एकूण 102 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ही अतिशय उत्तम वेळ आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीत तुम्ही खरेदीची संधी साधू शकता. सध्या मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडासह इतर मोठ्या कंपन्यांनी कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे. कंपन्या आणि डिलर यांच्याकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात...
सप्टेंबर 15, 2019
आपल्या गुंतवणुकीचा काटेकोरपणे आढावा, त्यातील नफा-तोटा, अपेक्षा, गुंतवणूक तशीच ठेवण्याचा कालावधी आणि परतावा यांचा मेळ घालत इक्विटी योजनांचा मागोवा घेत आणि आर्थिक स्थिती पारखून निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकते. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. ओघाने म्युच्युअल...
सप्टेंबर 09, 2019
सोन्याप्रमाणेच मौल्यवान असलेल्या चांदीने प्रतिकिलो ५१ हजार रुपयांच्या भावपातळीला नुकताच स्पर्श केला. गेल्या एका महिन्यात चांदीत सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ नोंदली गेली. चांदी-सोन्याच्या भावातील गुणोत्तर कमी होत चालले आहे. सोन्याने सहा वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे, पण दुसरीकडे चांदीने...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुद्रा योजनेबाबत केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ २०.६ टक्के, म्हणजे पाचमधील केवळ एका लाभार्थ्याने यातून स्वतःचा नवा उद्योग सुरू केला...
सप्टेंबर 03, 2019
जुलैत आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ केवळ २.१ टक्के नवी दिल्ली - विकासदरातील घसरणीनंतर आर्थिक आघाडीवर देशाला दुसरा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कामगिरी मोठ्या प्रमाणात खालावली असून, जुलै महिन्यात आठ पायाभूत सेवा क्षेत्रांत केवळ २.१ टक्के वाढ नोंदवली आहे. या...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली - घटलेली मागणी, रोडावलेली विक्री आणि रोजगारनिर्मितीला बसलेली खीळ, यामुळे कारखाना उत्पादन क्षेत्रातील हालचालींचा वेग ऑगस्टमध्ये मंदावला आहे. तो गेल्या १५ महिन्यांतील नीचांकी स्तरावर घसरल्याचे एका मासिक पाहणीतून समोर आले आहे. आयएचएस मार्किटचा उत्पादन खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय)...
ऑगस्ट 26, 2019
उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश परिस्थितीची चर्चा सुरू आहे. परंतु मंदी आणि तेजी यांचे चक्र कायमच चालू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर मंदी हा निसर्गनियम आहे. आपल्या शेअर बाजारात आतापर्यंत दहा टक्के घसरण झाली आहे. अशा वेळी हा बाजार ज्याची आतुरतेने वाट बघत होता, त्या बाजाराला चालना देणाऱ्या...
ऑगस्ट 14, 2019
महाराष्ट्रात सगळीकडे आता कुठे वरूणराजाने हजेरी लावली आहे. बाजारातदेखील मॉन्सून सेलची सुरुवात झाली आहे. फक्त हा मॉन्सून सेल लागला आहे, शेअर बाजारात! मोदी सरकार २.० मधील नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार अजूनही सावरलेला नाही. शेअर बाजारात बहुतांश चांगल्या...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई: सहा महिन्यांपासून मंदीशी झगडणाऱ्या वाहन उद्योगाची अवस्था जुलैमध्ये आणखी बिकट झाली आहे. जुलै महिन्यात १२ पैकी ११ कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण नोंदवण्यात आली. सातत्याने वाहन विक्रीत घट होत असल्याने वाहन उत्पादक, वितरक, सुटे भाग निर्मात्यांची चिंतेत भर पडली आहे. देशातील सर्वांत मोठी वाहन...
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच वाढविता येऊ...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली - देशात मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) ७ हजार २२४ कोटी रुपयांचे दूरचित्रवाणी (टीव्ही) संच आयात करण्यात आले. यातील अर्ध्याहून अधिक टीव्ही संच चीनमधील आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली. मागील आर्थिक वर्षात टीव्ही संचांची आयात वाढली आहे. त्याआधीच्या आर्थिक...
जुलै 01, 2019
वस्तू आणि सेवाकर प्रणालीला (जीएसटी) सोमवारी (ता. १) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सुरवातीला क्‍लिष्ट वाटणारी व करदात्यांसाठी डोकेदुखी ठरलेली ‘जीएसटी’ प्रणाली आता बऱ्यापैकी स्थिरावली आहे. ‘एक देश एक कर’ संकल्पनेने देशांतर्गत व्यापार सुलभ केला. त्याबरोबरच कर सुसूत्रीकरण आणि करभरणा प्रक्रिया गतिमान झाली....
जुलै 01, 2019
झुरीच - स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत ७४ व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या...
जून 04, 2019
नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहारांनी बॅंकिंग क्षेत्र ढवळून निघाले असून, मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) देशभरात ७१ हजार ५०० कोटी रुपयांच्या बॅंक गैरव्यवहारांची नोंद झाली आहे. बॅंकिंग गैरव्यवहारांसंदर्भातील ६ हजार ८०० प्रकरणे उघडकीस आली आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारात दिलेल्या...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच...
मे 09, 2019
नवी दिल्ली - गेल्या आर्थिक वर्षात घराची नोंदणी रद्द करणाऱ्या ग्राहकांना वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) परतावा मिळणार आहे.  स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जीएसटी सुधारणानंतर ग्राहक आणि विकासकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी बुधवारी (ता. ९) केंद्रीय अप्रत्यक्ष आणि सीमा शुल्क विभागाने...
मे 06, 2019
अक्षय तृतीया आणि सोने यांचे एक अतूट नाते आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते. आपल्या एकूण...
एप्रिल 30, 2019
‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’चा अंदाज; अनिश्‍चित स्थितीने मागणीवर परिणाम नवी दिल्ली - देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर अनिश्‍चितता असून, २०१८-१९ या वर्षात आर्थिक विकासदरावर परिणाम होईल, असा अंदाज ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली - एप्रिल २०२० पासून डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांची निर्मिती थांबवणार असल्याची घोषणा देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकी इंडियाने गुरुवारी (ता. २५) केली. भारतात सध्या या कंपनीच्या विक्री होत असलेल्या गाड्यांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण २३ टक्के आहे. मात्र  ही...