एकूण 687 परिणाम
जून 14, 2019
लडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं...
जून 12, 2019
नवी दिल्ली ः चंद्राला दुसऱ्यांदा गवसणी घालण्यास भारत सज्ज झाला असून, "चांद्रयान -2' या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून 51 मिनिटांनी हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी पत्रकार...
जून 04, 2019
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा...
मे 28, 2019
नवी दिल्ली ः बालकांना दत्तक घेण्याच्या प्रमाणात 2018-19 या काळात वाढ झाल्याची माहिती "चाइल्ड ऍडॉप्टेशन रिसोर्स ऑथॉरिटी' (कारा) या संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. दत्तक घेतल्या जाणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले असून, महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे...
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही नोटीस या...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी पुलवामामधील...
मे 14, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे. शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार...
मे 13, 2019
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळा झळकवल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) च्या अहवालानुसार पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण 722 तास 25 मिनिटे व 45 सेकंद दिसले. त्यांचे...
मे 07, 2019
हैदराबाद: गेल्या चार वर्षांत जमविलेल्या प्रचंड संपत्तीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यासह तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) 40 आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे स्वागत करीत प्राप्तिकर खात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी,...
एप्रिल 26, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून ब्रिटनमध्ये राहत असलेल्या नीरव मोदीला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत आहे. पण शुक्रवारी झालेल्या सुनावणीत लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला. आता याच्या पुढची...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बॅंक खात्यांमधील रक्कमेत सातत्याने वाढ होत असून, ही रक्कम लवकरच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 35.39 कोटींपेक्षा अधिक बॅंक खाती उघडण्यात आली आहेत...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया तरुण गुर्जर या हल्लेखोराने...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : काही सेकंदांचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर तरुणाईला वेड लावणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या आदेशामुळे आता टिकटॉक अॅप डाऊनलोड करता येणार नाही. मात्र, ज्यांनी हा अॅप डाऊनलोड केला आहे त्यांना तो नेहमीप्रमाणे वापरता येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार गुगल...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली - पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) आणि आधारकार्डची जोडणी करणे बंधनकरक असल्याने त्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. पॅन-आधार जोडणीची मुदत 31 रोजी संपणार होती. मात्र आता ही तारिख पुढे ढकलण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पॅन आणि आधार जोडणी करता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (...
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
मार्च 29, 2019
बेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : देशभरात रोजगार वाढल्याचा दावा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) केला आहे. जानेवारी महिन्यात 8 लाख 96 हजार 516 नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे "ईपीएफओ'च्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रोजगार निर्मितीत 131 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, हा 17 महिन्यांतील...