एकूण 219 परिणाम
February 22, 2021
चंदगड : केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सल्लागार पदावर काम करणाऱ्या गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशराम पाटील यांची युनायटेड नेशनने बदलत्या वातावरणाचा (क्‍लायमेट चेंज एक्‍सपर्ट ग्रुप) अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीवर निवड केली आहे. जगभरातील 18 लोकांची ही समिती असून त्यामध्ये डॉ....
February 20, 2021
चंदगड : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. "जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष अबालवृद्धांच्या मनात स्फूर्तीचे पुल्लिंग चेतवणारा. साडेतीनशे-चारशे वर्षे झाली तरी हा जयघोष आजही तितकाच टवटवीत आहे, याची प्रचिती देणारा प्रसंग आज शिरगाव फाटा (ता. चंदगड) येथे पहायला मिळाला. तेथील...
February 19, 2021
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यनिर्मितीत गडकोटांनी महत्त्वाची भूमिका निभावली. महाराजांचा प्रत्येक दुर्ग लाखमोलाचा होता. शिवछत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाचे साक्षीदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात तेरा किल्ले उभे आहेत. येथील वास्तू, मंदिरे, विहिरी, तोफा, तोफगोळे यांचे अवशेष आजही...
February 19, 2021
कोवाड : चिंचणे (ता. चंदगड) गावाच्या हद्दीतील ताम्रपर्णी नदीपात्रात असलेल्या घाटावर मगर व तीन पिल्लांचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनाला आल्याने भितीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वनपरीक्षेत्रक डी. एच. पाटील यांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी...
February 17, 2021
चंदगड : पाटणे फाटा ( ता. चंदगड) येथे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरला. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.  जंगमहट्टीचे सरपंच विष्णू गावडे म्हणाले, ""दिल्लीच्या सीमेवर दोन महिने आंदोलन सुरू...
February 16, 2021
कुदनूर : कुदनूर (ता. चंदगड) येथील सरपंच शालन चंद्रकांत कांबळे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावावर आज झालेल्या विशेष ग्रामसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. सरपंच शालन कांबळे यांच्या बाजुने 606 तर, विरोधात 1380 मते पडली. 70 मते बाद झाली. त्यामुळे कुदनूरच्या थेट निवडून...
February 15, 2021
गडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात चिंचेची आवक वाढली आहे. किलोला तीस रुपये असा भाव आहे. भाजी मंडईत वाढत्या उन्हाळ्यामुळे कलिंगड, काकडीला मागणी जास्त आहे. पालेभाज्या, कोथिंबिरीचे दर तेजीत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षे, पपई यांची वाढलेली आवक टिकून आहे. सोयाबिनला क्विंटलचा 4800 रुपये असा या हंगामातील...
February 15, 2021
चंदगड : तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवाराला ऊर्जितावस्था आणण्यासाठी त्याचा व्यापारी दृष्टिकोनातून विकास केला जाणार असल्याचे समितीचे प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. तालुक्‍याला मध्यवर्ती असलेल्या या आवारात दुकान गाळे आणि कृषी...
February 14, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : पुजा चव्हाण या प्रकरणावरुन सध्या गदारोळ माजला आहे. तिच्या आत्महत्येवरुन पुन्हा एकदा अनेक वाद समोर येत आहेत. याबाबत जे दिशा बरोबर झाले..तेच पुजा बरोबर होणार असेल..तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही? असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करत शक्ती कायदा...
February 14, 2021
बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्याने निराश झालेल्या विवाहितेने माहेरी येऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (ता. १२) मन्नीकेरी (ता. बेळगाव) येथे घडली. यल्लूताई मारुती गावडे (वय ३२, रा. सोनारवाडी ता. चंदगड) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे....
February 14, 2021
म्हाकवे (कोल्हापूर) : पंधरा दिवसांपूर्वी माझे वडील माजी आमदार संजय घाटगे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असली तरी राजकारणातच राहणार आहे; पण मुश्रीफसाहेब, तुमच्या उलटा नाही, तुमचा शिलेदार म्हणून काम करू, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने...
February 14, 2021
रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील मुद्दस्सर खलपे यांच्या घराला शनिवारी रात्री आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नसले तरी या आगीत मोठे नुकसान झाले आहे.  शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. अचानक...
February 14, 2021
पेठवडगाव (कोल्हापूर) : येथील विवाहितेचा काल सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. रेश्‍मा सागर चांदणे (वय २३) असे तिचे नाव आहे. पतीसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माहेरच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मारला होता. मंगरायाचीवाडी येथील रेश्‍मा यांचा विवाह सागर चंद्रकांत चांदणे (मूळ गाव...
February 14, 2021
चंदगड (कोल्हापूर) : तालुक्‍यातील बांद्राई धनगरवाडा कर्नाटक, कोकण आणि गोव्याच्या सीमेवर घनदाट जंगलात वसलेला. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या हिंस्र प्राण्यांशी आणि निसर्गाशी दोन हात करीत जगणाऱ्या माणसांचे काळीजसुद्धा वाघासारखेच; परंतु पंढरपूर अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू आणि ११ जण गंभीर...
February 12, 2021
कोल्हापूर : एकेकाळचे जीवलग मित्र; पण आता वेगवेगळ्या राजकीय दिशेला असलेल्या दिग्गजांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अर्थात याला निमित्त आहे ते खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या काल झालेल्या वाढदिवसाचे आणि त्यात हा फोटो जुना...
February 12, 2021
कोल्हापूर : ‘प्रथम सूर्य उगावला, सूर्य नमस्कार केला, आदी वाड गे आई, पैल्या दुधावैली शाई’ या जतीने खेळ्याची सुरवात होते. पुढे जतीत रामायणाची कथा उलगडत जाते. लोककलांत सोंगे व खेळे हे प्रकार विशेष प्रसिद्ध. सोंगे कोकणातही खेळले जातात. पण, खेळे हा लोककला प्रकार केवळ चंदगडमध्येच पाहायला मिळतो....
February 12, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरला श्री विठ्ठल - रुक्‍मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगी अशा पाचजणांचा जागीच मृत्यू झाला; तर तब्बल 11 जण जखमी झाले आहेत.  हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी सहा...
February 12, 2021
चंदगड ( कोल्हापूर) ः हिवाळ्यानंतर उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या की झाडांची पानगळ सुरू होते. तळपत्या सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे स्त्रोत आक्रसतात. उघड्यावर साठलेले ओहोळाचे पाणी आटू लागते. तहानेने व्याकुळ झालेल्या जंगलातील पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. येथील परिक्षेत्र वन अधिकारी डी...
February 10, 2021
कोल्हापूर  : जिल्ह्यातील हातकणंगले, गगनबावडा, राधानगरी, कागल, आजरा व चंदगड तालुक्‍यांतील १६० ग्रामपंचायतींमध्ये आज सरपंच निवडीचा बार उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेनेही यश मिळविले. गावपातळीवरील निवडणुकीत महाविकास आघाडी फॉर्मात असल्याचे चित्र आहे.     कागल,...
February 10, 2021
चंदगड : हिवाळ्यानंतर उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या की झाडांची पानगळ सुरू होते. तळपत्या सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे स्त्रोत आक्रसतात. उघड्यावर साठलेले ओहोळाचे पाणी आटू लागते. तहानेने व्याकूळ झालेल्या जंगलातील पशू-पक्षांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. येथील परीक्षेत्र वन अधिकारी डी. जी. राक्षे...