एकूण 106 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
गेल्या आठवड्यात १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलीने अमेरिकेत ‘व्हाइट हाउस’ या अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले. जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या बलाढ्य अध्यक्षांना आंदोलनातून आवाहन करण्याचा व त्यासाठी स्वीडनहून हजारो मैलाचा प्रवास करण्याचा खटाटोप कोण कशासाठी करेल? तर हे सर्व चालले आहे...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
सप्टेंबर 18, 2019
जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी ती भूमिका पेलण्याची क्षमता असलेली पिढी निर्माण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्‍यक असून, सर्व स्तरांवरील संशोधनाला बळ द्यावे लागणार आहे.  काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) प्रसिद्ध करून त्यावर जनतेकडून...
सप्टेंबर 10, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखविले आहे; परंतु चालू आर्थिक वर्षात फक्त पाच टक्के दराने आर्थिक विकास होत आहे. सरकारने दिशाभूल करणारा आकड्यांचा खेळ सुरू केला आहे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणीयन यांनी सांगितले आहे की, जीडीपी दराचे...
सप्टेंबर 02, 2019
आर्थिक परिस्थितीबाबत कितीही सारवासारव केली तरी विकास दराचे आकडे कठोर वास्तवाकडे निर्देश करणारे आहेत. बॅंकांच्या महाविलीनीकरणासह आर्थिक आघाडीवर जे निर्णय घेतले गेले, तेवढ्याने या प्रश्‍नाचे गांभीर्य कमी होईल, असे मानणे धोक्‍याचे ठरेल. पैशाचे सोंग आणता येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. देशाची...
ऑगस्ट 31, 2019
मानव तयार करत असलेला एकचतुर्थांश कार्बन डायऑक्‍साईड जगभरातील झाडे शोषून घेतात. नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या साह्याने या कार्बन डायऑक्‍साईडचा उपयोग झाडे आपल्या स्वतःच्या वाढीसाठी करतात. परंतु, मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डायऑक्‍साईड तयार होण्याचे प्रमाण वाढत राहिले तर या शतकाअखेरीस तो शोषून घेण्याची...
ऑगस्ट 27, 2019
बॅडमिंटनमधील तब्बल २२ वर्षांपासूनची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा सिंधूच्या विजयामुळे अखेर फळाला आली आहे. सिंधूचे हे यश भारतीयांसाठी आनंददायी तर आहेच; पण ते विजिगीषू वृत्तीला प्रेरणा देणारेही आहे. भारतातील २४ वर्षांची एक युवती आणि भारतातील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा स्मार्टफोनवरचा कुठलाही गेम...
ऑगस्ट 24, 2019
ओडिशा आणि चक्रीवादळ, हे समीकरण नवे नाही. त्या आपत्तीमधून सावरण्यासाठी तेथील प्रशासकीय चौकट भक्कम झाली आहे अन्‌ सर्वसामान्य नागरिकांचीही त्यांना चांगली साथ मिळत आहे. त्यात मराठी अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यापैकी एक विजय कुलांगे. मूळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कुलांगे यांची जिल्हा...
ऑगस्ट 22, 2019
जम्मू, काश्‍मीर व लडाख यांच्यातील विकासाचा असमतोल दूर करण्याचे आव्हान आता पेलावे लागणार आहे. चिरस्थायी विकास साधणे व विकासाची गुणवत्ता वाढवणे यासाठी शिक्षण, कौशल्यविकास, वीजनिर्मिती यांना प्राधान्य द्यावे लागेल. विकासासाठी या नव्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेणे गरजेचे आहे. जम्मू-काश्‍मीरचे ३७०वे...
