एकूण 113 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : अपुरे रिक्षाथांबे, मर्यादित प्रवासीसंख्या, बेकायदा प्रवासी वाहतूक; तसेच परिसरात सुरू असलेली सार्वजनिक परिवहन सेवा याचा फटका रिक्षाव्यवसायाला अगोदरच बसला होता. त्यातच खुल्या परवाना धोरणामुळे रिक्षा व्यवसाय करणे कठीण झाल्याचे लक्षात आल्याने परवाने खरेदी कारण्याकडचा कल कमी झाल्याची माहिती पंकज...
सप्टेंबर 08, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अगदी आयत्या वेळी भरण्याचा करदात्यांचा कल असतो. यंदा विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४९ लाख लोकांनी विवरणपत्र भरलं. विवरणपत्र कुणी भरावं लागतं, ते उशिरा भरल्यामुळं कोणते तोटे होऊ शकतात आणि ते वेळेत भरल्यामुळं काय फायदे होतात आदी गोष्टींचा लेखाजोखा...
सप्टेंबर 03, 2019
गुहागर - केंद्र शासनाने अगरबत्ती आणि ज्वलनासाठी आवश्‍यक सुगंधी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले असल्याने देशातील कुटीरोद्योगाला चालना मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे चीन आणि व्हिएतनाममधून मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या अगरबत्ती काड्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. २०१८ मध्ये सुमारे...
ऑगस्ट 22, 2019
जम्मू, काश्‍मीर व लडाख यांच्यातील विकासाचा असमतोल दूर करण्याचे आव्हान आता पेलावे लागणार आहे. चिरस्थायी विकास साधणे व विकासाची गुणवत्ता वाढवणे यासाठी शिक्षण, कौशल्यविकास, वीजनिर्मिती यांना प्राधान्य द्यावे लागेल. विकासासाठी या नव्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेणे गरजेचे आहे. जम्मू-काश्‍मीरचे ३७०वे...
ऑगस्ट 07, 2019
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या स्थापनेचे विधेयक नुकतेच मंजूर झाले. परंतु त्यातील अनेक कलमे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांवर आणि डॉक्‍टरांवर अन्याय करणारी, लोकशाहीच्या तत्त्वांना मुरड घालणारी आहेत. नव्या तरतुदींची त्यादृष्टीने समीक्षा व्हायला हवी. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (राष्ट्रीय वैद्यकीय...
जुलै 21, 2019
थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतात, त्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती, जगभरात या संदर्भात काय काम चालू...
जुलै 17, 2019
पुणे - राज्यातील साहित्य, संगीत क्षेत्रांसह चित्रपट उद्योगास सर्वाधिक आर्थिक झळ पोचविणाऱ्या पायरसी वेबसाइट्‌सवर महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने (एमसीडीसीयू) कारवाई करण्यास सुरवात केली आहे. आठ ते नऊ महिन्यांत तीनशे पायरसी वेबसाइट्‌स बंद केल्या आहेत. भविष्यातही कारवाई सुरू राहील, असे संकेत...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...
जुलै 07, 2019
औरंगाबाद - पेठे ज्वेलर्समधून अठ्ठावन्न किलो सोने लंपास करणारा मुख्य सूत्रधार राजेंद्र जैन याची निराला बाजार परिसरातील अपार्टमेंटमध्ये यक्ष कलेक्‍शन, बी अँड बी कलेक्‍शन, आनंद गारमेंट अशा तीन नावांनी व्यवसाय सुरू होते. तो पाच हजारांच्या साड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दहा ग्रॅमचा चांदीचा शिक्का भेट...
जुलै 01, 2019
पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ बंधूनी सेंद्रिय शेती सुरू केली. कमी पाण्यात शाश्वत उत्पादनासाठी फळबाग, ठिबक सिंचन याचाही अवलंब केला. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन सुरू केले आहे. देशी...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 25, 2019
दीड वर्षात १५६ गुन्हे; सुशिक्षित जमान्यात आजही घडताहेत त्रासदायक घटना सातारा - व्यवसाय करायचा आहे... गाडी घेणार आहे... घर बांधायचेय... कर्ज फेडायचे आहे... माहेरून पैसे आण... काय दिले तुझ्या आई-बापाने... यांसह अनेक वाक्‍ये नवविवाहितेचे काळीज चिर्रर्र करून टाकतात. हे प्रकार हुंडा प्रतिबंधक कायद्याने...
जून 20, 2019
सांगली - शिवीगाळ केल्याच्या कारणातून आईचा खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, आटपाडी)  याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. खटल्याची पार्श्वभूमी अशी, की...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 12, 2019
केवळ कठोर कायदे केले म्हणजे बलात्कार आणि खुनाच्या प्रकारांना आळा बसत नाही, याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत आहे. त्यामुळेच कठोर कायद्याच्या जोडीनेच इतर उपायांवरही भर द्यायला हवा. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात अखेर तिघांना जन्मठेपेची शिक्षा...
जून 06, 2019
तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. तसेच माशांवरही याचा परिणाम दिसतो. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून या वनस्पतीचे...
जून 04, 2019
पुणे - पुण्यात कॉर्पोरेट कल्चर झपाट्याने वाढत असताना कंपन्यांकडून कधी ग्रॅंड सक्‍सेस पार्टी, तर कधी ॲन्यूवल पार्टीच्या निमित्ताने मेजवानी दिली जाते. आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी मित्र, मैत्रिणींसह आप्तस्वकीयांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी देण्याकडे कल वाढला आहे. पुण्यात १४ महिन्यांत २ हजार...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून...