एकूण 284 परिणाम
जून 26, 2019
औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची बाजूही समजून घेतली...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून ठेऊन, धमकी...
जून 10, 2019
औरंगाबाद : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम घेतला आहे. मंगळवारी (ता.11) जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यिात येणार आहे. यात जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी केली जाणार आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी 'सकाळ'...
जून 03, 2019
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांचा आज कार्यकाळ संपत आहे. त्याजागी डॉ. देवानंद शिंदे यांची काळजीवाहू कुलगुरु म्हणून निवड झाली आहे. डॉ. शिंदे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तत्पूर्वी ते औरंगाबाद विद्यापीठात प्राध्यापक, विभागप्रमुख...
जून 02, 2019
मुंबई - इंग्रजी भाषेतून डी.एड. केलेल्यांपेक्षा मराठीतून डी.एड. केलेल्या शिक्षकांना अधिक जागा देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच नामंजूर केली.  राज्य सरकारने डी.एड. शिक्षकांच्या भरती...
मे 29, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाची क्षमता असतानाही येथून विमानसेवेला उतरती कळा लागली. मात्र, औरंगाबादला नव्या उड्डाणांची सोय करण्यासाठी नागरी उड्डयण मंत्रालयाने राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी (ता. २८) बैठक घेतली.  औरंगाबादला दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या विमानांची सेवा सध्या सुरू आहे. मात्र औरंगाबादेतून...
मे 28, 2019
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या विविध विकासात्मक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली.  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट...
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा बदली करून घेण्याची मुभाही...
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर पुढील सुनावणी...
मे 15, 2019
पुणे - राज्यातील कारागृहे ओव्हर फ्लो झाली आहेत. राज्यातील ५४ कारागृहांत ३५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैदी आहेत. गेल्या पाच वर्षांत कैद्यांची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक वाढली. राज्यातील ५४ कारागृहांपैकी १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे,...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
मार्च 17, 2019
नांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (ता. 16) नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.  दक्षिण मध्य...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
मार्च 03, 2019
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद महिनाभरात निर्माण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता. वि. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिले. निर्माण झालेली टंकलेखकांची ही 1,801 पदे त्यानंतर एक...
मार्च 01, 2019
मुंबई  - मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या मोठ्या महापालिकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. महापालिकांसाठी अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी निधीची तरतूद केली असतनाही हा निधी न वापरता अक्षम्य हेळसांड केल्याचा निष्कर्ष लोकलेखा समितीने नोंदवला आहे. भारताचे...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - देशातील अनेक प्राणिसंग्रहालयांना वाघ देणाऱ्या औरंगाबाद महापालिकेकडे आता मुंबई महापालिकेने वाघाची मागणी केली आहे. सहा महिन्यांपासून हे पत्र धूळखात पडून असून, महापालिकेने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी (ता. 26) महापौरांनी याविषयी विचारणा करीत वाघ पाठविण्यास सहमती दर्शविली आहे. ...
फेब्रुवारी 26, 2019
वैजापूर : नाशिक वैजापुर रस्त्यावर वैजापुरजवळ सोमवारी (ता. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास कार कंटेनरच्या भिषण अपघातात चार ठार, एक जण गंभीर झाल्याची घटना घडली. यात चिकलठाणा (औरंगाबाद) येथील मदन रघुजी ढाकणे (वय 45), दिनेश बाजीराव बकाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता विलास घुले (40),...
फेब्रुवारी 17, 2019
परभणी - लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांकडे सत्ता गेली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांनी जातीऐवजी कार्यकर्ते, लोकांना महत्त्व दिले पाहिजे. परंतु पक्षांनी पहिल्यांदा जातीत, नंतर कुटुंबात सत्ता केंद्रित केली. मागील सत्तर वर्षांत लोकशाही ही कुटुंबशाही झाली, याचे भानही राहिले नाही, असे प्रतिपादन भारिप...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...