ऑगस्ट 19, 2019
अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत अनेक सूचक वक्‍तव्ये सत्ताधारी करीत आहेत. मात्र, यात त्यांची संहारकता, त्यांचा होणारा परिणाम, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. अण्वस्त्रांबाबत सत्ताधाऱ्यांनी विवेकाची भूमिका घेणे अपेक्षित आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
ऑगस्ट 13, 2019
जलप्रलयामुळे आज सर्वत्र जो हाहाकार उडाला आहे, त्याला वरुणाच्या अतिवृष्टीच्या जोडीला दुःशासनाच्या लीला कारणीभूत आहेत. आशा आहे की, लवकरच लोकशक्तीचा भीम जागृत व सक्रिय होऊन भविष्यात अशा दुर्घटनांना पूर्णविराम देता येईल. केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र; सध्या संपूर्ण सह्याद्री पर्वतश्रेणीच्या माथ्यावर...
ऑगस्ट 09, 2019
आंध्र प्रदेशाने स्थानिकांसाठी खासगी क्षेत्रात आरक्षणाचा केलेला कायदा हे भूमिपुत्रांसाठी सकारात्मक हस्तक्षेपाचे धोरण आहे. खासगी क्षेत्रात अशा प्रकारचा सरकारी हस्तक्षेप वाढला, तर औद्योगिक प्रगतीला बाधा पोचेल, अशी टीका होत आहे. त्यात तथ्य असले तरी कोणत्या परिस्थितीत याची गरज निर्माण झाली, याचाही विचार...
ऑगस्ट 07, 2019
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या स्थापनेचे विधेयक नुकतेच मंजूर झाले. परंतु त्यातील अनेक कलमे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांवर आणि डॉक्‍टरांवर अन्याय करणारी, लोकशाहीच्या तत्त्वांना मुरड घालणारी आहेत. नव्या तरतुदींची त्यादृष्टीने समीक्षा व्हायला हवी. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (राष्ट्रीय वैद्यकीय...
ऑगस्ट 02, 2019
भारतातील शेतीला अरिष्टाने ग्रासले आहे, असे सर्व अर्थतज्ज्ञांना वाटते, परंतु या अरिष्टाचे स्वरूप कसे आहे आणि शेती अरिष्टमुक्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, या संदर्भात साधी चर्चाही सुरू झालेली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे शेतकरी दारिद्य्राच्या खाईत खितपत आहेत आणि काही शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत...
जुलै 30, 2019
भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील एकमेव बडे आणि वादग्रस्त नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारवरील विश्‍वासदर्शक ठराव गेल्या तीन आठवड्यांतील वेगवान घडामोडींनंतर अखेर मंजूर झाला आहे. मात्र, सध्या त्यांच्याकडे असलेले संख्याबळ पाहता त्यांच्याही सरकारची वाटचाल सोपी नाही. विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार...
जुलै 27, 2019
जगभरातील ज्या देशांनी अवकाश तंत्रज्ञानात भरारी मारली आहे, त्यांनी आपला मोर्चा चंद्राकडे वळविला आहे. अमेरिकेनेही १९७२ नंतर चांद्रमोहिमांना ब्रेक लावला होता, त्यांनीही पुन्हा चंद्राकडे लक्ष वळविले आहे. पहिल्या मानवी चांद्रसफरीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाल्याबरोबर लगेच भारताने आपले ‘चांद्रयान- २’ पाठविले...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ शकेल....
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
पहिली - दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात दोन अंकी संख्यांसाठी सुचवलेल्या नवीन संख्यावाचन पद्धतीवरून उलटसुलट चर्चा होत आहे. या बदलामागचा शैक्षणिक विचार स्पष्ट करणारा लेख. ‘बालभारती’ने गणिताची पाठ्यपुस्तके लिहिली आहेत आणि त्यात माझा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्या...
जून 18, 2019
अन्नधान्याबाबत देश स्वयंपूर्ण झाला असला, तरी विपुलतेमुळे काही प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे अपेक्षित राखीव साठ्यापेक्षा कितीतरी जास्त धान्यसाठा सरकारकडे पडून आहे. ‘अ न्नं बहु कुर्वीत, तद्‌ व्रतम्‌’ असे तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे. या सुवचनानुसार भारतात समाधानकारक...