एकूण 29 परिणाम
डिसेंबर 02, 2019
वडूज/ गाेंदवले : माणदेश मॅरेथॉन 21 किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात धनवंत रामसिंग (औरंगाबाद) तर महिलांच्या गटात नयन किरदक (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वडूज रनर्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोंदवले (ता. माण) येथून या स्पर्धेला सुरवात होऊन त्याचा समारोप येथे झाला....
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद  : जागतिक धम्म बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे सकाळी दहा वाजता चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर चार्टर विमानाने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या निमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.  दलाई...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - इंडियन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिटनेस फेडरेशनच्या ‘डायमंड कप इंडिया-२०१९’ या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला शहरात शनिवारपासून (ता. १६) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांच्या फिजिकल प्रकारात मुंबईच्या हर्षदा पवारने कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या...
नोव्हेंबर 15, 2019
औरंगाबाद : कुटुंबात येणाऱ्या समस्या, शारीरिक-मानसिक छळ, संघर्ष, पिळवणूक याबद्दल "पुरुषा'ने काहीही सांगितले, तरी त्याची समाजात थट्टा केली जाते. घरात पत्नीकडून किंवा तिच्या माहेरच्यांकडून होणारा छळ, अवहेलना झेलणारे पुरुष आपली व्यथा सांगण्यास कचरतात. पत्नीचा जाच, छळ, अवहेलना सहन करणाऱ्या पुरुषांसाठी...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली.  गजेंद्र दिलीपराव देशमुख (33, रा. एन-दोन, सिडको) यांनी...
सप्टेंबर 28, 2019
पैठण  (जि.औरंगाबाद) : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात दर्जाहीन कडधान्याचा साठा खोटी कागदपत्रे तयार करून साठवून राज्य शासनाच्या दोन कोटी 91 लाख 23 हजार 166 रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गोदामप्रमुखाविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी (ता. 27) दाखल करण्यात आला...
सप्टेंबर 26, 2019
औरंगाबाद - 26 : येथून 59 लाखांचे पार्सल बक्षीस म्हणून पाठविले, ते दिल्ली विमानतळावर आले असून सोडविण्यासाठी पैसे भरा, अशी थाप मारुन भामट्यांनी तरुणाची दोन लाख 21 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान घडला. या प्रकरणी तीन भामट्यांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक व...
सप्टेंबर 26, 2019
पैठण : शहरात विक्रीसाठी येत असलेल्या मावा गुटख्याच्या साठ्यासह एक लाख 77 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पैठण पोलिसांनी बुधवारी (ता. 25) छापा टाकून पकडला. पैठण-शेवगाव या मार्गावर खुल्या कारागृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की,...
सप्टेंबर 26, 2019
दोषी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार  गुन्हे दाखल करा : मुख्यन्यायमूर्ती   औरंगाबाद : लातूर जिल्ह्यातील नाला सरळीकरणाच्या विविध 23 कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी दाखल याचिकेत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मुख्य...
सप्टेंबर 19, 2019
शिवना (जि.औरंगाबाद) : मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतरावर्षीय युवकाला पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने विहिरित बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना मादनी (ता. सिल्लोड) येथील नाटवी शिवारात बुधवारी (ता. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. राजू समाधान बदर असे या युवकाचे नाव आहे. सकाळी...
सप्टेंबर 05, 2019
शहरासह जिल्ह्यात केवळ 879 गणेश मंडळांनीच घेतली परवानगी  शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील मंडळांवरही होणार कारवाई  औरंगाबाद : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली खरी; परंतु वर्गणीसाठी परवाना घेतला नसेल तर तसेच खर्चाचा तपशील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला नसेल तर...
सप्टेंबर 05, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : बचतगटांस दिलेल्या कर्जाची वसुली करून कर्मचारी दुचाकीने कार्यालयाकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी बॅग हिसकावून घेत सुमारे लाख रुपयांची चोरी करून पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता.चार) सायंकाळी पाचच्या सुमारास जडगाव-टोणगाव या जोडरस्त्यावर घडली. या घटनेत या कर्मचाऱ्याकडील बॅगेतील...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना...
ऑगस्ट 14, 2019
खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे वृक्षांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. काळा छापा डोंगरावर मंगळवारी (ता. 13) हा कार्यक्रम झाला. याप्रंसगी दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांभोवती आळे करून गवत स्वच्छ केले. गावाजवळच असलेल्या एका टेकडीचे जातिवाचक नाव बदलून "बर्थ डे हिल' असे...
जुलै 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद चषक पटकाविले. यात विविध पदकांची कमाई करीत महाराष्ट्राच्या संघाने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील पोलिस...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या बावीस पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अवघ्या तीन महिन्यांत महागडी यंत्रे चालवण्याची कला अगदी मोफत मिळाली. औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसह तीन अन्य संस्थांनी एकत्र येत हे करून दाखवले. औद्योगिक संघटनेने...
जुलै 05, 2019
औरंगाबाद - ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणेने ५८ किलो सोन्याच्या दागिन्यांचे टॅग काढून ते विकल्याचे भासविले. त्यासाठी त्याने तब्बल चारशे सहासष्ट खोटी बिले बनवून २७ कोटी ३१ लाखांचे दागिने जैनला दिले. या दागिन्यांच्या रकमेत त्याला २५ टक्के कमिशन मिळणार होते. जैनने दागिने वित्तसंस्थेत ठेवून तारण...
मे 06, 2019
औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका...
मे 03, 2019
औरंगाबाद - केंद्राच्या जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत संधीसाधू सामाजिक संस्थांनी जीवन विमा पॉलिसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातला. हा गंभीर प्रकार २०१४ ते २०१८ या काळात घडला. खासकरून सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांद्वारे मृताच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्यांची...
एप्रिल 22, 2019
बीड - जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या कुंटणखान्यांवर २०१७ पासून आतापर्यंत २२ छापे मारून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ४९ पीडित महिलांची सुटका केली आहे. यात विशेष म्हणजे सुटका करणाऱ्या आलेल्या पीडित महिलांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे. संशयित ८३ महिला व पुरुषांवर संबंधित पोलिस...