एकूण 106 परिणाम
जून 15, 2019
हिमालयाच्या पर्वतरांगांमधून, अरण्यामधून फिरताना वेगळाच अनुभव येतो. निसर्गाच्या सन्निध वाटचालही ईश्‍वरी आशीर्वाद वाटतो. यंदाही हिमालयाच्या कुशीत जाण्याची ओढ लागली होती. सिलिगुडीमार्गे तिस्ता नदीच्या कडेने युक्‍सुमकडे प्रयाण केले. तेथून ट्रेक सुरू झाला. रथोन्ग नदीच्या सोबतीने बांबू, सिल्व्हर ओकच्या...
जून 11, 2019
अल्बम मनाला विरंगुळा, समाधान, गत जीवनातील प्रसंगांची आठवण करून देणारा खरा मित्र आहे. म्हणूनच मी सर्व अल्बम जपून ठेवते फक्त माझ्यासाठी! काळ्या मेघांनी आकाशात गर्दी केली होती. वातावरण अगदी कोंदट, मलूल, प्रसन्न असे काहीच वाटत नव्हते. मन अगदी बेचैन झाले होते. ना वारा, ना पाऊस, ना पक्ष्यांचा किलबिलाट....
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर,...
जून 03, 2019
ज्येष्ठत्वात आठवणींशी निगडित असा एखादा छोटा प्रसंग, संवाद घडला तरी मन अस्वस्थ होते. आठवणींचा मोकळा प्रकाश आणणे ज्याला जमले अथवा समजले तर तो साधुसंत बनू शकतो. लहानपणी वह्यांवर एकतरी सुविचार लिहिण्याची पद्धत होती. सुविचारही बालिशच असायचे. ‘आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली तरी महती कमी पडेल...’...
मे 08, 2019
समस्या सगळ्यांनाच असतात; पण तरीही मनमोकळे हसा. आपण हसल्यावर आसपासचे जग उजळून निघेल. हास्य हे चैतन्य आहे, आनंदाचे स्वरूप आहे. हास्य ही प्रत्येक माणसाच्या मनाची गरज आहे. हास्य, आनंद आणि समाधान यापेक्षा जगात दुसरे मौल्यवान काही असूच शकत नाही. मनावरचे ताणतणाव दूर करण्याची ताकद हास्यामध्ये आहे. एखादा...
मे 01, 2019
केवळ उत्तरपत्रिकेतील ती रेषा नव्हती, ती रेषा होती त्या मुलींच्या आत्मविश्‍वासाची, अचूक निर्णयक्षमतेची. शाळेची वार्षिक परीक्षा सुरू होती. नववी व अकरावीच्या विद्यार्थिनी मन लावून पेपर लिहीत होत्या. वर्गात एकदम शांतता होती. पेपर संपायला साधारण दहा-पंधरा मिनिटे बाकी होती. विद्यार्थिनींची उत्तरपत्रिका...
एप्रिल 30, 2019
जीवन हे जगण्यासाठीच आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हा. जीवन हे जगण्यासाठीच आहे. जीवनात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे सक्रिय वय संवर्धन. यासाठी माणसाला मेंदू सक्रिय ठेवण्याची गरज असते. जो प्रत्येक श्वास जगतो तो कधीच दु:खी होत नाही. आपल्याला आयुष्याबद्दल एक प्रकारची भीती...
एप्रिल 27, 2019
ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...
एप्रिल 25, 2019
बाळ घरात आले, की सारे घर त्या बाळाभोवती नाचू लागते. बाळलीलांमध्ये गुंतून जाते. लेकीने सांगितले, की ती आई होणार आहे; तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आईच्या नात्यांमधून आजीच्या नात्यांत बढती मिळणार असते तेव्हा मनात काय भावना निर्माण होते, हे कागदावर उतरविणे खरेच कठीण आहे. मन उल्हासित झाले....
