एकूण 18 परिणाम
जून 26, 2019
नको असलेले सामान अजिबात ठेवायचे नाही म्हणून आवरायला घेतले. पण, प्रत्येक वस्तूत जीव गुंतलेला. "वापरा व फेका' हे काही अजून जमत नाही. आज घर आवरायला घेतले आणि ठरवले, नको असलेले सामान टाकून द्यायचे. घर आवरले जाणार म्हणून मी सुखावले आणि दुखावलेही. कारण जपलेल्या अनेक वस्तूंना आज बाहेरचा रस्ता दाखवण्यात...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
जानेवारी 13, 2019
"सागर रेड्डी नाम तो सुना होगा' या सुनीता तांबे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्‍य आहे : "सैराट चित्रपटाची कहाणी जिथं संपते, तिथून सागरच्या आयुष्याची सुरूवात होते.' पुस्तक वाचत गेल्यावर याच्या सत्यतेची आणि आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या; पण सहज न दिसणाऱ्या वास्तवाची प्रकर्षानं जाणीव होते....
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
नोव्हेंबर 25, 2018
ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... "सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...
जुलै 22, 2018
"ग्यानबा-तुकाराम'चा गजर करत लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं निघतात. पावसाच्या आणि भक्तीच्या धारांमध्ये चिंब भिजणारे हे वारकरी आणि भक्तीचा हा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधानच. उद्या (सोमवार, ता. 23) आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा सोहळा कळसाध्याय गाठतो आहे....
जुलै 22, 2018
खरं तर परिस्थिती अशी आहे की "गॉडफादर' या चित्रपटाबद्दल काही लिहू-बोलू नये; पण अभिजात चित्रपटांचा धांडोळा घेताना "गॉडफादर'ला वळसा घालून पुढं जाणं शक्‍यही नाही. हा मैलाचा दगड न ओलांडता येणारा. या चित्रपटानं चित्रभाषेचं परिमाण बदललंच; पण विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या अधोविश्वाची परिभाषाही बदलली. हा चित्रपट...
जून 17, 2018
पुणे मराठी ग्रंथालय हे पुण्यातलं अतिशय जुनं, मोठं आणि अद्ययावत ग्रंथालय आहे. सन १९७८ मध्ये माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिच्या वितरणासाठी मार्गदर्शन घ्यायला मी तत्कालीन नगरसेवक गोविंदराव मालशे यांना भेटायला गेलो. गोविंदरावांनी मला पुणे मराठी ग्रंथालयात अच्युत पाटणकर यांच्याकडं पाठवलं. मी...
जून 03, 2018
"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच...
फेब्रुवारी 23, 2018
1105 साली जन्मलेल्या बसवण्णांनी बहिणीला मुंज नाकारल्याने आठव्या वर्षी गृहत्याग केला. 20 व्या वर्षापर्यंत कुंडलसंगम येथे पौराणिक स्थावर लिंगाची सेवा केली; परंतु त्यातून विकार मुक्ती निष्फळ ठरल्याने वैदिक परंपरेचा त्याग केला. काही काळ ध्यान केल्यानंतर त्यांनी अवैदिक तत्त्वांची मांडणी केली. यात...
जानेवारी 12, 2018
श्रमसंस्कारांची ताकद मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या न परवडणारी कामेही श्रमदानातून सहज पार पडतात. डोंगर वाकवण्याची शक्ती या श्रमसंस्कारात आहे. ती ओळखायला हवी. नुकतीच पदवी परीक्षा देऊन अभ्यासातून मोकळा झालो होतो. माझे परममित्र द्वारकानाथ लेले म्हणाले, ""अरे, राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या शिबिरात दाखल...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...