एकूण 100 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरातील तुरुंगात किरकोळ गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या शेकडो कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र, हत्या, बलात्कार, दहशतवादी कारवाया आणि भ्रष्टाचार गुन्ह्यातील कैद्यांची सुटका होणार नाही. येत्या दोन ऑक्‍टोबर रोजी सुमारे 600...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली - ‘सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठरावीक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,’ असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे.  आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ गैरव्यवहारातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचे सत्तारूढ पक्षाने स्पष्ट केले असून, अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला ‘हुतात्मा’ ठरविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे अडचणीत आलेले कॉंग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण करण्यासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी सरसावले आहेत. सरकारने चिदंबरम यांचे चारित्र्यहनन चालविल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.  आयएनएक्‍स मीडिया...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली - भारतीय कंपन्यांचे कंत्राट मिळवताना मध्यस्थामार्फत सुमारे ७५ कोटींची लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने आज ब्रिटनची रोल्स राॅइस कंपनी आणि भारतातील उपकंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ४,७०० कोटींच्या कंत्राटांसाठी ही लाच दिली गेली होती. ‘एचएएल’, ‘ओएनजीसी’ आणि ‘गेल’च्या अज्ञात अधिकाऱ्यांना...
जुलै 01, 2019
नवी दिल्ली: भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही मुख्यमंत्री...
मे 09, 2019
चंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. ‘बाबाजी बर्गरवाले’ या दुकानामुळे लुधियाना मतदारसंघातील रविंदरपाल सिंग...
मे 04, 2019
नवी दिल्ली : राफेल करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने  सर्वोच्च न्यायालयात याबाबत तोंडी उत्तर दिले. यामध्ये सरकारने सांगितले, की सुरक्षासंबंधी गोपनीय दस्तावेज अशाप्रकारे सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो.  राफेल प्रकरणात...
एप्रिल 30, 2019
लखनौ : माझी लढाई या देशातील यंत्रणेविरोधात असून, सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे वाराणसीतील लढाई असली आणि नकली चौकादारामधील असल्याचे, वाराणसीतील समाजवादी पक्षाचे उमेदवार तेजबहादूर यादव यांनी म्हटले आहे. जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. ...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : राफेल विमानांच्या खरेदीत "दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीच्या फायद्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला. मोदी यांच्याविरोधात "एफआयआर' दाखल करण्याची वेळ आली असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह...
मार्च 05, 2019
नवी दिल्लीः मी, दहशतवादी संघटनांवर हल्ला करतोय तर विरोधक माझ्यावर हल्ला करत आहेत. सर्व विरोधक एकत्र येऊन मला लक्ष्य करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. गुजरातमधल्या वस्त्राल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, 'विरोधकांनी मला लक्ष्य केले आहे. त्यांना मोदी नको आहे तर मला...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी नरेंद्र मोदींवर...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीवर कॉंग्रेसने "डोंगर पोखरून उंदीर निघाला', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक काळात मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित करताना सरकारची उलटगणती सुरू झाल्याचा इशाराही दिला...
डिसेंबर 29, 2018
बंगळूर : बंगळूर, कारवार, म्हैसूर, दावणगेरी, चिकमंगळूरसह कर्नाटकमधील 17 ठिकाणी एकाच वेळी छापे घालून भ्रष्टाचार नियंत्रण पथकाने (एसीबी) पाच अधिकाऱ्यांजवळ असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा शोध लावला आहे.  सहकारी संघाच्या निबंधक कार्यालयातील अतिरिक्त निबंधक आर. श्रीधर, दावणगेरी कृषी खात्यातील...
डिसेंबर 13, 2018
पाटणा : झारखंडचे माजी शिक्षणमंत्री बंधू तिर्की यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आज सीबीआयने अटक केली. त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तिर्की यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री, दोन-दोन माजी मंत्री हे भ्रष्टाचार आणि हत्येप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत.  तिर्की यांच्याविरुद्ध...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल यांनी "पंतप्रधान मोदी आणि भाजपमुळे देश समाधानी नाही' हे...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावेळी सीबीआयमधील वादावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अहवाल उघड झाल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोहोरबंद पाकिटातील अहवाल कसा उघड झाला असा प्रश्न उपस्थित...