एकूण 449 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : रोजाबाग परिसरातील नागरिकांनी आंदोलन करून "नो एमआयएमचे' फलक झळकावत निवडणुकीवर बहिष्कार घातला. विशेष म्हणजे, खुद्द खासदार इम्तियाज जलील या परिसरात राहतात. तरीही उमेदवारांनी प्रचारालाही येऊ नये, असे आवाहनच नागरिकांनी केले. या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  लोकसभा, विधानसभा, महापालिका...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद- स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची कासवगती कायम आहे. त्यामुळे अद्याप कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून असून, गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या 283 कोटींपैकी फक्त पाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. या निधीवर आतापर्यंत तब्बल 30 कोटींचे व्याज मिळाले आहे.  केंद्र शासनाच्या महत्त्वकांशी स्मार्ट सिटी योजनेत...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते....
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - स्मार्ट शहर बसमध्ये एकाच मार्गावर जाताना व येताना तिकिटामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जाताना पाच रुपये तिकीट असेल तर येताना प्रवाशाला त्याच मार्गासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत, त्यामुळे प्रवासी त्रस्त असून, हा प्रश्‍न सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. ...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद - शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 1,680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,308 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, ही योजना इंदूर शहराच्या धर्तीवर राबविली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इंदूर...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद- थकीत बिल भरण्यासाठी वारंवार पत्रे दिल्यानंतरही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने महावितरण कंपनीने बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी मुख्यालय व सिद्धार्थ उद्यानाची वीज तोडली. मुख्यालयाचे दोन लाख 79 हजार, तर सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे पाच लाख 89 हजार रुपये बिल थकीत आहे. महिनाभरातील...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे. त्याचे नाव आहे सय्यद मतीन. मजलिस-ए-इतितेहादुल मुसलमीन, म्हणजेच एमआयएम या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : टाऊन हॉलच्या उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षांपासून पाणी तुंबते. पावसाळ्यात हे प्रमाण एवढे वाढते, की हा पूर्ण रस्ताच पाण्याखाली असतो. पण या साचणाऱ्या तळ्याचे रहस्य काय, हे कित्येक नागरिकांना माहितीच नाही.  टाऊन हॉलपासून तीन किलोमिटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव आहे. सध्या सलीम अली सरोवर म्हणून...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शनिवारी (ता. पाच) अवघ्या दोन नगरसेवकांनी हजेरी लावली. अधिकाऱ्यांनीही दांडी मारल्यामुळे दोन वेळा सभा तहकूब केल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांचा पारा चांगलाच चढला. अतिरिक्त आयुक्तांना त्यांनी "ही महापालिका आहे की, धर्मशाळा?' असा प्रश्‍न केला.  महापालिकेची...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद - बिल थकल्यामुळे गुरुवारी (ता. तीन) कंत्राटदाराने पुन्हा एकदा टॅंकर बंद केले. त्यामुळे शहरातील सुमारे आठ हजार कुटुंबांचे पाणी बंद झाले आहे. काही दिवसांपूर्वी 25 लाख रुपये दिल्यानंतर कंत्राटदाराने टॅंकर सुरू केले होते. मात्र, थकबाकी कोट्यवधींच्या घरात असल्याने कंत्राटदाराने आंदोलनाचा...
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद : ''माझी चिमुकली गेली; पण इतरांसोबत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काही तरी उपाय करा," असे आर्जव डेंगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आयुषीच्या कुटुंबीयांनी शनिवारी (ता. 28) महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांना केले. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.   शहरात डेंगीने थैमान घातले...
सप्टेंबर 27, 2019
औरंगाबाद - पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळून अनेकांचे बळी गेले, तर कोट्यवधींचे नुकसान झाले. औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यास पुण्याची पुनरावृत्ती घडू शकते. शहरातील दोन नद्यांसह नाले कुठे बिल्डारांनी, तर कुठे नागरिकांनी दाबले असून, त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत....
सप्टेंबर 23, 2019
औरंगाबाद - शहरात डेंगुसह साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने धूरफवारणी मोहीम हाती घेतली आहे. हडको भागात आज (ता.23) सकाळी फवारणीचे काम सुरू असताना फॉगिंग मशिनने अचानक पेट घेतल्याने महापालिकेचा एक कर्मचारी यामध्ये जखमी झाल्याची घटना घडली. निवृत्ती वाघ (वय 52) असे त्याचे नाव आहे. वाघ...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद : ऊन, वारा, पाऊस सोसत गेल्या वर्षभरापासून डुलणारे पिंपळाचे झाड एका नतदृष्ट तरुणाच्या कृत्याने जायबंदी झाले आहे. रस्त्याने जाता-जाता उंच झाडाला आधार म्हणून बांधलेली काठी काढून नेत असताना त्याने झाडही तोडले. हा प्रकार शनिवारी (ता. 21) सायंकाळी सिडकोतील एन-एकच्या काळा गणपती मंदिरासमोरील...
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद - महापालिकेत येऊनही रस्त्यांविना नागरिकांनाचे हाल सुरू आहेत. आम्ही महापालिकेला कर देतो; पण तुम्ही सुविधा द्या, अशी मागणी करीत सातारा-देवळाई भागातील संतप्त महिलांनी शुक्रवारी (ता. 20) आयुक्तांना घेराव घातला.  महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी सातारा वॉर्ड कार्यालय, लक्ष्मी...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. काठोकाठ भरलेल्या नाथसागरातील पाण्यावर हिरवा तवंग असून, हे पाणी शुद्ध करून शहरात पुरवठा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. केमिकल, तुरटीचे डोस वाढवूनही पाण्यातील गढूळपणा कमी होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे जलसंपदा...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - सिडको एन-2 भागातील तोरणागडनगरात ड्रेनेज चोकअप झाले असून, नागरिकांच्या घरांत पाणी तुंबत असल्यामुळे सण साजरे करणेही अवघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार तक्रारी केल्यानंतरदेखील महापालिका दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे सोमवारी (ता. नऊ) तक्रार केली....
सप्टेंबर 09, 2019
औरंगाबाद, -  शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) अंतिम सादरीकरण सोमवारी (ता. नऊ) महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबईत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या समोर सादरीकरण केले. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेला मंजुरी...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद - महापालिकेची हद्दवाढ होऊन चार वर्षे उलटल्यानंतर राज्य शासनाला जाग आली असून, सातारा-देवळाई भागासाठी केवळ पाच कोटींचा निधी देऊन बोळवण करण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर शहराला मात्र तब्बल 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत.  महापालिकांची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने समाविष्ट झालेल्या भागासाठी राज्य...