एकूण 59 परिणाम
जून 04, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे.  भारतीय...
मे 29, 2019
पुणे - वाऱ्याची दिशा व वेग, तापमान, आर्द्रता, ढग यांचा अभ्यास वेधशाळेतले शास्त्रज्ञ, तज्ज्ञ वेगवेगळ्या यंत्रांच्या साह्यानं घेतात. पर्जन्यमापक वापरून पावसाचं प्रमाण व वातकुक्कुट यंत्राच्या माध्यमातून वारा कोणत्या दिशेनं येऊन कोणत्या दिशेला जातो आहे, हे पाहणं आपल्याला मजेदार वाटू शकतं. पण,...
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक...
एप्रिल 26, 2019
शस्त्रक्रियांबद्दल कोणीतरी त्याचा अनुभव म्हणून काही तरी सांगते. त्यातून गैरसमज पसरत जातात. आपल्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेला असेल, तर आसपासच्यांची अशास्त्रीय मते-सल्ला ऐकण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्या शस्त्रक्रियेचे धोके, फायदे समजून घेणेच उत्तम ठरेल. ‘डॉक्‍टर, मणक्‍याच्या...
मार्च 15, 2019
बालक-पालक मराठी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं, तेव्हा नेमकं काय घडतं, हे समजून घ्यायचं तर प्रथम दोन्ही भाषांची वैशिष्ट्य व वेगळेपण समजून घ्यायला हवं. त्या संदर्भात प्रा. उमाकांत कामत यांचं विश्‍लेषण असं आहे : इंग्रजीत केवळ २६ मुळाक्षरं आहेत, ५ स्वर व २१ व्यंजनं. मराठीत १२ स्वर आहेत...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 09, 2019
मुलगी नाही मुलगाच आहे माझा...  आपल्या मुलीविषयी असं अभिमानाने सांगण्याची पद्धत आहे आजकाल. त्यातला अभिमान ही गोष्ट योग्यच, पण मुलगाच आहे असं का सांगायचं? तिच्या मुलगी असण्यात काय प्राॅब्लेम आहे?    पण आपल्यात भिनलेली पुरुषप्रधान संस्कृती असं डोकं वर काढते अनेकदा. परिस्थिती बदलतेय असं मान्य करुनही....
मार्च 09, 2019
गो ष्ट जेवढी तिची, माझी आहे, तेवढीच ती समाजाची आहे. काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेहमीचे सोहळे, पुरस्कार, प्रतीकात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. समारंभ संपले; पण मनातले काहूर तसेच राहिले. त्या अस्वस्थतेला शब्दरूप देण्याचा केलेला हा प्रयत्न. समाज मान्य करतो प्रवासाचा प्रत्येक क्षण. जो...
फेब्रुवारी 15, 2019
देशातला पहिला तृतीयपंथी जाहीर विवाह करणाऱ्या जोडप्याशी निवांत गप्पा मारल्यानंतर याची अनेक उत्तरे मिळाली. या जोडप्यामधील माधुरी ही तृतीयपंथी आहे आणि जय हा इतरांप्रमाणे सर्वसामान्य पुरुष. यांच्या प्रेमविवाहाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांचेही आयुष्य अगदी सुखात, आनंदात सुरू आहे. माधुरी म्हणते, "मी...
जानेवारी 26, 2019
औरंगाबाद -  मुलगाच हवा या मानसिकतेतून दर हजारी मुलींचे प्रमाण चिंताजनक असल्याने "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' अभियान सुरू करण्यात आले. याचा परिणाम म्हणून गेल्या चार वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. चार वर्षांपूर्वी दर हजारी 919 असे लिंग गुणोत्तर होते. त्यात वाढ होऊन ते 981...
जानेवारी 12, 2019
पुणे : मागील तीस वर्षांपासून जगातील सर्वात जलद आर्थिक विकास आपल्या देशामध्ये झाला आहे. परंतु, यामधून संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मात्र तेवढ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. याचा परिणाम महिलांच्या रोजगारावरही झाला आहे, असे प्रतिपादन प्रा. जयती घोष यांनी केले.  विचारवेध असोसिएशन आणि एस. एम....
डिसेंबर 15, 2018
बारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो? शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे अशा महत्त्वपूर्ण टिप्सपासून ते कामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ या सल्ल्यापर्यंत अभिषेक ढवाण या...
डिसेंबर 07, 2018
जुन्नर -  नारायणगाव ता.जुन्नर येथील प्रा.जयवंत कठाळे यांना दुर्लक्षित ठिकाणी सतीशिळा आढळून आली असल्याचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. नारायणगाव येथील श्री संतसेना महाराज समाज मंदिरा जवळून मीना नदीवरील नेवकर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेकडील दुर्लक्षित अशा...
नोव्हेंबर 24, 2018
मंगळवेढा - येथील संत कान्होपात्रा यांच्या भूमिकेतून मला अध्यात्माची अनुभूती आली. त्यामुळे कान्होपात्रेच्या उत्कट भावानुभवाच्या दर्शनाने साकारलेले मंगळवेढा अध्यात्मिक गाव असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. कान्होपात्राच्या मूर्तीचे आनावरण...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
सप्टेंबर 16, 2018
दलित शब्दाविषयी राष्ट्रीय माध्यमांत जे काही प्रसिद्ध होत आहे ते सर्व खरे नाही. दलित म्हणजे कोण आणि अनुसूचित जाती, जमाती म्हणजे काय? याचा अभ्यास खोलवर जाऊन केला पाहिजे. ‘दलित’ या शब्दाची व्याख्या केवळ बौद्धांपुरतीच मर्यादित नाही. आता नागपूर खंडपीठानेही ‘दलित’ हा शब्द वापरण्यासच मनाई करणारा आदेश दिला...
ऑगस्ट 25, 2018
नवी दिल्ली : लठ्ठपणा हा आता सार्वत्रिक झाला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लठ्ठ व्यक्ती दिसतात. लठ्ठ होण्याचा कारणे वेगवेगळी असली जाड माणूस हा चेष्टेचा विषय ठरत असल्याने अशा माणसांमध्ये न्यूनगंड, नैराश्‍य दिसून येते. महिलांमध्ये हो प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट, औषधे असे अनेक...