एकूण 262 परिणाम
जून 23, 2019
पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं...
जून 22, 2019
पुणे - 'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले. डॉ....
जून 17, 2019
पुणे - पूर्वी मठांमध्ये आध्यात्मिक स्वयं-अध्ययनाची विविध तंत्रे विकसित करण्यासाठी मोक्षपट हा खेळ खेळला जायचा. सापशिडीसारखा हा आध्यात्मिक खेळ असून, यातून रामदासी व वारकरी संप्रदायांना जोडणारा सेतू समोर आला आहे. रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट (एक तौलनिक मागोवा) या पुस्तकातून मोक्षपटावर प्रकाश...
जून 08, 2019
प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी...
जून 07, 2019
गोंदिया : शुक्रवारी दिवसभर कडाक्‍याचे ऊन तापत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्ह्यात वादळ आले. हे वादळ कुठे तासभर तर, कुठे अर्धातासापर्यंत कायम होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळात वीज तारा तुटल्याने शहरासह ग्रामीण भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला. गोंदिया शहरात सायंकाळी साडेपाचला...
मे 31, 2019
पुणे - लेखक होण्यासाठी कल्पनाशक्ती बरोबरच निरीक्षण शक्ती असली पाहिजे. अनुभव आपल्या शब्दांत मांडता आले पाहिजे. भाषा आणि अर्थाच्या छटा समजल्या पाहिजेत शब्दांच्या पलीकडले शब्दात मांडताना स्वतःची लेखन शैली निर्माण करा, असा सल्ला साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी कुमार लेखकांना दिला. ‘छात्र...
मे 27, 2019
कोरेगाव - सातारा रेल्वे स्थानकाच्या स्थापनेपासून स्थानकातून सुरळीतपणे सुरू असलेली प्रवासी गाडीमधील अनधिकृत मालवाहतूक (पार्सल) सेवा अचानक अधिकृतपणे बंद करण्यात आल्याने उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्यांसह सैन्यदलातील सैनिकांची गैरसोय सुरू झाली आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे सर्वांना...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 10, 2019
सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 09, 2019
समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या...
मे 06, 2019
पुणे - लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा...
एप्रिल 27, 2019
ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...
एप्रिल 16, 2019
पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 08, 2019
पुणे - तमाशा कलावंत, कारागीर यांचा शैक्षणिक दर्जा अद्यापही असमाधानकारक आहे. तर, आरोग्य आणि अर्थकारणाबाबत फारसे गांभीर्य नसल्याने त्यांचे जीवन अस्थिर असल्याचे एका संशोधनातून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात तमाशा तग धरून असला, तरीही तमाशा फडातील कलावंत, कारागीर यांच्या वाट्याला आजही उपेक्षाच आहे....
एप्रिल 04, 2019
युरोपीय महासंघाने स्वामित्व हक्क कायद्यात केलेल्या बदलांमुळे लेखक, कलावंतांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान तर होणार आहेच; पण इंटरनेट माध्यमात कायदेशीरपणे मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दुसरीकडे, यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ‘गु गल’ची ‘जी-मेल’ सेवा सुरू होऊन...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
एप्रिल 02, 2019
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्यात सरळ लढतीची चिन्हे आहेत. मात्र, उल्लेखनीय अपक्ष उमेदवारांचे आव्हान दोघांच्याही मतांना खिंडार पाडणारे ठरू शकते. मतविभाजनच निवडणुकीचा निकाल निश्‍चित करणार आहे....
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...