एकूण 23 परिणाम
जून 10, 2019
कोणार्कचे सूर्यमंदिर पाहिले आणि मनात आले निसर्गाचे कालचक्र असेच आहे. दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस हे चक्र असेच चालू आहे. ऋतू आपले कार्य करतच आहे. बालपण, तारुण्य व म्हातारपण हे नैसर्गिकरीत्या येतच राहणार. शालेय जीवनात शिकलेले गणितातील काळ, काम, वेग हे चक्रसुद्धा आपण सोडवत असतो. वर्तमानकाळ,...
एप्रिल 09, 2019
गॅसचा वास आला म्हणून तो बंद केला होता; पण तेवढे पुरेसे नव्हते. कापूर पेटवताच अंगावर जाळ आला. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, की "जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे.' समर्थांचा अनुभव आपणही रोजच घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येतात. त्याला धीराने तोंड...
मार्च 04, 2019
हिंदी "गीतरामायणा'च्या निमित्ताने कुंभमेळ्याचा योग आला. एरव्ही कुंभमेळ्यात स्वतःहून जाण्याचा धीर केला नसता. कुंभच्या दोन महिने आधी गंगेच्या किनारी नदी ज्या दिशेने वळते, त्याच्या विरुद्ध दिशेला या मेळ्याची छावणी असते. आमची राहायची व्यवस्था स्वामी अवधेशानंद गिरीजींच्या शिबिरात होती....
जानेवारी 22, 2019
रद्दी म्हटले तर घरातील अडचण. वेळच्या वेळी निपटाराही करता येत नाही. मग साचत जाते; पण या रद्दीचे दान करता येते. आपण अनेकदा आपल्या अवतीभवती, रस्त्यावर, अनाथाश्रमात हृदय पिळवटून जाईल अशी दृश्‍ये पाहतो आणि मग डोक्‍यात विचार येतो, की आपण यांच्यापेक्षा किती सुखी आहोत. पण बघितलेली दृश्‍ये काही केल्या...
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे...
ऑक्टोबर 04, 2018
जगण्याचा कंटाळा असा त्यांना नसतोच, त्या सतत सेवेत रमलेल्या असतात. नव्वदीत असूनही माझ्या मैत्रिणीचे हात कधीही स्वस्थ बसत नाहीत. नलिनीआक्का फडणीस म्हणजे हसरा चेहरा नि गोड बोलणे. आक्कांनी समर्थ रामदासांच्या म्हणण्याप्रमाणे संसार करावा नेटका तर केलाच, पण बरोबर परमार्थही साधला. पूर्वी...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
मे 01, 2018
अनोळखी प्रदेशातून येऊन त्या पुण्यातल्याच झाल्या. त्या बोलत तेव्हा एखादे विचारतत्त्वच सांगत. ऐकणाऱ्याची विचारप्रक्रिया बदलत असे. उत्तम विचारांच्या प्रकाशात तो कर्ममार्गी होत असे. पुणे श्री सारदा मठाच्या अध्यक्षा योगप्राणा माताजींनी देह ठेवल्याची बातमी समजली आणि अनेकांचा मानसिक आधार नाहीसा झाल्याची...
जानेवारी 09, 2018
काहीजणी अल्पशिक्षित, तर काही उच्चशिक्षित. सगळ्याच मध्यमवर्गीय. संस्कृतशी कधी संबंध आलेला नव्हता; पण त्या चिकाटीने स्तोत्रे, सूक्ते शिकत गेल्या आणि हडपसर परिसरात मंत्रपुष्प उमलले. कोथरूडमधून आम्ही हडपसरला राहायला आलो. अगदी नवखा, अनोळखी परिसर; पण आमच्या शेजारी कांता गायकवाड यांनी परिसराचा परिचय करून...
जानेवारी 05, 2018
शाळेची सहल गोव्यात गेली होती. पहिल्यांदा नादुरुस्त गाडीतील शिक्षक मागेच राहिले. तर नंतर परतीच्या मार्गावरच मुले हरवली. संपर्काची साधनेही नव्हती. अजून त्या आठवणीनेही काळजात धस्स होते. दापोडीतील स्वामी विवेकानंद व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका होते. एकदा शाळेची सहल गोव्याला गेली होती....
डिसेंबर 07, 2017
आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी मिळत जातात. पण आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या मित्रमैत्रिणींमधील नातं अधिकच घट्ट असतं. खूप न भेटताही, सगळे अगदी आत्मीय असतात. खळ्ळ- खट्याक .. हा आवाज होता आम्ही लहानपणी विट्टीदांडू खेळताना फोडलेल्या खिडक्‍यांच्या काचांचा. "1205, शिवाजीनगर' ही आमची गल्ली. माझे वडील...
