एकूण 6046 परिणाम
जुलै 20, 2019
नागपूर : दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जवळपास अर्धा तास बरसलेल्या धो-धो पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली व खोलगट भागांतील घरांमध्ये पाणी घुसल्याने...
जुलै 19, 2019
वेंगुर्ला - तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा झाेडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पावसामुळे बऱ्याच रस्त्यांवर पाणी आले. शिरोडा बाजारपेठेला पाण्याने वेढल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. यात ...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - शालेय वयात बौद्धिक अभ्यासक्रमात ती हुशार होती. खेळातही तितकीच चपळ. एखादे क्रीडा कौशल्य असावे म्हणून ती तायक्वाँदो शिकली आणि चिकाटीने खेळत राहिली. खेळातील तिची जिद्द, चपळता या जोडीला तिने उच्च शिक्षण घेत ज्ञानाशी मैत्री घट्ट ठेवली. परिणाम असा झाला की वर्ल्ड तायक्वाँदो फेडरेशनच्या तायक्‍...
जुलै 19, 2019
सेनगाव (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्‍यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी पीकविमा आणि सरसकट कर्जमाफीसाठी चक्क गावच विक्रीला काढले आहे. याबाबत गुरुवारी (ता. १८) तहसील कार्यालयाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.  सेनगाव तालुक्‍यातील ताकतोडा येथील लोकसंख्या जवळपास चार हजार असून, एक हजार शेतकरी आहेत. सध्या...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 19, 2019
नागपूर : सुमारे सव्वादोन वर्षांच्या मुदतवाढीनंतर राज्य सरकारने नागपूरसह वाशीम, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सर्वाधिकार संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक एकत्रच घेतली...
जुलै 18, 2019
धाबा (जि. चंद्रपूर) : जिवंत विद्युत तारांच्या वापराने वन्यजिवांची शिकार केली जाते. शिकारीसाठी पसरविलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन वाघ आणि मानवांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिकारीचा हा प्रकार रोखण्यासाठी आता वनविभाग आणि महावितरणने संयुक्तपणे गस्त सुरू केली आहे. जिल्ह्यातील...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे गेली...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून...
जुलै 18, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्वतपासणी यालाच ‘स्क्रीनिंग टेस्ट’ असे म्हणतात. संपूर्ण निरोगी व्यक्तीमध्ये दडलेला आजार अथवा त्यांची पूर्वलक्षणे जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासण्या म्हणजेच स्क्रीनिंग चाचण्या. वेळेअगोदर त्याची संभाव्य कल्पना आल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक उपचार होऊ...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - सहा महिन्यांपूर्वी पन्हाळा - जोतिबा डोंगर वाटेने चार गवे कोल्हापूर शहराच्या हद्दीपर्यंत आले. आठ दिवस त्यांनी ठाण मांडले. वनविभागाचे कर्मचारी गव्यांना जंगलाकडे सुरक्षित पाठविण्यासाठी दिवस-रात्र राबत होते; पण गवे त्यांना दाद न देता नागरी वस्तीकडे जात होते. अखेर वनविभागाने पोटॅटो गन (बटाटा...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या पेठांतील घरे म्हणजे जुन्या गल्लीबोळातली घरे. या छोट्या गल्ल्यांमधून दगडी बांधकामाची घरे आजही दिसत असतात. या काँक्रिटच्या जंगल होत असलेल्या अपार्टमेंटच्या गर्दीत मात्र पोवार गल्लीच्या कोपऱ्यावर एक जुने घर दिसते. या कौलारू घराकडे नजर पडताच क्षणभर डोळे त्या...
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 17, 2019
सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला.  दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते त्यांच्या आई- वडिलांसमवेत...
जुलै 17, 2019
अभिनेते धर्मेंद्र यांनी काही दिवसांपुर्वी अभिनेत्री हेमा मालिनी यांची खिल्ली उडविणारे एक ट्विट केले होते. पण, बहूदा हे ट्विट हेमा मालिनी यांना आवडले नसावे. म्हणूनच की काय आता धर्मेंद्र यांनी त्याची माफी मागितली आहे. अभिनेते धर्मेंद्र याबाबत एक ट्विट करत हेमा मालिनींची खिल्ली उडवली होती. सर, मैडम ने...
जुलै 17, 2019
राज्यात कुठेही वाहतूक नियम मोडल्यास कारवाई  जळगाव : वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहनचालक त्याठिकाणाहून पळ काढतात. वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला जातो. परंतु, आता अशा नियम मोडून पळ काढणाऱ्या बहाद्दरांवर जागच्या जागी चाप बसविणे "वन स्ट्राईक वन मेमो' या प्रणालीद्वारे पोलिसांना...
जुलै 17, 2019
खानापूर - वन कर्मचाऱ्यांनी दोन राष्ट्रध्वजांचा अवमान केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी (ता. १६) खानापूर तालुक्‍यातील मेरड्यात घडला. ग्रामस्थांनीच याविरोधात आवाज उठविल्यानंतर नंदगड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...
जुलै 17, 2019
नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण अन्‌ निर्यातक्षम उत्पादनाचे तंत्र अवगत केले असले, तरीही हे ‘मार्केट’ व्यापाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातील...