एकूण 28 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
सप्टेंबर 09, 2019
जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा मुद्दा, आसाममधील ‘एनआरसी’ म्हणजे ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’चा विषय, नागालॅंडशी निगडित नागा समझोत्याचा विषय, यावर  राज्यकर्त्यांचे राजकारण आक्रमक असले, तरी त्यातील धोरणात्मक संभ्रम आता स्पष्ट होतो आहे. जम्मू-काश्‍...
ऑगस्ट 27, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वतः राणे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य राजकीय पावलाबाबत विश्‍वासात घेत असून त्यांना भावनिक साद घालत आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
फेब्रुवारी 03, 2019
प्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना "सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता "त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....
जानेवारी 16, 2019
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी उत्सुकता असून, खोऱ्यातील प्रस्थापित नेत्यांपेक्षा त्याची राजकारणातली भाषा वेगळी राहील, असे दिसते. भा रतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. शाह फैजल (३५...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. विक्रोळी येथील एका...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
नोव्हेंबर 30, 2018
सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सरकार आता नव्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामध्ये मतांची बेरीज करण्यासाठी भाजपने आतापासूनच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आपलेसे करण्याचे अभियान सुरू केले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘लाभार्थी संपर्क अभियान’ राबवून...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
ऑगस्ट 19, 2018
एम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी त्यांचा मधला मुलगा अळगिरी यांनी अद्याप शस्त्रं खाली ठेवलेली नाहीत. स्टॅलिन यांची वाट सोपी नक्कीच नाही. दुसरीकडं तमिळनाडूत स्पष्टपणे दिसणारी राजकीय...
ऑगस्ट 17, 2018
...हे माझे भाग्यच १९५७ च्या दरम्यान विलिंग्डन महाविद्यालयाच्या पटांगणात वाजपेयींची विद्यार्थी नेता म्हणून जाहीर सभा झाली होती. संघाचे बाबा पोतदार आणि माझा त्या सभेच्या आयोजनात पुढाकार होता. विद्यार्थीदशेतच ते राष्ट्रीय स्तरावरील वक्ते झाले होते. विद्यार्थ्यांच्या तुफान प्रतिसादाने ते भाषण गाजले....
ऑगस्ट 07, 2018
अस्मिताधारित प्रादेशिक पक्षांनी राज्यात आपले पक्के पाय रोवून देशाच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका स्वीकारायला सुरवात केली ती प्रामुख्याने दोन दशकांपूर्वी. आघाडीच्या राजकारणात त्यांचे महत्त्व कमालीचे वाढले. या राजकीय प्रवाहाचा वेध घेताना पहिले नाव कोणाचे समोर येत असेल तर ते एम. करुणानिधी यांचे....
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....