एकूण 76 परिणाम
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
मे 29, 2019
सुहृदांनी व्याजासह फेडले १४ लाख रुपये सांगली - सलगरे येथील शिक्षक राजू सातपुते (वय ३२) यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. वृद्ध आई-वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा संसार उघड्यावर पडला. त्यातच घरासाठी काढलेल्या १३ लाख ६८ हजार रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मार्च 28, 2019
नागपूर - मुलांच्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अनेक शिक्षकांनी बालसंगोपन रजा घेतली. ऐन परीक्षेच्या काळात स्वत:च्या मुलासाठी रजा घेताना शिक्षकांनी इतरांच्या मुलांना वाऱ्यावर सोडले. आपला मुलगा तुपाशी, दुसऱ्याचा राहो उपाशी, अशीच काहीशी भूमिका शिक्षकांनी घेतल्याचे चित्र आहे. शिक्षकांच्या या स्वार्थी...
मार्च 15, 2019
वडील नाथा मेहेर कृषी विभागात शिपाई होते. आई मंजुळाबाई शेतमजूर. मुलींनी खूप शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभे राहावे, ही त्यांची इच्छा माझ्या मनात बालपणापासून घर करून राहिली. गरिबीतही लाड व शिक्षणाच्या खर्चात काटकसर केली नाही. अभ्यासात सामान्य असणारी मी आईवडिलांच्या प्रेरणेमुळे पाचवी ते दहावीत सतत...
मार्च 07, 2019
औरंगाबाद - साडेदहा-अकराची वेळ. भरधाव ऑटो रिक्षा आली ती थेट शिक्षण विभागाकडे गेली. पोलिसांना शंका आल्याने पाठलाग केला; मात्र ते पाहून रिक्षा सीईओंच्या दालनाकडे निघाली. रिक्षातून उतरलेल्या शिक्षकाने तोंडाला विषाची बाटली लावलेलीच होती; मात्र काहींनी प्रसंगावधान राखून हाताला धक्‍का मारून बाटली खाली...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 22, 2019
बोर्डी - २०१८-१९ या वर्षातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व अधिकारी पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये जागृती अवनीश पाटील यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व अधिवेशनात हा सन्मान महाराष्ट्र...
फेब्रुवारी 19, 2019
१८ व्या शतकापासून तडफदार बाण्याने कडाडणाऱ्या बुधगावच्या शाहीर विभूते घराण्यातील पाचव्या पिढीतील शाहीर प्रसाद विभूतेचा डफ आता ‘मॉरिशस’मध्येही वाजणार आहे. प्रसादच्या शाहिरीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद पाहून मॉरिशस येथील मराठी सांस्कृतिक केंद्राने त्याला आणि पथकाला निमंत्रित केले आहे. प्रसादचे...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 08, 2019
नागपूर - शिक्षक युवतीला प्रियकर कापड व्यापारी जेटानंद ऊर्फ जय सुरेशकुमार नारायणी (३२, रा. सिंधी कॉलनी, खामला) या युवकाने युरोप व दुबईत नेऊन बलात्कार केला. प्रतापनगर पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सोमलवाड्यात राहणारी २६ वर्षीय युवती ऊर्वशी (बदललेले नाव) ही शिक्षिका असून,...
फेब्रुवारी 07, 2019
मार्च महिन्यात शालान्त परीक्षा सुरू होत आहे. या वर्षीपासून या परीक्षा ‘ज्ञानरचनावाद’ या तत्त्वानुसार होत आहेत. शिक्षणातून सांगकाम्यांच्या फौजा तयार करायच्या नसून सर्जनशील मनुष्यबळ घडवायचे आहे. त्या दृष्टीने या संकल्पनेचे मर्म विशद करणारा लेख. २ ००५ चा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा व २०१० चा राज्य...
जानेवारी 28, 2019
नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला....
जानेवारी 28, 2019
ऐरोली - देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना दिघ्यातील संजय गांधी नगरातील ज्ञानविकास शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र दगडधोंडे तुडवीत झेंड्याला सलामी दिली. दिघा येथील पॉवर हाऊसच्या बाजूला असलेल्या या शाळेसमोरील मैदानात के. रहेजा कंपनीने मोठमोठे दगड आणि माती टाकून शाळेची जागा हडप...
जानेवारी 21, 2019
नारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले? अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण घेऊ शकतात. हे दाखवून दिले आहे, जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्या पुढाकारातून ऊस तोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांच्या...
जानेवारी 19, 2019
पुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची...
जानेवारी 17, 2019
सोलापूर - २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी बंधनकारक केलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) चे बोगस प्रमाणपत्र काही शिक्षकांकडून सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्याचे आदेश परिषदेच्या आयुक्तांनी शिक्षण संचालकांना...
जानेवारी 04, 2019
पुणे - मराठी शाळांमधील विद्यार्थी चुणूकदार व्हावा म्हणून अनेक शिक्षक झटत असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रमातून ते शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत असतात. याच पथदर्शी प्रयोगांचा आधार घेत इतर शाळांना, शिक्षकांना त्यांचे अनुकरण करावे म्हणून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील...