एकूण 63 परिणाम
जून 05, 2019
औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी...
जून 02, 2019
शिर्डी - ‘नवे प्रदेशाध्यक्ष कोण, हे माझ्याकडून कशाला वदवून घेतो भाऊ?’ अशा खास ढंगात, नूतन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नव्या भाजप प्रदेशाध्यक्षाच्या नावाबाबत कानावर हात ठेवले. आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास दानवे यांचे दिल्लीहून विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
एप्रिल 28, 2019
राहाता : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषण करीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक भोवळ आली. जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना तत्काळ आधार दिला. घशाला कोरड पडल्याने त्यांनी साखरमिश्रित लिंबू-पाणी पिऊन चॉकलेट खाल्ले....
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यातील समान...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 20, 2019
बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 17, 2019
भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...
एप्रिल 12, 2019
ते म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत प्रचाराला अवघे पंधरा दिवस मिळाले. तरीही मतांचा मोठा टप्पा गाठला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला; पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून माझा जनसंपर्क कायम ठेवला. ‘नॉट रिचेबल’ अशी माझ्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी चार वर्षे काढली. मी नॉट रिचेबल आहे की नाही हे आता...
एप्रिल 09, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे बुधवारी (ता. तीन) एकाच विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांनी गुरुवारी (ता. चार) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सत्तार मुंबईतच थांबले; तर रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने औरंगाबादला...
एप्रिल 03, 2019
सावंतवाडी - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा फाडलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी माझ्या खिशात ठेवला होता. तो मी अजून जपून ठेवला आहे, असा चिमटा माजी आमदार राजन तेली यांनी येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना काढला. तत्पूर्वी ‘मी राजीनामा दिला; परंतु तो न वाचता मुख्यमंत्र्यांनी फाडून टाकला, याचा...
मार्च 31, 2019
रत्नागिरी - सत्तेचा स्वार्थासाठी गेली पाच वर्षे शिवसेना भाजपशी भांडत राहीली, जनतेची दिशाभूल करत राहीली. कोणतीही विकास कामे केली नाहीत, कोणताही प्रकल्प आणला नसल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ते आपसात भांडत होते. जशी निवडणूक जाहीर झाली, तशी त्यांनी युती केली आणि गळ्यात गळे घालून फिरुन चांगले...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
मार्च 10, 2019
बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 22 जागा...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...