एकूण 160 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
बीड : गाव आणि तांड्याला जोडणाऱ्या नदीवरील पुल वाहून गेल्याने मतदारांनी चप्पूतून येऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव येथे महसूल प्रशासनाने ही सोय करुन दिली.  माजलगाव विधानसभा मतदार संघातील खळवट लिंबगाव (ता. वडवणी) ग्रामपंचायती अंतर्गत भिमाई तांडा आहे. या तांड्यावरील...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर...
सप्टेंबर 30, 2019
किल्लारी(जि. लातूर) : महाप्रलयकारी भूकंपाला 26 वर्षे पूर्ण झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या जुने किल्लारी गावठाणातील स्मृतिस्तंभ येथे त्यातील मृतांना सोमवारी (ता. 30) प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.   किल्लारी आणि परिसरातील 52 गावांत ता. 30 सप्टेंबर 1993 रोजी आलेल्या भूकंपात चौदा हजारांवर...
सप्टेंबर 30, 2019
बदनापूर (जि.जालना) -  बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 29) प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, या प्रशिक्षणाला 920 पैकी 860 कर्मचारी हजर होते. तर तब्बल 60 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. दरम्यान, शनिवारी (ता. 28) झालेल्या निवडणूक...
सप्टेंबर 19, 2019
वरोरा (चंद्रपूर) : शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांना घेऊन रत्नमाला चौकात गुरुवारी (ता.19) कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे येथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतूक तब्बल चार...
सप्टेंबर 09, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : तालुक्‍यातील कोरेगाव येथील शाळा जिल्ह्यातील आयएसओ मानांकित शाळांपैकी एक आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवित दररोज शाळेला ये-जा करावी लागत आहे.  गावापासून शाळेचे अंतर जवळपास एक किलोमीटर आहे. शाळेच्या आजूबाजूला जवळपास 50 घरांची वस्तीही आहे....
सप्टेंबर 03, 2019
मितभाषी मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी टोकदार भाष्य करून मोदी सरकारच्या धोरणांवर घणाघात केला. वास्तविक, अशाच प्रकारची टीका अनेक अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीही केली आहे. परंतु, ऍकॅडमिक क्षेत्रातील जाणकार एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधतात, तेव्हा त्यांना राजकीय वास्तवाचे भान नसते, असे सांगून...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : महानगरपालिकेने मुंबईतील "बेस्ट' आगारांच्या 50 मीटर परिसरात, तसेच पाच प्रमुख रस्त्यांवरील काही भागांत "नो पार्किंग झोन' जाहीर केल्यानंतर शुक्रवारी, पहिल्या दिवशीच 28 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनमालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने होणाऱ्या या...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : तुम्ही शहरासह उपनगरातल्या कुठल्याही रस्त्यावर जा. तिथे तुम्हाला मोकाट जनावरांचे दशर्न झाले नाही, तरच नवल!...अरेरे नुसते दर्शनच नव्हे, तर ही जनावरे हमखास तुमचा 'रास्ता रोको'ही करतील.अगोदरच वाहतूक कोंडीची डोकेदुखी आणि त्यात ही भर.मोकाट जनावरांसाठी महापालिकेकडे इनमिन एकच कोंडवाडा आहे. त्यात...
ऑगस्ट 11, 2019
पुणे ः येथील मुळा रस्ता सर्कलजवळ असलेल्या ओढ्यात अज्ञातांकडून मेलेली जनावरे टाकण्यात येत असल्यामुळे आठ मुळा रस्ता येथील वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून येथील रहिवाशांना घरात राहणे मुश्‍किल झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष...
ऑगस्ट 09, 2019
धुळे : धुळे जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरले असून बरेच पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असून वाहतूक खंडित झाली आहे. वेध शाळेने वर्तविलेला अनुमान खरा निघाल्याने सतर्क जिल्हा सरकारी यंत्रणेने आज (शुक्रवार) प्रमुख नद्यांकाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केल्याने अनुचित घटनांना पायबंद बसू शकला. अशात...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापुरातील पूर परिस्थितीतून नागरिकांचा बचाव करण्यामध्ये पोलिसांना पूर्णपणे यश येत आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांचा बचाव करण्यात आलेला आहे. नागरिकांना पुरातून वाचल्यानंतर त्यांच्या मागे राहिलेल्या मालमत्तेबाबत काळजी वाटणे साहजिक आहे, परंतु कोल्हापूर पोलीस दलातर्फे आम्ही आपणास आश्वस्त करू इच्छितो...
जुलै 27, 2019
तळेगाव स्टेशन(पुणे) : गुरुवार पासून तळेगाव परिसरात चालू असलेल्या संततधार पावसामुळे हिंदमाता रेल्वे भुयारी पुलाखाली पाण्याचा प्रचंड डोह साचून ओसंडून वाहू लागला.खबरदारी म्हणून नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी अडथळे लावून हा मार्ग वाहतुकीस बंद केला. महिनाभरापूर्वी झालेल्या उद्घाटनानंतर नागरिकांच्या...
जुलै 24, 2019
सौंसर  : पाऊसच पडला नसल्याने श्रावण महिन्यात भरणारी पंचमढी येथील नागद्वार स्वामी यात्रा यंदा होशंगाबाद जिल्हा प्रशासनाने तात्पुरती स्थगित केली आहे. यात्रेदरम्यान खाद्यान्न व साहित्य वाटपासाठी संपूर्ण राज्यातून दाखल झालेले ट्रक तसेच गाड्याही पंचमढी येथेच थांबवून ठेवण्यात आल्या आहेत....
जुलै 07, 2019
जपानच्या ओसाका इथं भर पावसात यंदाची जी 20 परिषद पार पडली ती अनेक प्रश्‍नांनी झाकोळलेली होती. मात्र, जगातील सत्तास्पर्धेचं स्वरूप बदलत असल्याचं या परिषदेनं आणखी ठोसपणे पुढं आणलं. व्यापारयुद्धाला अर्धविराम हे जी 20 चं जगासाठी महत्त्वाचं फलित. परिषदेपेक्षा त्यानिमित्तानं झालेल्या नेत्यांमधील भेटी-...
जून 17, 2019
यवतमाळ : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदाप्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगरपालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक उपसंचालकांनी...
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे...
एप्रिल 25, 2019
उमरगा : तालुक्यातील कराळी पाटीजवळ तीन दिवसापूर्वी झालेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेनंतर तलमोड ग्रामस्थांनी पोलिस वाहन व अग्नीशमन गाडीवर केलेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या लोकांची गुरुवारी (ता. 25)  धरपकड करताना मारहाणीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम...