एकूण 172 परिणाम
जानेवारी 27, 2020
औरंगाबाद- तत्कालीन भाजप सरकारने नगर-नाशिकला झुकते माप देत चुकीचा जल आराखडा तयार करून घेतला व मराठवाड्याचे हक्काचे पाणी पळविले. त्र्यंबकेश्वर ते पैठणदरम्यानच्या जलाशयात 156 टीएमसी उपलब्ध पाणी असताना, ते 205 टीएमसी दाखवले. त्यामुळे चुकीच्या आराखड्याविरोधात व मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा...
जानेवारी 24, 2020
मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ही दंगल म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता, असा आरोप शरद पवार यांनी केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव...
जानेवारी 24, 2020
सोलापूर ः फडणवीस सरकारच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला. यापुढे लोकनियुक्त नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला आहे. फडणवीस सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्यातील कॉंग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी...
जानेवारी 23, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - चिपी विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने विकासक असलेल्या आयआरबी कंपनीला येत्या मार्चपर्यंतची डेडलाईन दिली आहे. या मुदतीत कामे पुर्ण झाली तरच नागरी उड्डाण महासंचालनालयाचे (डिजीसीए) संयुक्त तपासणी पथक तपासणीसाठी येईल आणि त्यानंतरच विमानतळ...
जानेवारी 22, 2020
नांदेड : केंद्र शासनाकडून २०१३ ते २०१७ मध्ये ‘राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेकडे अनेक नवतरुण उद्योजक आकर्षित होऊन उद्योगात उतरले आहेत. यासाठी शेकडो तरुण उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक देखील केली. मात्र, उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी शासनाकडून या नव...
जानेवारी 20, 2020
पाटण ः सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी कोयना धरणग्रस्तांनी महिनाभर केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. मात्र, शासनाने दोन वर्षांपासून जिल्हा पातळीवर तयार केलेल्या "टास्क फोर्स'चे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नव्याने जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार घेतलेल्या...
जानेवारी 10, 2020
सोलापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टमधील महत्त्वाचा प्रोजेक्‍ट म्हणजे जलयुक्त शिवार अभियान. या अभियानात सोलापूर जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जलयुक्त शिवारचे भवितव्य अंधारात दिसत आहे. याच जलयुक्त शिवार...
जानेवारी 08, 2020
टिटवाळा : भाजप-शिवसेना महायुती सरकारच्या काळात बहुचर्चित 33 कोटी वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ 1 जुलै 2018 ला कल्याण तालुक्‍यातील वरप येथील राधास्वामी आश्रमच्या मागील बाजूस असलेल्या वनक्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिदे यांच्या...
डिसेंबर 24, 2019
पुणे : भाजप महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडले, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी घेतली. हिवाळी अधिवेशनात त्यांनी ही जबाबदारी चोख पार पाडली. यानंतर ते पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान एका कार्यक्रमात त्यांनी एक खंत व्यक्ती केली. काय आहे ही खंत? मंत्रिमंडळ विस्ताराला...
डिसेंबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अमरावती, नागपूर पाठोपाठ मुंबई विभागानेसुद्धा "क्‍लिनचिट' दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि अजित...
डिसेंबर 20, 2019
पुणे : फडणवीस सरकारच्या २०१७-१८ या वर्षात ६५ हजार कोटीचा ताळमेळ लागत नसल्याचे सांगण्यात आले आहे. आज (ता.२०) सभागृहात २०१७-१८ या आर्थिक वर्षात राज्याची स्थिती काय होती यावरचा कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यामध्ये कॅगने हा खळबळजनक खुलासा केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देवेंद्र...
डिसेंबर 14, 2019
ढेबेवाडी (जि. सातारा) ः अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला.  हेही वाचा ः महाबळेश्‍वरच्या नक्षीदार काठ्यांची एक्झिट?  राज्य शासनाने विविध महामंडळांवरील नियुक्‍त्या बरखास्त...
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
नोव्हेंबर 27, 2019
अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवर येतंय. पण उद्धव ठाकरे सरकारसमोरची वाट ही वाटतेय तितकी सोप्पी नाही. आव्हानांचे अनेक डोंगर उद्धव ठाकरेंना सर करावे लागणारयंत.   शेतकरी कर्जमाफी कशी साधणार ? उद्धव सरकारसमोरचं पहिलं आणि...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यास आज (मंगळवार) 11 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पण, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुपस्थिती प्रकर्षाने जाणविली. ...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज वास्तवात उतरले असल्याचे नेटीझन्स म्हणत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात युती सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे : राज्यातील दूध भुकटी निर्यातीला राज्य सरकारच्या अडेलतट्टूपणाचा मोठा फटका बसला आहे. केवळ सरकारी अनास्थेमुळे दूध भुकटी उत्पादकांवर चक्क निर्यात बंद करण्याची वेळ आली आहे. शिवाय याआधी जाहीर केलेल्या निर्यात अनुदानाचा एक छदामही सरकारने दिला नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्था अडचणीत आल्या...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा. : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या "एस' वळणावर आज सकाळी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढत असलेल्या पोलिस हवालदारासह तिघे जखमी झाले. मृत्यूची शंभरी ओलांडणाऱ्या या ब्लॅक स्पॉटवर उपाय काढण्याच्या अनेक वल्गना झाल्या. नवीन बोगद्याच्या कामाला सुरवात करण्याच्या घोषणा...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : दरमहा मिळणारे सहा हजार रुपये विद्यावेतन तरी वेळेवर द्यावे या मागणीसाठी मेडिकलचे इन्टर्न्स अधिष्ठाता कार्यालयावर धडकले. मागील ऑगस्ट, सप्टेंबरपासून विद्यावेतन मिळाले नसल्याची व्यथा यांनी बोलून दाखवली. एक इंटर्न्स म्हणाला, आम्हाला केवळ 200 रुपये रोज मिळतो. आमच्यापेक्षा मजुरी करणारे तरी बरे...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपला टिकाव लागणार नसल्याच्या भीतीने विरोधकांनी आतापासूनच रडीचा डाव सुरू केला आहे. निव्वळ प्रसिद्धीसाठी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याचा आरोप महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी विरोधकांना शिखंडीसारखे वार न करता...