एकूण 482 परिणाम
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...
जून 16, 2019
कोल्हापूर - आई-वडिलांनी मुलांचे गुण ओळखून त्यांच्यात स्वप्न पेरले, जिद्द निर्माण केली तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय कसबा बावड्यातील सामान्य कुटुंबातील मृणाल आणि मृदुला कांबळे या दोन बहिणींकडे पाहिल्यानंतर येतो. या दोघींनी वडील नितीन कांबळे यांच्या प्रेरणेतून पिन्चॅक सिलॅट मार्शल आर्टस्‌ स्पर्धेत...
जून 14, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत मुदत दिली...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६...
मे 20, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. चेंज डॉट...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 12, 2019
कोल्हापूर - खिडकीच्या अत्यंत निमुळत्या जागेतून प्रवेश करून जुन्या मराठा बॅंकेजवळील मोबाईल दुकान फोडणाऱ्या चोरट्याचा छडा अवघ्या ४८ तासांत लक्ष्मीपुरी पोलिसांनी लावला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरील चोरट्याच्या चालण्याच्या स्टाईलवरून ही चोरी उघड झाली. याप्रकरणी शहरातील अल्पवयीनाने हा प्रकार केल्याचे उघड...
मे 10, 2019
बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर टॅंकर मंजुरी...
मे 09, 2019
सांगली - येथील व्यापाऱ्यास हैदराबादमधील व्यापाऱ्याने १४ लाख ७० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. दीपक बंकरलाल तिवारी (हैदराबाद) असे त्या संशयिताचे नाव आहे. अजीज उमर मुल्ला (वय ४३, मंगलमूर्ती कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्यांनी तिवारी यास दिलेल्या बेदाणा मालाचे पैसे देण्यास तिवारी टाळाटाळ...
मे 09, 2019
कोल्हापूर - विशेष घटक योजनेतून बांधण्यात आलेल्या साकव कामात घोळ झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. या अहवालाच्या आधारे आता धडक कारवाईला सुरवात झाली आहे. जी साकव कामे अनुसूचित जातीच्या लोकांना उपयोगी नाहीत, अशा साकवांचे आदा केलेले १८ कोटी ७५ लाख रुपये वसूल करावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
मे 08, 2019
अकोला : ‘माझ्या जीवित्वाला धोका असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी’ या आशयाची तक्रार मृतक किसनराव हुंडीवाले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर अाणि खदान पोलिस ठाण्यात दोन वेळा केली होती. अशा तक्रारी करूनही याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामुळे किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाल्याचा...
मे 07, 2019
सांगली - शहरातील बावीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पाटवले (जि. नगर) येथील एकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. अजय ऊर्फ अविनाश संजय पवार असे त्याचे नाव आहे. त्याने शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन मोबाईलमध्ये अश्‍लील छायाचित्र काढून चित्रीकरणही सोशल मीडियावर व्हायरल...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...