ऑक्टोबर 22, 2017
दोन प्रयत्नांनंतर दहावीची परीक्षा कशीबशी पास झालो होतो. दहावीपर्यंत पायात स्लीपर, आदल्या वर्षीचीच खाकी पॅन्ट अन्‌ पांढऱ्या शर्टाने बऱ्यापैकी साथ दिली होती. पण, आता कॉलेजला जायचे म्हणजे बऱ्यापैकी चप्पल, चांगले कपडे आले. आता काय करायचे? आई-दादाला पैसे मागणे जमणारे नव्हते. दोघांचेही कष्ट पाहात होतो....
जुलै 05, 2017
खानदेशातील नशिराबादमध्ये खानदेशी वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतातच, पण या छोट्याशा गावाचे स्वतःचेही वैशिष्ट्य आहे. उंच आड, झिपुअण्णा, बालुमिया अशा स्थानांनी हे गाव वेगळे ठरते आहे. जळगाव-भुसावळ राज्य महामार्गालगत वसलेले नशिराबाद. गाव तसे छोटेसे, पण सुंदर. जळगाव व भुसावळ ही दोन्ही शहरे जवळ असल्यामुळे येथे...
मे 06, 2017
"नर्मदेऽ हर' असा नारा देत नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. पण सर्वांनाच पूर्ण परिक्रमा शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी परिक्रमा हा एक पर्याय आहे. मात्र तिलकवाडा ते रामपुरा परिसरातील ही परिक्रमा केवळ चैत्रातच असते. परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. आपल्या आराध्य दैवताला उजव्या बाजूला ठेवून...
फेब्रुवारी 07, 2017
गेल्या 16 वर्षांहून जास्त स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कराड येथील घारेवाडी या छोट्याशा गावात ज्येष्ठ समाजसेवक व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या शिवम या सामाजिक संस्थेतर्फे समाजातील तरुण-तरुणींसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरास...
फेब्रुवारी 07, 2017
माझ्या नजरेतून  "मनाचे श्‍लोक' ऐकवणाऱ्या समर्थ रामदास स्वामींपाशी मन धाव घेते. दासनवमी जवळ आली की "नावरे मन आता' अशी भक्तांची मनःस्थिती होते आणि पावले अधीरपणे सज्जनगड गाठतात. दासनवमीच्या उत्सवात रंगतात.  फेब्रुवारी महिना सुरू झाला की आठवण होते ती सज्जनगडावर साजऱ्या होणाऱ्या दासनवमीच्या...
डिसेंबर 22, 2016
"स्कूल रियुनिअन'च्या निमित्ताने बरोबर 30 वर्षांनी आमची 10वीची बॅच शाळेत एकत्र जमली होती. आयुष्यातील सगळ्यात तरल, संवेदनाक्षम, जीवन घडवणारा महत्त्वाचा काळ आम्ही या शाळेत जगलो. इथला प्रत्येक कोपरा एके काळी आमच्या परिचयाचा होता. पण आता मात्र तिथली प्रत्येक गोष्ट अनोळखी, परकी वाटत होती. शाळेच्या त्या...
डिसेंबर 15, 2016
पुढचा क्षण कसा असेल, आपण टाकणार असलेले पाऊल कुठे नेणार आहे, हे आपणाला त्याक्षणी कळतच नसते. आपण विश्‍वासाने वावरत असतो, कारण आपल्याला पुढचे काहीच कळत नसते.  स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित गुहेपाशी मी माझ्या पतींबरोबर उभी होते. गुहेतील रहस्य खुणावत होते; पण पुढच्या क्षणाचे गुपित आम्हाला माहीत नव्हते....
नोव्हेंबर 30, 2016
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव 30 नोव्हेंबर पासून 4 डिसेंबरदरम्यान साजरा करण्यात येत आहे. आजपासून (दि. 30) सुरु होणा-या मार्तंडभैरव षडरात्रोत्सव (सहा दिवसांचा उत्सव) उत्सवाची सांगता चंपाषष्ठीने होते. चंपाषष्ठी हा श्रीखंडोबाच्या उपासनेतील महत्वाचा...
नोव्हेंबर 24, 2016
बुलबुलांची जोडी घरात आली आणि घरातलीच झाली. दरसाल नेमानं यायची. घरटं दुरुस्त करायची. पिलं उडून गेल्यावर काही काळ त्या रिकाम्या घरट्यात उदासी असायची. मग पुन्हा नव्यानं किलबिल. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी आमच्या घरी बुलबूलच्या जोडप्याचं पहिल्यांदा आगमन झालं. त्याआधी कबुतरं आणि कावळ्यांनी उच्छाद मांडला...