एप्रिल 17, 2019
भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते. प्रजासत्ताकदिनी पहाटेच राजगुरुनगरहून वाड्याला गेलो. तेथे ध्वजवंदन झाल्यावर जुन्नरमार्गे ओतुरला पोचलो. तेथील मित्रांशी चर्चा करून सात-आठ जणांसह बदगी बेलापूर गाठले. छोटी बैठकच झाली. मग पुन्हा ओतूर....
एप्रिल 06, 2019
त्या चमूतील ते सर्वांत कनिष्ठ डॉक्‍टर. शिकत असलेले. पण त्यांनी सहज म्हणून सुचवला उपाय आणि काका शुद्धीवर आले. अण्णा माझे चुलते. त्यांचा भुसार मालाचा व्यापार व लाकडाची वखार होती. भाड्याने सायकली देण्याचे दुकान अण्णांनी आजीसोबत सुरू केले. ते सुगीमध्ये खेड्यापाड्यातून धान्य विकत घेत. शहरातील आडतीवर...
एप्रिल 04, 2019
चाळिशीत पारा गेला की घामाघूम होतो जीव; पण चाळिशी गाठताना आत्मविश्‍वासही येतो प्रत्येक स्त्रीला. बातमी होती, पुण्याच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. हा चाळीसचा आकडा खरेच इतका भयंकर असू शकतो का? पुणेकर बाहेर जाताना सावध असतील. आमची आई ओरडत असते, "अगं पारा चाळीसच्या वर गेलाय. टोपी घाल. हेल्मेट घाल, लवकर...
मार्च 30, 2019
पत्राद्वारे परगावची माणसं जोडली जायची. नात्याची ओढ वाटत राहायची. बातमी दुःखाची असो वा आनंदाची, पण पत्राद्वारे माणसं भेटीचा आनंद घेऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सामील व्हायची. माझ्या आईचं पत्र हरवलं; ते मला सापडलं... अशा प्रकारचा खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. बिनखर्ची पण मजेदार. आज हा खेळही हरवलाय अन्‌...
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
मार्च 19, 2019
भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा. भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे,...
मार्च 05, 2019
ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह टिकवून ठेवला पाहिजे. आनंदात राहाल तर आनंदी राहाल. आपले आरोग्य आपणच जपायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी सकाळी लवकर उठावे. सकाळी चहा न पिता, दूध पिऊन "मॉर्निंग वॉक'साठी बाहेर जावे. किमान अर्धा ते पाऊण तास फिरून यावे. चालण्यासारखा दुसरा कोणताही स्वस्त व्यायाम नाही. घरी...
फेब्रुवारी 27, 2019
खाद्या माणसाने आपल्याला मदत करून दिलासा दिला तर त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटत राहते. ती व्यक्त झाली तरच आपले भाव त्या व्यक्तीपर्यंत पोचतील. त्या व्यक्तीची तशी अजिबात अपेक्षा नसतेसुद्धा, पण ते व्यक्त करणं ही आपलीही भावनिक गरज असते. आज मला अशाच एका व्यक्तीबद्दलची माझी कृतज्ञता जाहीररित्या व्यक्त...
फेब्रुवारी 22, 2019
एकदा पर्वतीवर बसलेले असताना वाऱ्यातून ओंकार ऐकू आला आणि मग सारी सृष्टीच ओंकार जप करते आहे, असे वाटू लागले. मी निवृत्त झाल्यानंतर एकदा माझी मैत्रीण नीला पारखी मला भेटली. तिने तिच्या योग वर्गाबद्दल मला सांगितले. माझ्या घराजवळच तिचा वर्ग असल्यामुळे मी तिथे जाऊ लागले. तर योगाची सुरवात सर्वप्रथम...
फेब्रुवारी 16, 2019
जीवन प्रवाही आहे खरे, पण त्यात थोडे थोडे थांबेही हवेत. पुढच्या प्रवासाला सुरवात करण्याआधीचे क्षणिक विराम. "गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?' विचारल्यावर तिने "न्हाय' म्हटले आणि अगदी शेवटी "हाय' म्हणण्याच्या अगोदर क्षणिक विराम अर्थात "पॉज' घेतला आहे. आता या पहिल्या "न्हाय'च्या नंतरचा हा छोटा "पॉज'...