एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
सप्टेंबर 16, 2019
भाषेचा प्रश्‍न हा जेवढा व्यावहारिक प्रश्‍नांचा असतो, तेवढाच तो भावनिकही असतो. त्यामुळे त्याविषयी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाकावी लागतात. सरकारने याचे भान ठेवले पाहिजे. भारताचे ‘ऐक्‍य’ घडवून आणण्यासाठी हिंदी भाषेचा माध्यम म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न तीन महिन्यांपूर्वीच...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
जानेवारी 18, 2019
फोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही. प्रत्येक नाटक हे सुखान्त असते, असे बिलकूलच नाही आणि कोणत्याही नाटकाचा प्रत्येक प्रयोग यशस्वी होतोच, असेही नाही! त्यामुळेच कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
सप्टेंबर 05, 2018
धर्मनिरपेक्ष संविधानाची शपथ घेऊन देश व राज्याची सूत्रे स्वीकारणारे विसंगत वर्तन करीत आहेत. पंजाब सरकारने मांडलेला धर्मनिंदा कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव हे त्याचेच निदर्शक आहे. अशा प्रकारातून उदारमतवादाचाच नव्हे, तर लोकशाही स्वातंत्र्याचाही संकोच होत आहे, ही चिंतेची बाब आहे. धर्मकेंद्री राजकारण...
जून 28, 2018
आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही. दिवस आनंदाचा असो की दु:खद आठवणी घेऊन येणारा, त्याच्या स्मृती जागवण्याची...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 01, 2018
महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना या "सख्ख्या मित्रा'वर मात करून पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद मात्र भारतीय जनता पक्षाला साजरा करता आला नाही! याचे कारण त्याचवेळी भंडाऱ्याची एक जागा गमवावी लागली तर उत्तर प्रदेशातील कैराना या बहुचर्चित मतदारसंघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 16, 2018
कर्नाटकमध्ये शतक गाठून भारतीय जनता पक्षाने "दक्षिण दिग्विजय' जरूर साजरा केला असला, तरीही या निवडणुकीच्या मतमोजणीत जे काही चढ-उतार बघायला मिळाले, ते कोणत्याही रोमहर्षक "थ्रीलर'पेक्षाही अधिक चित्तथरारक होते! अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या आणि कॉंग्रेस तसेच भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
एप्रिल 08, 2018
"दक्षिणेकडची राज्यं आणि उत्तरेकडची राज्यं' हा मुद्दा देशभरात सध्या चर्चेचा आणि वादाचा ठरला आहे. राजकीय-सांस्कृतिक वेगळेपणासह आर्थिक आघाडीवर केंद्राकडून डावललं जात असल्याची दक्षिणेकडच्या राज्यांची भावना आहे. 15 वा वित्त आयोग हा या वादाचा केंद्रबिंदू तूर्तास आहे. निधीवाटप करताना लोकसंख्येचा आधार 1971...
ऑक्टोबर 26, 2017
हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अखेर 13 दिवसांनी निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता दसऱ्याच्या गरब्यापासून घुमू लागलेले गुजरातचे राजकारण आता अधिकच जोमाने फेर धरू लागणार आहे! गुजरातच्या "होमपीच'वर होऊ घातलेल्या या निवडणुका केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी,...