एकूण 87 परिणाम
जून 17, 2019
सालेकसा (जि. गोंदिया) : अदखलपात्र गुन्हा व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता. 17) येथील पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. रमेश श्रीराम बिसेन (वय 50), असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. यातील तक्रारदाराकडे...
जून 12, 2019
नागपूर  : शहर आरटीओ कार्यालयात दुचाकीच्या कागदपत्राची दुय्यम प्रत घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीकडून तीन हजारांची लाच घेताना एका दलालाला "एसीबी'ने अटक केली. विजय विश्वनाथ हुमने (50) असे अटकेतील लाचखोर दलालाचे नाव आहे. तर त्याला लाच घेण्यासाठी सांगणारा शहर आरटीओ कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या...
जून 11, 2019
सांगली - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम गणपत बुधाजी भालचीम (वय ४४, रा. यशोधा अपार्टमेंट, खणभाग) याला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. बदली कामगारास कामाच्या दिवसांचे खाडे न भरता हजेरी पुस्तक पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली...
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 13, 2019
नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नगरच्या कार्यकर्त्यांशी...
मार्च 05, 2019
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय, या दोन घडामोडींमुळे आजच्या घटकेला महाराष्ट्रातल्या मतदारांची पसंती भाजप...
फेब्रुवारी 22, 2019
अकोला : अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व इतर सदस्यांनी महानगरपालिका सभागृहात ठिय्या आंदोलन केले. मागील सभेत दिलेल्या आश्वासनानुसार चर्चा नाकारल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी माईकची तोडून थेट महापौरांपुढे गोंधळ घातला. राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण यांना तीन...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - गुन्ह्यातून आरोपीची सुटका करण्यासाठी तीन लाखांची लाच मागण्याच्या आरोपाखाली देवनार पोलिस ठाण्यातील निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (ता. १३) पकडले. आरोपीकडून लाचेचा पहिला हप्ता घेताना त्याला अटक केल्याची माहिती एसीबी अधिकाऱ्यांनी दिली. ...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. आता अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे हटविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. सामान्यांना २४ तास पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी संकल्पना सरकारने पुढे आणली. हा प्रकल्प राबविताना सर्व अडचणी दूर करू, मात्र प्रकल्प बंद होऊ देणार नाही,...
जानेवारी 07, 2019
मुंबई - लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना अटक झाल्यानंतर खांदेपालट करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणे देऊन चार महत्त्वपूर्ण कक्षांमध्ये नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी...
डिसेंबर 13, 2018
नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात प्रत्येकवेळी तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी का अडकतात, बडे अधिकारी सापडत कसे नाहीत, याचा गौप्यस्फोट खुद्द एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण एसीबीचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात आली आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस...
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत....
नोव्हेंबर 27, 2018
सातारा - बिअर बार चालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्यासाठी दरमहा दोन हजार रुपयांची लाच (मंथली) मागितल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या फलटण कार्यालयातील अधिकाऱ्यावर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शरद किसन कानडे (वय 51, रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे त्याचे नाव आहे. संबंधित...
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : कथित लाचखोरीप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी यांना आज (रविवार) बंगळूरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पथकाने अटक केली. रेड्डी यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी अली खान यांनाही पोलिसांनी अटक केली.  गेल्या तीन दिवसांपासून...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील लाच घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आज (बुधवार) अंदमान-निकोबारला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या प्रकरणी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात येत आहेत. सीबीआय उच्चपदस्थांमध्ये उफाळलेला संघर्ष मंगळवारी दिल्ली...
ऑक्टोबर 23, 2018
नांदेड : वडिलांच्या नावावर शेतीचा फेरफार व सातबाराची नक्कल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना धानोरा मक्ता पदभार पेनूर सज्जाचा तलाठी व कोतवाल यांना मंगळवारी (ता. २३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या दोघांवर लोहा ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम २०१८...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात येण्याचा संभव नसला, तरी लोकपाल ही कल्पना सैद्धांतिकदृष्ट्या मोलाची आहे. अनेक देशांमध्ये यासाठी लोकपाल या कल्पनेचं विकेंद्री करण्यात आलं आहे. लोकपाल...