मानत नाही. आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; मात्र एकाही शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली नाही. स्त्रीच स्त्रीच्या...
सप्टेंबर 27, 2019
फ्लोरीडा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप न मिळणे ही सर्वांचीच समस्या झाली आहे. अपु-या झोपेमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, वजन वाढणे, निराशा वाढणे असे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. मात्र या सर्वांसोबतच अपुरी झोप लैंगिक जीवनावर देखील परिणाम करू शकते, असा निष्कर्ष ...
सप्टेंबर 23, 2019
जनजागरुकता : चाईल्ड लाईनच्या चित्रकला स्पर्धेत संज्योत प्रथम  नाशिक : मविप्र समाजाच्या समाजकार्य महाविद्यालय, नवजीवन फाउंडेशन संचालित चाईल्ड लाईनतर्फे बालकांच्या समस्यांवर आधारित चित्रकला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मराठा हायस्कुलची संज्योत गवते हिने पटकावले. या चित्रकला स्पर्धेमध्ये बालचित्रकारांनी...
सप्टेंबर 22, 2019
मानवी संस्कृतीचा खोलवर विचार करणारी आपली भारतीय संस्कृती खरोखरच महान आहे. सृष्टीमध्ये ८४ लक्ष योनी आहेत, असं आपली संस्कृती मानते. आपली संस्कृती मनुष्यजन्म किंवा मनुष्ययोनी ही सृष्टीतली एक मोठी उत्क्रांत अवस्था समजते. मनुष्यजन्म हा अतिशय दुर्लभ आहे आणि या मनुष्यजन्माचं सार्थक कशात आहे, हे सर्व संत...
सप्टेंबर 18, 2019
कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश... स्वाती हुद्दार *अरुणाताई सातव्या वैदर्भीय...
सप्टेंबर 07, 2019
सध्या आपण राहतो ते तंत्रज्ञानाचे सुवर्णयुग आहे. तंत्रज्ञानाने जगाचे रूपांतर एका छोट्याशा खेड्यात केलेले आहे. तंत्रज्ञानामुळेच हजारो मैल दूर बसलेल्या आपल्या प्रियजनांशी आपल्या घरात आरामात बसून संवाद साधणे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे आणि हा संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर व्हिडिओ कॉल्सच्या...
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
सप्टेंबर 05, 2019
यवतमाळ : आपत्ती व्यवस्थापन कार्यात पुढे असणाऱ्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या "टीम राहत'ने पूरग्रस्त 25 गावांत मदतकार्य केले. विद्यार्थ्यांनी गाळ काढण्यापासून तर रुग्ण तपासणीपर्यंत सर्वच आघाड्यांवर कामे करून सांगली, कोल्हापूर भागांत सेवाकार्याचे जाळे निर्माण केले आहे. सांगली,...
सप्टेंबर 04, 2019
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे, त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचा कानोसा घेणारा लेख... ...और जहॉं भी आझाद रुह की झलक पडे समझना वह मेरा घर है मानवतावादाचे पुरेपूर प्रतिबिंब उमटलेली अमृता प्रीतम यांची "मेरा पता' ही कविता,...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे केलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. यानिमित्ताने मेळघाटातील जैवविविधतेचे पुरावे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शुष्क पानगळी वनांमध्ये आर्द्र वनांचा प्रकार केवळ मेळघाटातच आढळत...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
सप्टेंबर 01, 2019
आईला काय आवडायचं, ती कशी हळवी होती आणि जणू देवाचंच रूप कशी होती हे कविताताई मला तन्मयतेनं सांगत होत्या. मुली आईविषयी किती हळव्या असतात आणि त्याच हळव्या मुलीची आई जर आता हयात नसेल तर जुन्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर होऊन त्या किती भावुक होतात हे मी प्रत्यक्ष पाहत होतो... बुलडाण्याची सकाळ...