एकूण 127 परिणाम
जून 17, 2019
औरंगाबाद - विविध संवर्गातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रविवारी (ता. १६) सुटीच्या दिवशी शिक्षकांच्या हातामध्ये बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि त्यात रविवारी सुटीच्या दिवशी हे आदेश हातात पडले आहेत. ज्यांना मनासारख्या शाळा मिळाल्या ते...
जून 14, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते. या प्रकरणासंबंधी शुक्रवारपासून (ता.14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा बदली करून घेण्याची मुभाही...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 15, 2019
औरंगाबाद - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाला; मात्र जिल्ह्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक लाभार्थी स्वच्छतागृह बांधूनही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरत नाहीत. यावर पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन कक्षाकडून हे लाभार्थी अनुदानासाठी का पात्र नाहीत, याची क्रॉस चेकिंग सुरू केली आहे....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 01, 2019
कायगाव (जि. औरंगाबाद) - ‘डझनावर जनावरं हायतं; पण चाराच नै. अख्खं कुटुंब जनावरांच्या तैनातीत हाय. रोज पंधरा-वीस किलोमीटर पायपीट करून जनावरांपुढं पाचोळा, भुस अन्‌ कडुनिंबाच्या झाडांचा पाला मांडावा लागतोय. दुस्काळापाई ढोरांचा घास कडू झाला.’ जेरीस आणणाऱ्या दुष्काळाचं चित्र मांडलं पेंडापूर (ता. गंगापूर...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेना काँग्रेसची युती बुधवारी (ता. 27) संपुष्टात आली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - रस्ते अडविणाऱ्या माठ विक्रेत्यांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दम भरला. त्यानंतर अतिक्रमणही दूर होत आहे. परिणामी बीड बायपासवर संभाव्य अपघाताला आळा बसू शकतो; पण शहरातील बहुतांश फुटपाथ माठवाले व किरकोळ विक्रेत्यांनी गिळंकृत केलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांशिवाय इतर पोलिस अधिकारी,...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019   नागपूर - मागील वर्षी महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलींची ‘अस्मिता’ या आरोग्य योजनेमुळे जपली जात आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून...
मार्च 07, 2019
औरंगाबाद - साडेदहा-अकराची वेळ. भरधाव ऑटो रिक्षा आली ती थेट शिक्षण विभागाकडे गेली. पोलिसांना शंका आल्याने पाठलाग केला; मात्र ते पाहून रिक्षा सीईओंच्या दालनाकडे निघाली. रिक्षातून उतरलेल्या शिक्षकाने तोंडाला विषाची बाटली लावलेलीच होती; मात्र काहींनी प्रसंगावधान राखून हाताला धक्‍का मारून बाटली खाली...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील बांधकाम आणि सिंचन विभागात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, असा थेट आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी केला. वर्षानुवर्षे एकाच टेबलवर बसून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत, हा प्रश्‍नही या वेळी सदस्यांनी उचलून धरला. प्रशासकीय मान्यता दिलेली सर्वच...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 16, 2019
सोलापूर - राज्यातील शिक्षक भरतीवर अनिश्‍चिततेची टांगती तलवार कायम असताना 23 जानेवारी 2017 च्या परिपत्रकानुसार उपशिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदस्थापना; तर 2014 च्या "ग्रामविकास'च्या अधिसूचनेनुसार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी, असे निकष असतानाही तेरा जिल्हा परिषदांनी त्याचे उल्लंघन केले आहे...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद - मागील आठ ते नऊ वर्षांपासून महाराष्ट्रात शिक्षक भरती बंद आहे. भरती सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात अनेक डीटीएड, बीएड झालेले बेरोजगार तरुण उपोषण, आंदोलने करीत आहेत. मराठवाड्यात बीएड, ‘डीटीएड’धारकांची संख्या एक लाख असून रिक्त जागा फक्त एक हजार ९६९ आहेत.  राज्यातून फक्त दहा ते बारा हजार जागा...
फेब्रुवारी 11, 2019
खामखेडा (नाशिक) - प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन स्तरावरुन अनेकविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. आजघडीला गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकारी व शिक्षकांनी खांद्याला खांदा लावून 'अधिकारी-शिक्षक-समाज-शाळा-विद्यार्थी'यांनी शैक्षणिक सेतू तयार...
फेब्रुवारी 04, 2019
औरंगाबाद - राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या मेगा भरतीदरम्यान औरंगाबाद जिल्हा परिषदेतही लवकरच 350 रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत. कोणती व किती पदे रिक्‍त आहेत याविषयीची माहिती संकलित करून सरकारला प्रशासनाने सादर केली आहे. त्यानुसार 350 रिक्‍त पदे भरण्यास मान्यता मिळाली असून, लवकरच...
फेब्रुवारी 03, 2019
औरंगाबाद - भारनियमन असल्याने नळाला पाणी नाही म्हणून वाट पाहत बसण्याचे किंवा ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा कट झाला असे प्रकार सौरऊर्जा पंपामुळे कमी होणार आहेत. सध्या जिल्ह्यात 69 पाणीपुरवठा योजनांवर सौर ऊर्जा पंप बसविण्यात आले आहेत, तर आणखी 38 वाड्या- वस्त्यांमध्ये सौर...
जानेवारी 17, 2019
गंगापूर - घरी एक गुंठा जमीन नसतानाही अथक परिश्रम, जिद्दीच्या जोरावर टपरी चालविणाऱ्या तरुणाने कंपनी उभारली आहे. विष्णू पांडुरंग लंके असे या तरुणाचे नाव असून, त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या कंपनीची सध्या तीस लाखांवर उलाढाल आहे. विष्णू लंके यांच्या कुटुंबीयांना टोकी बर्गिपूर (ता. गंगापूर) दुष्काळी...