एकूण 288 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच विधान परिषदेत दिली. जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन...
जून 22, 2019
कोल्हापूर - दहावीच्या परीक्षेला तब्बल ९४ टक्के गुण मिळूनही हव्या त्या शाखेला प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येवरून खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतप्त झाले आहेत. केवळ आरक्षण नसल्याने या मुलाने आत्महत्या केली असेल तर...
जून 21, 2019
मुंबई - बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्या वाचनावरून राज्यभरात नवा गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या मुद्यावरून विरोधकांची खिल्ली उडवली.  सुलभ शिक्षण व वाचन यासाठी लहान मुलांना  ‘अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण,’  असं शिकवले जाते, याचा दाखला देत विरोधी...
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून तब्बल पाच...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 19, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
जून 07, 2019
गडचिरोली : निसर्गाशी एकरूप झालेल्या पशुपक्ष्यांना निसर्गातील, रानातील सूक्ष्म बदलही सहजपणे टिपता येतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूलही काही प्राणी-पक्ष्यांना लागते. मागील काही दिवसांपासून रानातील पाखरांच्या हालचालीत बदल दिसून येत आहेत. त्यावरून पशुपक्ष्यांना पावसाचे संकेत मिळत असल्याचा...
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 04, 2019
गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोखलेनगर येथे भांबुर्डा वन...
जून 01, 2019
नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील पाच...
मे 29, 2019
राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी ‘एरियल क्‍लाऊड  सिडिंग’ची उपाययोजना करून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता...
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा...
मे 23, 2019
करमाळा (जि. सोलापूर) - ‘लय भयंकर परिस्थिती आलीया,’ या मथळ्याखाली विहाळचे आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाच्या कहाणीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून पुण्यातील अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य असलेले भूषण पाटील यांनी साडेपाच लाख रुपयांचे २३ टन पशुखाद्य दिले....
मे 17, 2019
मुंबई - मानवी वस्तीत आलेल्या सापांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून परीक्षा घेऊन सर्पमित्र निवडले जातात. परंतु, मागील चार वर्षांत अशी परीक्षा झालेली नाही. त्याचप्रमाणे 2015 मध्ये झालेल्या परीक्षेची पुढील प्रक्रियाही झालेली नाही. परिणामी, बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, त्यातूनच राजू सोळंकी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा...
मे 06, 2019
मुंबई - अमराठी भाषकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने स्वतंत्र मराठी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या अभ्यासक्रमासाठी पुस्तकनिर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मराठी भाषेचा व्यवहार भाषा म्हणून करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमासाठी...
मे 06, 2019
पुणे - लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा...